“हिंदू धर्मविरोधी बॉलिवूडसाठी मी गाणी म्हणणार नाही!” : गुणी गायिकेची अशीही कथा..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोणत्याही कलाकाराला आपलं मत असतं. आपली कला कुठे सादर करायची, कोणासमोर सादर करायची याचा अंतिम निर्णय पूर्णपणे त्या कलाकाराचा असतो.
काही वर्षांपूर्वी असं व्हायचं की, कलाकार हे आपल्या मतांना मुरड घालून प्रत्येक निर्मात्यासाठी काम करायचे, राजकीय कार्यक्रमात उपस्थिती द्यायचे.
पण, आता असं नाहीये. आजची पिढी ही त्यांच्या विचारात अगदी क्लिअर आहे.
आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे मैथिली ठाकूर ही कलर्स चॅनल वर २०१७ च्या ‘रायझिंग स्टार’ या कार्यक्रमात आपण ऐकलेली एक गोड गळ्याची गायिका.
‘या रब’ या अल्बम द्वारे आपलं गायनाचं करिअर सुरू करणाऱ्या २० वर्षीय मैथिली ची विशेषता ही तिने गायलेली धार्मिक गाणी आहेत.
बिहारच्या मैथिली ठाकूर ने संगीताचं शिक्षण हे आपल्या वडिलांकडून आणि आजोबाकडून घेतलं आहे. पाचवी पर्यंतचं शाळेचं शिक्षण सुद्धा तिने घरातूनच घेतलं होतं.
शास्त्रीय गायनाची तिला लहानपणापासूनच आवड आहे. चांगल्या शिक्षणासाठी ठाकूर कुटुंबीय हे काही वर्षांनी दिल्ली ला स्थलांतरित झालं होतं.
वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये तिने पहिल्यांदा ‘सा रे ग म प – लिटल चॅम्प’ या झी टीव्ही वरील कार्यक्रमात सुद्धा सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता.
पण, त्यावेळी तिला अपयश आले होतं. मैथिली ठाकूर ने जवळपास सगळ्या रिऍलिटी शोसाठी ऑडिशन दिली होती. पण, सहा वेळेस तिला वेगवेगळ्या चॅनल्सने नाकारलं होतं.
काही शोज मध्ये मैथिली ही टॉप २० पर्यंत पोहोचली होती. पण, त्यापुढे ती जाऊ शकली नव्हती. तरीही मैथिली ने हार न मानता तनिष्ठा पुरी सोबत मिळून ‘या रब’ हा अल्बम मध्ये गाणी गायली होती.
हिंदू परिवारात जन्मलेल्या मैथिली ठाकूर ला दोन लहान भाऊ आहेत. गाण्या सोबतच हार्मोनियम वाजवण्याची सुद्धा मैथिलीला आवड आहे.
बॉलीवूड मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी असतांनाही मैथिलीने ती संधी वारंवार नाकारली आहे. काय कारण असेल?
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडची दुसरी बाजू लोकांसमोर आली. “तुमच्या मागे कोणतं मोठं नाव नसेल तर तुमचं करिअर बॉलीवूड मध्ये होणं खूप अवघड आहे” हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला.
पूर्ण भारताला सुन्न करणाऱ्या या घटनेने २० वर्षीय मैथिली सुद्धा खूप व्यथित झाली होती. आपल्या मनाची व्यथा तिने आपल्या युट्युब चॅनलवर सुद्धा बोलून दाखवली होती.
आपले भाऊ ऋषभ आणि अयाची यांना सोबत घेऊन सुरू केलेल्या या चॅनलच्या प्रत्येक विडिओ ला लाखो views मिळतात आणि मैथिली ठाकूर ने परदेशात जाऊन सुद्धा शोज सादर केले आहेत.
मैथिली ठाकूर सारख्या प्रतिभावान गायिकेने बॉलीवूडला नकार देणं म्हणजे बॉलीवूडचं नुकसान आहे.
२०२० या वर्षात ज्या कारणांसाठी बॉलीवूड बद्दल चर्चा होत होती त्यामुळे मैथिली सारख्या कित्येक कलाकारांचं नुकसान झालं आहे हे आता समोर येत आहे. घराणेशाही आणि फेव्हरेटिझम मुळे टॅलेंट ची किंमत कधीच कमी झाली आहे.
“हे चालतच राहणार. मला काम मिळतंय ना बस झालं” असा संकुचित विचार न करता पूर्ण व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याच्या मैथिलीच्या निर्णयाची कमाल आहे.
आपल्या वडिलांशी चर्चा करूनच आपण हा निर्णय घेतल्याचं तिने एका विडिओ मध्ये सांगितलं आहे.
मीडिया ने याबद्दल प्रश्न विचारल्यावर मैथिली ने हे सांगितलं आहे की –
“बॉलीवूड मधील या वातावरणाचा आम्हाला सुद्धा त्रास झाला होता. पण, आम्ही त्यावर भाष्य करायचं टाळलं होतं. माझा संघर्ष अजूनही सुरू आहे आणि पूर्णपणे माझ्या करिअर कडे माझा फोकस आहे.
मी आजपर्यंत कित्येक प्रादेशिक भाषांसाठी सुद्धा गाणी गायली आहेत. पण, बॉलीवूड साठी मी इथून पुढे कधीही गाणं म्हणणार नाही.”
मैथिलीच्या या निर्णयाची दखल सोशल मीडियावर घेण्यात आली आणि लोकांनी तिच्या निर्णयक्षमतेची दाद दिली आहे. २० व्या वर्षी विचारात असलेलली स्पष्टता ही खरंच कौतुकास्पद आहे.
प्रादेशिक लोकसंगीतात आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मैथिलीचा आवाज कोणत्या नायिकेला मिळण्याचा सध्या तरी काही चान्स दिसत नाहीये.
थेट बोलायचं तर, हिंदू कलाकार, संस्कृती, धार्मिक प्रथा याबद्दल बॉलीवूडच्या कित्येक प्रतिष्ठित निर्मात्यांना असणारा तिटकारा जोपर्यंत कमी होणार नाही, तोपर्यंत कित्येक मैथिली असा निर्णय घेत राहतील.
आपण, फक्त स्टार्सच्या पुढच्या पिढीचं स्वागत करत राहू आणि सामान्य व्यक्ती बॉलीवूड मधील करिअरचे फक्त स्वप्नच बघत राहील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.