आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तंत्रज्ञानाच्या विश्वात गुगल हि एक क्रांतीच ठरली असे म्हणायला हरकत नाही. एका छोट्याश्या खोलीतून पेज भावंडांनी बघितलेलं हे स्वप्न आज एका “जायंट कंपनी” च्या रुपात उभारून आलंय.
जगभरात असलेली सगळी, म्हणजे अगदी सगळीच माहिती एकाच ठिकाणी, एका क्लिक वर उपलब्ध होईल, हा विचारच मनाला पटेनासा होता.
ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता ते व्हिजन पेज भावंडांकडे होतं आणि आज ते आपण सगळेच अनुभवतो आहोत. गुगल आपल्या सगळ्यांचीच ‘गो टू’ स्पेस.
अडी अडचणीला, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर, कोणत्या औषधा विषयी माहिती हवी असल्यास, इतकच काय आरत्या, पुस्तकं, प्रेक्षणीय ठिकाणं, कठीण कठीण गणितांची उत्तरं इतकं सगळंच गुगल वर असतं.
कोणताही प्रश्न पडला तर “अरे गुगल कर ना, वेळ का वाया घालवतोयस” हेच उत्तर आपल्याला मिळतं. इतका आपण सगळे गुगलचा वापर करतो. विद्यार्थ्यांसाठी तर गुगल एक वरदानच आहे, अगदी देवसारखं त्यांच्या मदतीला धावून येणारं कोणी असेल तर ते गुगलच.
पण गुगलचा वापर फक्त माहिती मिळवण्यासाठी एका सर्च इंजिन पर्यंतच मर्यादित नाही. गुगल वरून भरपूर काही गोष्टी करता येतात. काय त्या खाली पाहूया –
१) ATARI breakout –
हा एक ऑनलाईन गेम आहे. हा गेम खेळण्यासाठी सर्च बार मध्ये atari breakout टाइप करून, इमेजेस वर क्लीक करा, आणि सर्च करा. ह्या नंतर गेम सुरु होण्यासाठी काही सेकंद थांबा. गेम सुरु होईल व आपल्याला खेळता येईल.
२) Pacman –
हा सुद्धा एक ऑनलाइन गेम आहे. हा गेम खेळण्यासाठी सर्च बार मध्ये फक्त “pacman” टाइप करून सर्च करा.
लगेच गेम सुरु होईल. आणि कंटाळा येत असेल, तेच तेच गेम्स खेळून कंटाळा आला असेल तर हा फ्री गेम आपण नक्कीच ट्राय करू शकता.
३) Zerg rush –
गेम्सच्या चाहत्यांसाठी गुगल हे गेमिंग साठी फार उपयुक्त आहे. सर्च मध्ये टाइप केल्या नंतर रिझल्ट येई पर्यंत, तुमच्या स्क्रीन वर छोटे छोटे “o” दिसतील.
तुमच्या सर्च रिझल्ट्सना संपवण्याआधी तुम्हाला त्यांना संपवायचे असते. त्यांच्यावर फक्त क्लीक करून त्यांना संपवल्या जाऊ शकतं. त्यामुळे टेम्पल रन सारख्या वेगवान गेम्स आवडत असलेल्याना हा गेम नक्कीच आवडेल.
४) लिपीचे इनपुट देऊन भाषांतर करणे –
गुगल ट्रान्सलेटर हे इनपुट देऊन, हव्या त्या भाषेत आपण भाषांतर करून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कीबोर्ड ने इनपुट द्यावे लागते.
पण आपण वहीत पेनने ज्याप्रमाणे लिहितो, किंवा पेंट सॉफ्टवेअर मध्ये माउसच्या साहाय्याने ज्याप्रमाणे चित्र काढता, त्याच प्रमाणे गुगल ट्रान्सलेटरला इनपुट देता येतात.
त्यासाठी – गुगल ट्रान्सलेशन मध्ये जाऊन, स्क्रीनच्या डाव्या बाजूस खाली एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लीक करून पेन्सिल ऍक्टिवेट करून आपण हाताने लिहिल्या प्रमाणे इनपुट्स देऊ शकतो.
हे फिचर भाषा समजत नसताना, हुबेहूब लिहून अर्थ कळण्यास उपयुक्त ठरते.
५) मोठ्या आकड्यांना कसे वाचावे ते समजते –
कधी कधी ७ पेक्षा जास्त आकडे असलेली संख्या कशी वाचावी ते आपल्याला कळत नाही, काही जणांचा गोंधळ होतो.
त्यामुळे तशीच्या तशी संख्या गुगलच्या सर्च बार वर टाइप केली की तिचे शब्दात रूपांतर करून मिळते. या साठी, संख्या टाइप करून शेवटी “=” चे चिन्ह टाकून आपल्याला भाषांतर करून हवी असलेली भाषा लिहा.
१३ आकडी संख्येपर्यंत संख्यांचे शब्दात रूपांतर करून मिळू शकते.
६) गुगलचा कॅल्क्युलेटर सारखा उपयोग –
गुगल हे एक कॅल्क्युलेटर म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते हे सहसा आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती नसते.
गुगलच्या सर्च बार वर, टाइप करून आपण फक्त लहान सहन गणितच नाही तर मोठाली त्रिकोणामितीची गणितं, त्यांचे आलेख अशी सगळ्या किचकट गणितांची उत्तरं मिळवता येऊ शकतात.
७) भौमितिक अभ्यास –
गुगलचा वापर करून आपण चौकोन, आयत, इत्यादी यांचे क्षेत्रफळ, घनफळ काढू शकतो. याशिवाय, भूमितीचे प्रमेय, सिद्धांत सगळंच गुगलच्या साहाय्याने सोडवता येऊ शकतं.
८) आलेख –
गुगल हे विद्यार्थ्यांपासून, सगळ्याच काम करणाऱ्या लोकांच्या फार मदतीचे साधन आहे. यावर आपला डेटा फीड केला की हवा तो आलेख आपल्याला मिळवता येऊ शकतो.
९) वेटरला देण्याच्या टीप चे गणित –
काही लोक गणितात कच्ची असतात. त्यामुळे कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, हे वाटे करणे, हा हिशोब अगदी चटकन करणे त्यांना अवघड वाटते. हॉटेल मध्ये गेलेलो असताना, बिल देण्याच्या वेळी वेटरला टीप देतात.
हि टीप बिलचीच काही टक्केवारी असते. त्यामुळे आकड्यात मोजणं नेमकं कंठीण होतं.
पण गुगल वर “टीप कॅल्क्युलेटर” सर्च करून, त्या कॅल्क्युलेटर मध्ये आपलं बिलची संख्या आणि परसेन्ट टाकून आपल्याला नेमके किती पैसे द्यायचे, हे काढता येऊ शकते.
१०) करन्सी आणि युनिट कन्वर्जन –
करन्सी कन्वर्टरच्या मदतीने कोणत्याही देशाच्या करन्सीला इतर करन्सी मध्ये कन्वर्ट करून, चालू किंमत काढता येते. आणि युनिट कन्वर्टरच्या मदतीने मीटर ते सेंटीमीटर, किलोग्रॅम ते पौंड असे कन्वर्जन आपल्याला सहज करता येतात.
११) टायमर –
आपल्या जवळ परफेक्ट टायमर नसेल तर गुगलचा सुद्धा टायमर म्हणून वापर करता येऊ शकतो. गुगल टायमर हे फिचर सर्चबार मध्ये सर्च केल्याने सहज स्क्रीनवर दिसायला लागते.
१२) सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ जाणून घेणे –
गुगलच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या शहरातील सूर्योदय व सूर्यास्ताच्या अगदी परफेक्ट वेळा जाणून घेऊ शकता.
यासाठी फक्त तुम्हाला सर्च बार मध्ये “sunrise in dombivali, sunrise in nashik” इतकच टाइप करण्याची गरज आहे.
याच बरोबर गुगलच्या साहाय्याने वेळ अंतर याची इत्यंभूत माहिती मिळवता येऊ शकते, तुमच्या फ्लाईटची सध्याची काय स्थिती आहे, हवामानाचा अंदाज, गुगलचे सगळे डुडल्स, गुगलची स्क्रीन ३६० डिग्रीने गोल फिरवू शकता, गुगल रेट्रो अर्थात मागील काही वर्षात गुगलचे काय स्वरूप होते, हे सगळे तुम्ही गुगल वरून पाहू शकता.
इतकं सगळं एका गुगल वरून, आहे ना मजेशीर?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.