Site icon InMarathi

इंग्लंडला भारताकडून घ्यायचेत धडे! – “ऑपरेशन राहत” मधून शिकायचं आहे रेस्क्यू ऑपरेशन

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

एप्रिल २०१५ मधे हौदी बंडखोर आणि येमेन सरकारमधल्या यादवी युद्धात सापडलेल्या साडे पाच हजारहून अधिक भारतीय आणि इतर ४१ देशातील लोकांना भारतीय सैन्याने मोठ्या शिताफीने वाचवलं. केवळ नऊ दिवसात पार पडलेल्या ह्या “rescue” ऑपरेशनला नाव दिलं गेलं होतं – ऑपरेशन राहत.

 

ह्या ऑपरेशनमधे नेमकं काय काय घडलं ह्याचा The Hindu ने छान सारांश दिलाय – तो असा –

 

 

ह्या ऑपरेशनमधे भारताने UK चे नागरिक सुद्धा वाचवले होते. त्याने UK ची Royal Navy इतकी प्रभावित झाली आहे की त्यांनी ह्या संपूर्ण ऑपरेशनचा अभ्यास करायचं ठरवलं आहे.

Royal Navy चे naval आणि air adviser असलेले Captain Stuart Borland हे IFR 2016 साठी विशाखापट्टणमला आले होते (संदर्भासाठी वाचा: भारतीय नौदलाची दिमाखदार परेड – “IFR-2016”) . त्यावेळी The Sunday Guardian ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले :

ऑपरेशन राहतचं यश अभूतपूर्व होतं. भारताने येमेनमधून आमच्या देशवासियांनासुद्धा वाचवलं. नागरिकांचं स्थलांतर विशेष नोंद घ्यावी इतक्या कमी कालावधीत केलं गेलं. हे काम इतकं प्रेरणादायक आहे की आम्हाला अश्या प्रकारच्या मानवतावादी कार्यात भारतासोबत काम करायची इच्छा आहे.

‘ऑपरेशन राहत’ चा दीर्घ अभ्यास UK ची Royal Navy करणार आहे. विशेषतः ऑपरेशनच्या एवढ्या सावध आखणीची त्यांना उत्सुकता आहे. त्याच बरोबर, आखणी केल्यानुसार संपूर्ण ऑपरेशन पार कसं पाडल्या गेलं हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं आहे.

UK ला एवढं आश्चर्य का वाटतंय ?

भारतीय सैन्याने कश्याप्रकारे रोज, टप्प्या टप्प्याने हे ऑपरेशन पार पाडलं हे MEA (परराष्ट्र मंत्रालय) चे प्रवक्ता सईद अकबरूद्दिन आणि जनरल व्ही के सिंग ह्यांच्या tweets वरून कळतं.

त्या tweets चं हे The Hindu ने केलेलं ढोबळ संकलन :

 

 

वरील तक्त्यावरून कळतं की केवढी दीर्घ कार्यवाही एका परदेशी भूमीवर भारताने यशस्वीरीत्या पार पाडली. तेही – यादवी पेटलेली असताना…!

कौतुक करण्यासारखंच आहे हे सगळं…!

उण्यापुऱ्या ७० वर्षांपूर्वी आमच्यावर राज्य करणाऱ्या देशाला आज आमच्याकडून शिकावंसं वाटतंय…!

It Happens Only in INDIA…! 🙂

जय हिंद !!!

सर्व images चा स्त्रोत: The Hindu

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version