Site icon InMarathi

अतिविचार एक धोकादायक सवय; सावध व्हा, मनःशांती मिळवण्याचे ८ उपाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“मानसिक आरोग्य” या बद्दल आपण आजकाल भरपूर ऐकत असतो, वाचत असतो. मानसिक आरोग्याबद्दल सध्या जनजागृती मोहीम फार जोर धरते आहे. तरीही आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला कमी पडतो किंवा चालढकल करून, त्याला इतकं महत्त्व देत नाही.

 

 

मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी भरपूर कारणे आहे. सोशल मीडिया, वाढलेली स्पर्धा, आपल्या स्वतःकडून असलेला मोठाल्या अपेक्षा, आपली जीवनशैली, अन्न या सगळ्या बाबी शरीराबरोबरच, मानसिक आरोग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम करतात.

याशिवाय बायपोलार डिसऑर्डर, ऑब्सेस्सीव कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ocd), एंझायटी यांसारखे आजारही सतत सुरु राहणाऱ्या विचारांमागील एक कारण आहे. मानसिक आरोग्य ढासळण्याची बरीच लक्षणे असतात. त्यातील एक म्हणजे रेसिंग माईंड सिंड्रोम (RMS).

आपलं मन हे कधीच शांत राहू शकत नाही हा एक नैसर्गिक नियमच आहे. वायुवेगाने धावणारे मन आपल्या ताब्यात नसेल तर ते आपल्या भविष्यासाठी धोका ठरू शकते, कसे ते पाहूया.

प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करणे योग्यच, पण गरजेपेक्षा अधिक विचार करणे, म्हणजे अगदी मनाची सतत होणारी घालमेल. सतत म्हणजे अगदी न थांबता येणारे विचार हे आपल्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

 

 

सतत भविष्याचा विचार आणि भूतकाळाची मनावर असलेली पकड हि दोन करणे आपले वर्तमानात जगणे अत्यंत अवघड बनवतात. आपल्याला मोकळा श्वास घेणे कठीण होऊन जाते.

सतत येणाऱ्या विचारांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर आघात होतोच पण आपली एनर्जी संपूर्णपणे संपून जाते, ज्याचा परिणाम आपल्या नात्यांवर सुद्धा होतो.

आपल्या मानसिक स्वास्थ्याला जपण्यासाठी आणि मनातील विचार ताब्यात ठेऊन आपला मौल्यवान वेळ वाया जाऊ न देण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूया.

१. लिखाण  

कोणत्याही मानसोपचार तज्ञाकडे आपण उपचारास गेलो तर मनात जे विचार चालले आहेत ते कागदावर मांडण्यास सांगितले जातात. अर्थात अनेकदा ते विचार लिहीताना
व्याकरण, वाक्यरचना सगळं बाजूला ठेऊन फक्त कागदावर लिहीत राहणे हा उत्तम व्यायाम आहे.

 

 

मनात काहीही दडवून ठेऊ नका. याने तुमचं मन हलके होईल आणि खरंच हे विषय आपला वेळ, एनर्जी देण्या इतके महत्वाचे आहेत का ते कळेल. शिवाय अतिरिक्त विचार करण्याची सवय हळूहळू कमी होईल.

२. छोटे बदल 

“थेंबे थेंबे तळे साचे” ही म्हण आपण ऐकलीच असेल. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात मोठा रिझल्ट हवा असेल तर सुरुवात लहान बदल घडवून आणण्यापासूनच करावी लागते. तेव्हा कुठे सवयीचं दडपण न येता त्या कायम राहतात आणि सकारात्मक बदल दिसून येतात. त्यामुळे आपलं लक्ष वळवण्यासाठी स्वतःला गुंतवून घेणे सुरु करा.

 

 

छोट्या छोट्या कामापासून सुरुवात करून, एकूणच जीवनशैली कशी बदलता येईल ते बघा. हे छोटे बदल घडवून स्थूलतेकडून अॅक्टिव्ह जीवनशैलीकडे वाळा.

3) ध्यान करा 

मनःशांतीसाठी ध्यान करा हा सल्ला आपल्याला भरपूर लोकांनी दिला असेल. “पण ध्यान करताना विचार तर येतातच आहेत” ही आपल्यापैकी बऱ्याच लोकांची समस्या असते. पण ध्यान करण्याचा खरा अर्थ अपल्याला माहिती आहे का?

ध्यान म्हणजे विचारांना नाकारण्यापेक्षा विचारांना अॅक्सेप्ट करणे. विचार आलेच तर त्यांच्यावर रिऍक्ट न करता, कोणतीही प्रतिक्रिया न देता, त्यांना चांगलं किंवा वाईट न म्हणता आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे.

 

 

आपला आवडता छंद जोपासताना जे चित्त एकाग्र होतं, आवडतं गाणं ऐकताना जेव्हा मनात दुसरे विचार येत नाही, त्याला सुद्धा मेडिटेशनच म्हणतात. त्यामुळे सुरुवातीला ५ मिनिटांपासून सुरु करून, हळूहळू मन नियंत्रणात ठेवण्याचा सराव करा.

४. एकावेळी एकच काम करा 

आजच्या वेगवान जगात, “ज्याला मल्टीटास्किंग जमलं तो जिंकला ” असा आपला समाज झालेला आहे. पण हे आव्हान पेलणे काही सगळ्यांनाच शक्य असते असे नाही. त्यामुळे आपला स्वभाव, स्किल आणि ताण सहन करण्याची क्षमतेला जाणून घ्या. आणि शक्यतो एकावेळी एकच काम करा.

जेणेकरून ते काम अगदी १००% नीट होईल आणि समाधान मिळेल. भरपूर कामं अर्धवट करण्यापेक्षा एक एक काम पूर्ण करणे कधीही चांगलेच.

 

 

याने तुमचे मन नक्की शांत राहील आणि ताण येणार नाही.

५. नकार द्यायला शिका 

आपलं सोशल लाईफ छान राहावे, लोकांना आपण आवडायला हवे म्हणून आपण बरेचदा इच्छा नसताना, मनाविरुद्ध बरीच कामं करतो.

“नाही कसं म्हणू, हे करायचं नाहीये पण नाही म्हटलं तर काय होईल, समोरच्या व्यक्तीला राग येईल का? मग आपले संबंध खराब होतील का? मग ऑफिस मध्ये ती व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलेल का” असे अनेक अनेक विचार मनात गदारोळ घालणं सुरु करतात.

त्यामुळे, इतका विचार न करता, पुढच्याचा अपमान न करता स्पष्ट नाही म्हणा.

 

 

यामुळे त्या व्यक्तीला पण राग येणार नाही , संबंध छान राहतील आणि तुम्हाला ताण येणार नाही.

६ माणसांची पारख नीट करा 

आपण ज्या व्यक्तींबरोबर राहतो, आपला जास्तीत जास्त वेळ त्यांना देतो ती माणसं जर नकारात्मक विचार करणारी असतील, त्यांच्या वागण्या बोलण्याने आपला आत्मविश्वास कमी होणार असेल, त्यांच्या बरोबर बोलण्याचे कोणत्याही प्रकारचे दडपण आपल्याला जाणवत असेल तर अशा लोकांना वेळीच आयुष्यातून बाहेर काढा.

 

 

यात काहीही गैर नाही. नेहमी सकारात्मक लोकांबरोबर राहा. ती माणसं मोजकी जरी असली तरी हरकत नाही. फक्त प्रोत्साहन देणारी, समजून घेणारी असायला हवी. याने तुमचा अत्याधिक ताण कमी होईल आणि डोकं शांत राहील.

७. गॅजेट्सचा अत्याधिक वापर टाळा

उपकरणे जरी मानवाच्या सुखासाठी निर्माण केलेली असतील तर आपण त्यांच्या आहारी जात आहोत. त्यामुळे आपल्या जीवनात यंत्रांचा फक्त गरजे पुरता वापर करणे शिका.

मोबाईल, गाडी, टीव्ही, हे सगळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करतात.

 

 

त्यामुळे यंत्रांचा वापर कमी करून निसर्गाच्या सानिध्यात किंवा आपल्या कुटुंबियांच्या सानिध्यात रमणे निवडा.

८. सोशल मीडिया टाळा 

सोशल मीडियावर अत्याधिक लोक आपल्या जीवनाचे प्रदर्शन मांडत असतात. ख-या आयुष्यात त्यांची परिस्थिती, राहणीमान, जीवनशैली सारे वेगळे असते. पण आपल्याला त्यांचं अतिशय उच्च दर्जाचं जीवन पाहून टेन्शन येतं, आपण आपल्या ताटात काय आहे हे सोडून समोरच्या कडे किती आहे हे बघतो. आणि सुरु होतं चक्र तुलनेचं.

 

 

त्यामुळे सोशल मीडिया पासून लांबच राहा.

हे सगळे उपाय करून सुद्धा आपल्याला काही फरक जाणवत नसेल तर आपल्याला डॉक्टरांची आवश्यकता आहे हे वेळीच लक्षात घ्या.

डॉक्टरांकडे जायला अजिबात लाजू नका. योग्य उपचार आणि मार्गदर्शनाने आपली मनःशांती पुन्हा वापस मिळवता येऊ शकते हे कायम लक्षात असू द्या.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version