Site icon InMarathi

नेटफ्लिक्सवरील हे ७ शो तुम्ही बघायलाच हवेत! २ दिवस मोफत बघता येतील!!

netflix featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात आणि भारतात लॉकडाउन जाहीर झाला. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस रेल्वे बससेवेपासून, थेटर्स, नाट्यगृह, बागा, फिरण्याची सगळी ठिकाणं ही बंद झाली!

या सगळ्याला आता जवळ जवळ ९ महीने होतील. अजूनही कोरोना नाहीसा झालेला नाही. पण हळूहळू लोकांच्या मनातली भीती कमी होऊ लागली आहे.

आणि आता सिनेमागृह आणि नाट्यगृह सुद्धा चालू करायला सरकारने परवानगी दिली आहे. हळू हळू सगळं नॉर्मल होताना दिसत आहे. पण थेटर्सकडे अजूनही म्हणावी तशी लोकं जाताना दिसत नाहीयेत!

 

 

मध्यंतरी गाजलेलं सुशांत सिंग मृत्यू प्रकरण असो किंवा प्रेक्षकांनी नेपोटीजमविरुद्ध छेडलेल युद्ध असो किंवा ड्रग केसेस असो एकंदरच या सगळ्या काळात फिल्म इंडस्ट्रीला खूप मोठा फटका बसला आहे!

आणि या काळात चलती झाली ती म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मची. या महामारीच्या काळात कित्येक सिनेमे हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केले गेले. पण त्यापैकी काही मोजकेच सिनेमे प्रेक्षकांची मनं जिंकू शकले!

यामागचं कारण म्हणजे याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर असणारा दर्जेदार कंटेंट. परवडणारे इंटरनेट चार्ज, हातात मस्त स्मार्टफोन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची लागलेली रांग यामुळे लोकांना चांगला आणि दर्जेदार कंटेंट बघायची सवय झाली!

नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राइम असे विविध ऑप्शन लोकांसमोर उपलब्ध झाले. त्यापैकी नेटफ्लिक्स हा सर्वात खर्चीक ओटीटी प्लॅटफॉर्म. पण फार कमी वेळात नेटफ्लिक्सने भारतात स्वतःचा असा एक  मोठा बेस तयार केला आहे.

 

 

साधारणपणे नेटफ्लिक्सचा सर्वात बेस्ट प्लॅन एकट्याने घ्यायचा म्हंटला तर त्याची किंमत वर्षाला ९००० रुपयांपर्यंत जाते. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हा कीती मोठा प्लॅटफॉर्म आहे ते!

सध्या नुकत्याच एका भारतीय शोमध्ये दाखवल्या गेलेल्या आक्षेपार्ह्य सीनमुळे नेटफ्लिक्स बॅन करा असा सुद्धा रोख प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाला.

पण एकंदरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या इंटरनॅशनल कंटेंटची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही!

अगदी भारतात बसल्या बसल्या तुम्ही अमेरिका, लंडन, जर्मनी, स्पेन, कोरिया अशा देशातला दर्जेदार कंटेंट बघू शकता! नेटफ्लिक्स म्हणजे फक्त ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ असा गैरसमज असणाऱ्यांमुळे नेटफ्लिक्सची नाचक्की होते हे देखील तितकेच खरे आहे!

तर आज आणि उद्या म्हणजेच ५ आणि ६ डिसेंबर हे २ दिवस सगळ्या प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे,  कोणताही चार्ज न घेता! कसलेही पैसे न भरता तुम्ही या २ दिवसात नेटफ्लिक्सवर हवा तितका वेळ आणि हवा तो कंटेंट बघू शकणार आहात!

नवीन प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ही स्ट्रॅटजी खरंच मस्त आहे पण ज्यांना नेटफ्लिक्स वरचा कंटेंट पाहणं शक्य नाही किंवा ज्यांना त्याचे सब्स्क्रिप्शन चार्जेस परवडत नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे!

 

 

आता खरंतर २ तास म्हणजे २४ तासात काय बघायचं काय नाही असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडू शकतो. आणि अर्थात २४ तासात एक संपूर्ण सिरिज संपवणं तसं कठीणच आहे.

पण तरीही आम्ही या लेखात आम्ही तुम्हाला ७ अशा वेबसिरीज आणि फिल्मची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही या २ दिवसात बघून त्याचा आस्वाद घेऊ शकता!

सिरिज पूर्ण बघणं कितपत शक्य होईल ते नाही सांगता यायचं पण हे काही सिनेमे आणि काही अविस्मरणीय अशा सिरिज तुम्ही बघायलाच हव्यात!

 

१. दिल्ली क्राइम :

 

 

ही नेटफ्लिक्स वर रिलीज झालेली एक भारतीय सिरिज आहे. या सिरिजला नुकताच Emmy अवॉर्ड मिळाला असून, हा पुरस्कार मिळणारी ही पहिली भारतीय सिरिज ठरली आहे. 

ही एक क्राइम थ्रिलर सिरिज आहे जी दिल्लीतल्या निर्भया गॅंगरेप प्रकरणावर आधारित आहे. इतका गंभीर विषय असून सुद्धा ही सिरिज तुम्ही तुमच्या परिवारासोबत बसून बघू शकता.

निर्भया केसची चौकशी, निकाल कसा लागला आणि एकंदरच त्या वेळेस दिल्लीतला माहोल आणि पोलिस डिपार्टमेंटवर असलेलं प्रेशर आणि त्यातून निर्माण होणारं टेंशन या सिरिज मध्ये अगदी हुबेहूब दाखवलं आहे!

शेफाली शाह ही या सिरिज मध्ये मुख्य भूमिकेत असून इतरांनी सुद्धा अप्रतिम कामं केली आहेत. साधारण एकच सीझनची ही सिरिज तुम्ही नक्कीच बघू शकता!

 

२. डार्क :

 

 

अगदी नावाप्रमाणेच ही एक अत्यंत डार्क साय फाय ड्रामा असलेली जर्मन वेबसिरीज आहे. एक वेगळ्याच प्रकारचा टाइम ट्रॅव्हल आणि टाइम पॅराडॉक्स आणि त्यातून घडणारं आपल्याला थक्क करणारं नाट्य म्हणजे डार्क सिरिज!

या सिरीजच्या कथेविषयी जास्त न बोललेलंच बरं. जर्मनी मधल्या विंडन शहरातली ही गोष्ट जिथे एक विचित्र गुन्हा घडत असतो, पण जसजसे आपण सिरिज पुढे बघायला सुरू करतो तसतसं ही सिरिज तुम्हाला एक एक धक्के देत जाते!

तब्बल ३ सीझनची ही सिरिज तुम्हाला एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव देऊन जाईल. जर्मन या मूळ भाषेत तसेच इंग्लिश मध्ये सुद्धा सबटायटल्स सकट ही सिरिज उपलब्ध आहे.

 

३. मनी हाइस्ट :

 

 

स्पॅनिश भाषेतली ही सिरिज सुद्धा नेटफ्लिक्सवर आलेली एक उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. ही सिरिज सुद्धा मूळ भाषेत आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे. 

नावाप्रमाणेच ही एक हाइस्ट सिरिज म्हणजे एका मोठ्या चोरीची गोष्ट आहे.

पण ही चोरी इतर चोऱ्यांप्रमाणे नाही. या चोरीत सहभागी झालेले चोर त्यांचा म्होरक्या प्रोफेसर आणि यांचं एकमेकांशी तयार होणारं नातं. प्रत्येक चोरीच्या वेळेस येणाऱ्या अडचणी, पण त्यावर मात करत आपल्या मतावर ठाम राहणारे चोर आपल्या मनात एक वेगळीच जागा निर्माण करतात!

दाली मास्क आणि त्या मागे वापरलेली आयडियोलॉजी हे सगळं ही सिरिज अगदी सविस्तरपणे आपल्यासमोर मांडते!

लॉकडाउन काळात भारतात सर्वात जास्त बघितली गेलेली हीच ती सिरिज. या सिरिजचे ४ भाग आले असून ५ वा भाग सुद्धा लवकरच येणार असल्याची घोषणा केलेली आहे!

 

४. लुडो :

 

 

बर्फी सारखा सिनेमा देणाऱ्या अनुराग बासुचा लुडो हा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. लॉकडाउनमुळे रखडलेला हा सिनेमा अखेर नेटफ्लिक्सवर रिलीज केला गेला!

लुडो खेळातल्या ४ सोंगटयांप्रमाणे यात सुद्धा ४ वेगवेगळ्या कथा आहेत. पण या ४ गोष्टीतली पात्र ही एकाच खेळाचा भाग आहे आणि या प्रवासात ते कसे एकमेकाला सामोरे येतात हे बघण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघायलाच हवा!

ओटीटी सारख्या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या हिंदी सिनेमांपैकी लोकांनी भरभरून प्रेम दिलेला हा एकमेव सिनेमा.

पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, सानिया मल्होत्रा, फातीमा सना शेख अशी स्टारकास्ट या सिनेमात असून या २ दिवसात हा सिनेमा तुम्ही जरूर बघाच!

 

५. द ग्रीन माईल :

 

 

टॉम हँक्स या अप्रतिम अभिनेत्याचा ग्रीन माईल हा सिनेमा सुद्धा नेटफ्लिक्स वर इंग्लिश तसेच हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

एका जेलरच्या सेल मध्ये सुपरनॅच्युरल पॉवर असलेला एक कैदी येतो आणि तिथे त्या जेल मध्ये तो जे काही करतो ते पाहून त्या सेल मधले सगळे ऑफिसर अचंबित होतात.

अमरत्व म्हणजे नेमकं काय आणि कुणी अमर होऊ शकतो का? यावर फार सुंदर भाष्य करणारा आणि शेवटी तुमच्याही डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा तर तुम्ही अजिबात चुकवू नका!

 

६. फौदा :

 

 

ही ३ सीजनची एक हिब्रू सिरिज आहे, जी इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे. ही एक स्पाय थ्रिलर सिरिज असून. इस्राइलच्या काही गुप्त कारवायांवर ही सिरिज आधारित आहे!

इस्रायलच्या गुप्तहेर खात्यात काम करणाऱ्या एका युनिटची ही गोष्ट आहे. इस्राइल आणि फिलीस्तिन यांच्यात असलेलं वैर आणि एकंदरच इस्रायलचा इतिहासाची याला खूप सॉलिड बॅकग्राउंड आहे!

हिब्रू जरि असली तरी ही सिरिज एकदा बघायला सुरू कराल तर थांबण मुश्किल आहे. कारण अत्यंत फास्ट पेस्ड आणि अॅक्शन सिक्वेन्स ने भरलेली ही सिरिज तुमचं अगदी पुरेपूर मनोरंजन करते!

 

७. ब्रेकिंग बॅड :

 

 

अमेरिकेतल्या एका छोट्या शहरात राहणारा केमिस्ट्री प्रोफेसर एक ड्रग लॉर्ड बनतो, पण त्यामागे असलेली त्याची कारणं आणि या सगळ्या कथेचा होणार शेवट तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतो!

आजवरचा सर्वात टॉप रेटिंग असलेला हा वेबशो एक वेगळीच किक देतो! यातलं प्रत्येक पात्रं, प्रत्येक सीन आणि खासकरून यातलं मुख्य पात्र walter white तुमच्या मनात कायमची जागा निर्माण करतं!

तब्बल ५ सीझन असलेली ही वेबसिरीज तर अजिबात चुकवू नका कारण हा शो म्हणजे आजवरचा सर्वात बेस्ट शो आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version