Site icon InMarathi

इथे देश सोडण्यास मनाई आहे : ‘उत्तर कोरिया’तील हादरवून सोडणारी हुकूमशाही

North Korea im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी भारताला असुरक्षित, असहिष्णू म्हणून नावे ठेवण्याचे फॅड आले होते. भारतासारखा देश जिथे लोकांना वाट्टेल तसं बरळत सुटण्याची मुभा आहे, असा देश जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही.

ज्यांना जे सहज मिळतं, त्यांना त्याची किंमत नसते. म्हणूनच सहजगत्या स्वातंत्र्य उपभोगायला मिळत असतानाच आपल्याच देशाला अशी नावं ठेवण्याचे भिकेचे डोहाळे काही जणांना लागतात.

तुम्हाला जर सांगितले की जगात असेही काही देश आहेत जिथे लोकांची केसांची स्टाईल सुद्धा सरकार ठरवतं, तर तुम्ही म्हणाल की मी मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं म्हणून देवाने मला भारतात जन्म दिला. तर जाणून घेऊया अशाच एका देशाविषयी…उत्तर कोरिया विषयी…जिथले नागरिक म्हणत असावेत “मरणाने केली सुटका, सरकार ने छळले होते”!

 

 

Democratic people’s republic of Korea हा एक भयंकर देश आहे. आणि ह्या देशाचे सर्वेसर्वा आहेत Kim Jong- Un. ह्या देशातल्या अजब कायद्यांबद्दल वाचल्यावर तुमचे डोके गरगरायला लागू शकते.

DPRK हा देश स्वतःला लोकशाही देश म्हणवतो. ह्यांच्याकडेही निवडणूक दर पाच वर्षांनी होते. फक्त आपल्याकडच्या सारखे इकडे भरपूर उमेदवार नसतात. इकडे फक्त एकच उमेदवार असतो आणि नागरिकांना compulsory फक्त त्यालाच मत द्यावे लागते. आहे की नाही अजब निवडणूक?

 

 

उत्तर कोरियामध्ये ‘निष्ठा’ ह्या भावनेला फार महत्व आहे. तुम्ही फोटोत बघितले असेल की त्यांचा हुकूमशहा समोर असताना किंवा माजी हुकूमशहाच्या पुतळ्यासमोर उभे असताना सगळे लोक अश्रू ढाळत असतात. हे अश्रू ढाळणे, भावना व्यक्त करणे सुद्धा खरे असावे लागते. असं म्हणतात की सरकारी यंत्रणेचे गुप्तहेर फक्त गर्दीतल्या माणसांचे निरीक्षण करण्यासाठी ठेवलेले असतात.

जर त्या गुप्तहेरांना जराही संशय आला की एखादा माणूस खोटे रडायचे नाटक करतोय, तर त्याला लगेच अटक करून शिक्षा केली जाते कारण त्याला त्याच्या नेत्याविषयी निष्ठा नाही.

नाहीतर आपल्याकडे बघा! आपल्याकडे लोक खुलेआम वाटेल त्याची उघड निंदा करत असतात. मग तो देव असो की पंतप्रधान!

 

 

संसाधनांच्या कमतरतेमुळे उत्तर कोरियामध्ये नाईलाजास्तव मानवी विष्ठा खत म्हणून वापरावी लागते. (तिथल्या लोकांना दुसरा इलाजच नाही) आणि आपल्याकडे इतक्या सुविधा असून सुद्धा लोक शेतकरी, शेती ह्यांनासुद्धा राजकारणासाठी सोडत नाहीत.

 

 

उत्तर कोरियामध्ये Three Generation Punishment चा कायदा आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध झाला, तर त्याच्यासकट त्याच्या पालकांना, त्याच्या नवरा किंवा बायकोला आणि मुलांना सुद्धा सश्रम कारावासासाठी वर्क कॅम्प मध्ये पाठवले जाते.

इतका कठोर कायदा आपल्याकडे नसल्यानेच बहुदा लोकांना देश असहिष्णू वाटत असावा.

 

 

ह्या देशातला आणखी एक विचित्र कायदा म्हणजे इथे Marijuana लीगल आहे. Marijuana ला येथे ड्रग मानत नाहीत. गर्दुल्यांसाठी पर्वणीच जणू!

 

 

अमेरिकेच्या दबावाखाली मोठे मोठे देश येतात. त्यांच्या सैन्याशी पंगा घेणं म्हणजे युद्धाला आमंत्रण देण्यासारखे आहे. परंतु उत्तर कोरिया हा असा एकमेव देश आहे ज्याने अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजावर कब्जा करून ते ताब्यात घेतले आहे.

 

 

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी कालगणना सारं जग मानतं ती कालगणना उत्तर कोरिया मानत नाही. आपलं २०१८ सुरु आहे पण त्याचं साल १०५ सुरु आहे. त्यांची कालगणना Kim II – Sung ह्यांच्या जन्मवर्षानंतर सुरु झाली आहे. विश्वास नाही ना बसत?

 

 

फेसबुक, व्हॉट्सऍप ह्याशिवाय आपला दिवस सुरु होत नाही. पण उत्तर कोरिया मध्ये साधं गुगलच काय इंटरनेट वापरावर सुद्धा बंदी आहे. इंटरनेट तर सोडाच, टीव्हीवर सुद्धा फक्त ३ च चॅनेल्स लागतात.

कसे जगतात लोक ह्या देशात!

 

 

जगात रोज नवनवीन फॅशन ट्रेंड येत असताना उत्तर कोरिया मध्ये मात्र पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही फक्त ठराविकच हेअरस्टाईल ठेवण्याची परवानगी आहे. हे जरा जास्तच झालं नाही का?

 

 

उत्तर कोरियाचा हुकूमशहा Kim Jong -Un ह्याने आपल्या काकांचा अतिशय निर्घृण पद्धतीने वध करवला. त्याने त्याच्या काकांना विवस्त्र करून १२० भुकेली कुत्री असलेल्या पिंजऱ्यात निर्दयपणे फेकून दिलं. त्यानंतर त्याने त्याच्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना ठार केलं.

 

 

ह्या निर्दयी आणि अविचारी हुकूमशहाने एका “pleasure army” ची स्थापना केली आहे. ह्या pleasure army मध्ये तरुण, सुंदर मुलींची नियुक्ती केली जाते. ह्या मुलींना उच्चपदस्थ, निष्ठावान सरकारी अधिकाऱ्यांना ‘entertain’ करण्याचे आणि त्यांना “sexual services” देण्याचे काम असते.

 

 

तुम्ही ह्या देशात गेलात तर तुमचा पासपोर्ट आणि मोबाईल फोन एअरपोर्ट वरच जप्त केले जातात. तुमच्या सोबत एक अधिकारी कायम असतो, तुमच्यावर सरकारी यंत्रणांची नजर असते.

तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फोटो काढण्याची किंवा स्थानिकांशी बोलण्याची परवानगी दिली जात नाही.

तुम्हाला तुमच्या मनाने कुठेही फिरण्याची परवानगी दिली जात नाही.

 

 

आता तुम्हाला वाटत असेल लोक ह्या देशात कसे राहत असतील ? त्यांना पळून जाण्याची नक्कीच इच्छा होत असणार!

===

पण ह्या सर्वाचा कळस म्हणजे –

लोकांना पळून जाण्याची सुद्धा सोय नाही कारण कुणीही पळून जाऊ नये म्हणून सीमेवर सैन्याची माणसे कायम तैनात असतात. ह्या पेक्षा क्रूर, निर्दयी हुकूमशहा बघितला आहे का?

 

 

उत्तर कोरियातल्या विचित्र नियमांबद्दल जाणून घेतल्यावर आपण देवाचे शतशः आभार मानायला हवेतच, कारण भारतासारख्या खऱ्या अर्थाने  स्वतंत्र असणाऱ्या देशात आपण जन्म घेतला आहे. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version