' १० रुपयांत पुस्तकं देऊन, उदरनिर्वाह चालवणाऱ्या ‘वाचनवेड्याची’ वाचा कहाणी! – InMarathi

१० रुपयांत पुस्तकं देऊन, उदरनिर्वाह चालवणाऱ्या ‘वाचनवेड्याची’ वाचा कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“वाचन हे आपल्या मेंदूला आवश्यक असणारं खाद्य आहे” असं विज्ञानात सांगितलं आहे. वाचनात इतकं सामर्थ्य आहे की, त्यामुळे तुमची अशांत वृत्ती ही क्षणात शांत होत असते.

आपल्या आजूबाजूला काय घडत आहे? हे विसरायला लावतं ते म्हणजे पुस्तक. सध्या पुस्तकांची जागा ही मोबाईल वरील वाचनाने आणि किंडल सारख्या प्लॅटफॉर्मने घेतली आहे हे आपण बघतच आहोत.

 

kindle inmarathi

 

माध्यम कोणतंही असो, लोक परत वाचायला शिकले आहेत ही आनंदाची बाब आहे. आज ऑनलाईन माध्यमातून कित्येक नवीन पुस्तकं विकली आणि वाचली जात आहेत.

सोशल मीडिया वरील ब्लॉग च्या माध्यमातून कित्येक लोकांना आपल्या वाचनाची भूक भागवता येत आहे आणि लेखकांना लिखाणाची संधी उपलब्ध होत आहे ही चांगली बाजू म्हणता येईल.

“प्रत्यक्ष पुस्तक विक्री कमी झाली आहे” ही चर्चा सुरू असतांना ‘भाडं देऊन पुस्तक घेऊन जाणे’, ‘वाचणे’ आणि ‘परत आणून देणे’ हा एक पर्याय कित्येक मोठ्या कंपन्यांनी अवलंबला आहे.

हे झालं पुस्तक व्यवसायात सध्या बदललेल्या समीकरणा बद्दल.

पण, आज आम्ही ‘राकेश’ या अंधेरी मधील रोड साईड दुकान चालवणाऱ्या विक्रेत्या बद्दल सांगणार आहोत. जो की, कोणतंही पुस्तक फक्त १० रुपयांत भाड्याने देतो आणि लोक ते पुन्हा आणू देतील असा त्यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवतो.

नाव, नंबर लिहून घेण्यासाठी कोणतंही रजिस्टर नाही, कोणतं कम्प्युटर नाही, सॉफ्टवेअर नाही.

राकेशने हा व्यवसाय सुरू करण्याचं आणि कोरोनाच्या कठीण परिस्थितीत सुद्धा तू सुरू ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याला स्वतःला वाचनाचं असलेलं प्रचंड वेड.

कोणत्याही नवीन व्यक्तीला पुस्तक देतांना तो एकच कळकळीची विनंती करतो की, “तुमचं पुस्तक वाचणं झाल्यावर कृपया करून ते पुस्तक वापस आणून द्या.”

एका हाताने आधू असणाऱ्या राकेश ला त्याच्या परिस्थती बद्दल कोणतीही तक्रार नाहीये. त्याला फक्त एकच गोष्ट आनंद देते की, तो पुस्तकांच्या गराड्यात आहे आणि रोज च्या रोज त्याला नवीन भाषेतली, नवीन विषयांवरची पुस्तकं वाचायला मिळत आहेत.

 

rakesh book seller inmarathi

 

बस, इतकीच गोष्ट त्याच्यासाठी खूप आहे. त्याच्याकडे ना मोबाईल आहे, ना वायफाय आहे, ना टीव्ही आहे. राकेश हा दिवसभर फक्त पुस्तकच वाचत असतो.

पुस्तक वाचनाच्या सवयीचं तर कौतुक आहेच, पण वाचन करतांना मध्येच इतर कशाचीही आठवण येत नाही ही जास्त कमालीची आणि शांत मनाची गोष्ट आहे.

लॉकडाऊनच्या काळात राकेशला कित्येक लोकांनी मदत करायची इच्छा दाखवली. पण, राकेशने कोणाचीही आर्थिक मदत घेतली नाही.

राकेशने त्यावेळी असं सांगितलं होतं की, “प्रत्येक जण यासाठी पैसे कमावतो की त्याला जे आवडतं ते त्याला करता येईल. मला जे आवडतं ते म्हणजे वाचन आणि त्यासाठी लागणारे पुस्तकं हे सतत माझ्या आजूबाजूलाच असतात.

माझ्यासाठी माझं खाणं पिणं म्हणजे वाचनच आहे. माझ्यासाठी जे आहे ते भरपूर आहे. माझ्या डोक्यावर छत आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुम्हाला आर्थिक मदत करायचीच असेल तर त्यांना मदत करा ज्यांना त्याची जास्त आवश्यकता आहे.”

राकेश बद्दल लोकांना कसं कळलं?

काही दिवसांपूर्वी IAS ऑफिसर अवनिष शरण यांनी राकेशचा फोटो आणि त्याच्या या वाचनाच्या आवडी बद्दल ट्विट करून सगळ्या नेटिझन्स समोर आणलं.

दोनच दिवसात या ट्विटला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने राकेशच्या विचारांचं खूप कौतुक केलं. कित्येक लोकांनी राकेशला आर्थिक मदत करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली.

काही लोकांनी राकेशच्या शांत मनाचं कौतुक केलं. तर काहींनी त्याच्या पैश्या शिवाय सुद्धा आनंदी राहू शकण्याचं आश्चर्य व्यक्त केलं.

कित्येक वर्षांपासून राकेश हा त्याच १० रुपयांच्या किमतीत कोणतंही पुस्तक लोकांना भाड्याने देतो ही सुद्धा कमालीची गोष्ट आहे.

काही व्यवसाय हे दरवर्षी आपल्या वस्तू आणि सेवांचं मूल्यमापन करतात आणि किंमत काही टक्क्याने तरी नक्कीच वाढवत असतात.

यातील कोणताही विचार सुद्धा राकेशला येत नाही हेच त्याच्यातील सच्च्या पुस्तक प्रेमाचं आणि ती आवड लोकांमध्ये वाढावी याची तळमळ दिसून येते.

मुंबईच्या लोकांमध्ये दिसणारं एक फायटिंग स्पिरिट हे राकेश मध्ये सुद्धा दिसतं. कठीण परिस्थितीत जगत असून सुद्धा तो स्वतःच्या उदरनिर्वाहाची जवाबदारी स्वतःवर घेतो ही गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे.

 

rakesh book seller featured inmarathi

 

 

“आनंदी राहण्यासाठी काय करावं ?” यासाठी सध्या बरंच विचार मंथन आणि काही ऑनलाईन कोर्सेस सुद्धा घेतले जातात. खरा आनंद हा अश्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा असतो हे आपण दिवसेंदिवस विसरत चाललो आहोत.

एक चांगलं पुस्तक, मित्रांसोबतचा थोडासा वेळ हे सुद्धा खूप आनंद देऊ शकतात हे राकेश सारख्या लोकांबद्दल वाचलं की लगेच लक्षात येतं.

आपल्या पैकी ज्याही लोकांना अंधेरी पूर्वच्या मारोळ-मारोशी रोड वरील अंकल्स किचनच्या बाजूला असलेल्या त्याच्या दुकानाला भेट देऊन पुस्तक भाड्याने घेणं शक्य आहे त्यांनी ते अवश्य करावं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?