' “मेक इन इंडिया” चा नारा सर्वप्रथम दिला होता नेहरूंनी, भारतीय आर्मीसाठी, वाचा! – InMarathi

“मेक इन इंडिया” चा नारा सर्वप्रथम दिला होता नेहरूंनी, भारतीय आर्मीसाठी, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘मेड इन इंडिया’ ही टर्म आपण कधी पहिल्यांदा ऐकली असेल? साधारणपणे ९० च्या दशकात जेव्हा भारताच्या आर्थिक धोरणात मोठे बदल करण्यात आले होते. या धोरणा नंतर बरेच नवीन उद्योग हे भारतात येण्यासाठी उत्सुक होते.

सामान्य माणसांसाठी ‘मेड इन इंडिया’ हे शब्द लोकप्रिय झाले ते ह्याच शब्दाच्या एका श्रवणीय गाण्यामुळे.

१९९५ मध्ये रिलीज झालेलं आलिशा चिनॉय या गायिकेच्या अल्बमचं हे गाणं लोक आजही गुणगुणतात हे आपण मान्य कराल.

 

made in china inmarathi

 

कोणत्याही देशासमोर ‘आयात कमी करणे’ आणि ‘निर्यात वाढवणे’ ही दोन आव्हानं असतात. प्रत्येक देशात राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्याच देशात तयार झालेले उत्पादन हे कधीही कमी वेळेत आणि कमी दरात नेहमीच उपलब्ध होत असतात.

जपान आणि जर्मनी या दोन देशातील लोकांना हे तत्व सर्वात आधी कळलं आणि म्हणून ते आज प्रगत देश आहेत. भारतात आजही ‘मेक इन इंडिया’ या नावाची मोहीम चालवावी लागते ही खरं तर एक शोकांतिका आहे.

१९५२ मध्ये सुद्धा ‘मेड इन इंडिया’ वस्तू वापरण्यावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक विशेष उल्लेखनीय प्रयत्न केला होता. पण, ही घटना तेव्हा एका मोहिमेचं स्वरूप घेऊ शकली नाही.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्याचा तो काळ होता. त्या काळात ‘रॉयल एनफिल्ड’ ही बुलेट ब्रिटिश आर्मीचे जवान वापरत असत.

कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर आपली गती आणि ग्रीप न सोडणारी ही १२५ सीसी आणि २ स्ट्रोक इंजिन असलेली बुलेट ची एका एका लांबड्या पॅकिंग मध्ये पॅक करून युद्धभूमीवर पॅराशूट मधून पोहोचवली जायची.

आर्मी जवानानांमध्ये ही बुलेट अर्थातच खूप लोकप्रिय झाली होती आणि आजही आहे. चालवायला हलकी असलेली ही बुलेट तेव्हा युद्ध भूमीवर काही वस्तूंची ने-आण करण्यासाठी वापरली जायची.

भारतात ‘रॉयल एनफिल्ड’ ही बुलेट त्या वेळी मद्रास मोटर्स लिमिटेड ही कंपनी आयात करायची. के आर. सुंदरम अय्यर आणि त्यांचा पुतण्या के. ईश्वरन हे मद्रास मोटर्सचे मालक होते.

 

bullet inmarathi

 

ते या व्यतिरिक्त ते BSA सायकल्स सुद्धा भारतात आयात करून विकायचे.

‘इंग्लिश सायकल्स’ नावाने सुरू असलेलं एक दुकान त्यांनी काही वर्षांनी खरेदी केलं आणि त्या कंपनी मध्ये ते इंग्लंड मधून सायकल्स घेऊन यायचे आणि विकायचे.

तामिळनाडू मधील आपल्या राहत्या ठिकाणाहून ते हा व्यवसाय करायचे. इंडियन आर्मीच्या जवानांसाठी ५०० बुलेट्सची पहिली ऑर्डर ही त्यावेळी मद्रास मोटर्सला देण्यात आली होती.

३५० सीसी पॉवर असलेल्या बाईक्स जेव्हा भारतीय रस्त्यांवरून धावू लागल्या तेव्हा लोकांसाठी हा एक वेगळाच रॉयल अनुभव होता जो की आजही लोकांना तितकाच आवडतो.

बुलेट वापरणारी व्यक्ती ही त्याच्या सोबत एक अभिमानाची भावना घेऊन वावरत असते. चालवायला दणकट आणि मेंटेनन्स फार नसणारी बुलेट ही त्यावेळी भारतीय सीमेवर छोट्या सामानाची ने-आण करण्यासाठी प्रामुख्याने वापरली जायची.

या आधी वापरात असलेल्या BSA बाईक्स पेक्षा ही बुलेट भारतीय जवानांना खूप आवडल्या होत्या. BSA बाईक्स मध्ये नेहमीच काही ना काही तांत्रिक बिघाड व्हायचा आणि आयात केलेली असल्याने पार्ट्स उपलब्ध नसायचे.

‘रॉयल एनफिल्ड’ या बुलेट वर इंडियन आर्मी अक्षरशः फिदा झाली होती आणि त्यांना अजून बुलेट्सची ऑर्डर द्यायची होती.

भारत सरकार कडे जेव्हा हा प्रस्ताव गेला तेव्हा तत्कालीन नेहरू सरकारने एक मत मांडलं की, या बुलेट्स भारतात बनल्या पाहिजेत जेणेकरून त्या कमीत कमी किमतीत उपलब्ध होतील आणि स्पेअर पार्ट्स चा सुद्धा प्रश्न नसेल.

 

jawaharlal nehru inmarathi

 

ते एक अशी कंपनी शोधत होती जी की ‘रॉयल एनफिल्ड’ बुलेट्स ला भारतात बनवू शकेल आणि त्याद्वारे भारतात एक औद्योगिक वातावरण सुद्धा निर्माण होईल.

‘रॉयल एनफिल्ड’ बुलेट तयार करणारी ब्रिटिश कंपनीने भारत सरकारने त्यांच्या समोर ठेवलेल्या अटींवर भारतात ही बुलेट तयार करायला मान्यता दिली.

त्यासाठी आवश्यकता होती ती एक जॉईंट व्हेंचर तयार करून त्या कंपनीचं काम भारतात सुरू करायचं. टी. टी. कृष्णम्माचारी हे तेव्हा वाणिज्य मंत्री होते.

१९५५ मध्ये ‘एनफिल्ड इंडिया लिमिटेड’ ही कंपनी सुरू करण्यात आली ज्यामध्ये मद्रास मोटर्स यांना ५१% भागीदारी देण्यात आली आणि ‘रॉयल एनफिल्ड’ ला ४९%.

एनफिल्ड इंडिया लिमिटेडची सुरुवात ही अपेक्षेप्रमाणे दणक्यात झाली आणि इंडियन आर्मी साठी बुलेट्स तयार करण्याचं काम १९५६ पासून उत्तर मद्रास मधील प्लांट मध्ये सुरू झालं.

पहिल्या वर्षी १६३ बुलेट्स तयार करण्यात आल्या. पूर्णपणे भारतात (स्पेअर पार्ट्स सकट) ‘रॉयल एनफिल्डला’ तयार होण्यासाठी १९६२ ची वाट बघावी लागली होती.

तेव्हापासून भारत हा रॉयल एनफिल्ड बुलेट तयार करणारा आणि विकणारा देश झाला.

के आर. सुंदरम ऎयर यांचा मोठा मुलगा एस. संकरन आणि लहान मुलगा एस. आर. सुब्रमण्यम हे मद्रास मोटर्स हे प्रमुख झाले आणि त्यांनी ‘रॉयल एनफिल्डच्या’ भारतातील मॅन्युफॅक्चरिंग आणि वितरणाची धुरा सांभाळली.

 

madra motors inmarathi

 

कमी स्पर्धा असलेल्या त्या काळात ‘रॉयल एनफिल्ड’ ला मार्केट कडून चांगला प्रतिसाद मिळत होता. १९५२ च्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या ५०० ‘रॉयल एनफिल्डच्या’ ऑर्डर नंतर सुरू झालेला हा प्रवास आजही सुरूच आहे.

आपल्या विशिष्ट फायरिंग आणि लुक्स मुळे बुलेट ही नेहमीच एक प्रतिष्ठेचं वाहन मानलं जाते आणि बघणाऱ्या व्यक्तीला “वाह…” म्हणायला भाग पाडते.

वेस्टलँड पब्लिकेशनने काही वर्षांपूर्वी अमरीत राज यांच्या एका फोटो द्वारे ‘रॉयल एनफिल्ड’ ला ‘इंडियन आयकॉन’ हे नाव दिलं होतं. एका सरकारी धोरणामुळे एनफिल्ड इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतात सुरू झाली.

कित्येक लोकांना त्याद्वारे रोजगार मिळाला. आपल्या गणतंत्र दिवसाची परेड ही भारतात तयार होणाऱ्या ‘रॉयल एनफिल्ड’ वरील भारतीय सैनिकांच्या प्रात्यक्षिकाने अजूनच प्रेक्षणीय झाली असं म्हणता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?