Site icon InMarathi

केवळ प्रेम, हँडसम लुक्स यापेक्षा या ९ गोष्टींच्या शोधात असतात मुली!

Vijay Deverakonda im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील सगळ्यात मस्त गोष्ट कोणती? कुणाला वाटेल मैत्री…कुणी म्हणेल प्रेम. कुणाला वाटेल सुंदर दिसणं.. कुणी सांगेल पैसे.. पण याहीपेक्षा एक गोष्ट सगळ्यात मोठी आहे जीवनसाथी चांगला मिळणं.‌ पैसा येतो…पैसा जातो. सौंदर्य वाढत्या वयाबरोबर नष्ट होत जातं, पण टिकून राहतो तो माणसांचा संबंध.

स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम् देवो न जानती कुतो मनुष्यः|

म्हणजे स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य देवांना उमगलं नाही तिथं माणसाला काय समजणार? इथं चरित्र यांचा अर्थ चालचलन असा नाही.. तिचं मन.. तिच्या मनात काय आहे..काय नाही.

खूपदा एखाद्या कारणानं आपल्या नवऱ्यानं आपल्याला गिफ्ट द्यावं अशी मूक अपेक्षा बायकोची असते. त्यानं ते दिलं नाही तर त्या म्हणून दाखवतात, की आज मला काहीतरी गिफ्ट द्याल किंवा देशील असं वाटलं होतं. मग नवरा किंचित खजिल होऊन तुला हवं ते घे म्हणून पैसे देतो. तेव्हा बायको म्हणून दाखवते… आता काय! मी मागितल्यावर दिलं… आपल्या मनानं कुठं दिलं!

म्हणजे गिफ्ट दिलं तरी ते आपण वसूल केलं हे काही बाईच्या मनातून जात नाही. नवरा कसं वागावं हे न कळल्यामुळे गप्पगार होतो. म्हणजे बाईला नेमकं काय हवं असतं?

हे ही वाचा – प्रेमासाठी स्वतःच्या या ८ गोष्टी बदलल्या तर नात्यात तुमचं अस्तित्व हरवून बसाल

 

 

दागिने, साड्या, शाॅपिंग, हाॅटेलात खाणं, फिरायला जाणं हा बायकांचा वीक पॉइंट असतो का? काहींचा असेल. पण सगळ्याच बायका यावर फिदा नसतात. रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला मित्र, प्रियकर, नवरा बायकांना हवाच असतो का?

नाही..बायकांची अपेक्षा खूप साधी सोपी असते. रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला माणूस स्वभावाने कुजकट, हेकेखोर, भांडकुदळ, व्यसनी असेल तर त्या रुबाबदार दिसण्याचा उपयोग काय? पण चारचौघांसारखा दिसणारा आणि काळजी घेणारा, प्रेमळ, आदरानं वागवणारा माणूस हा कधीही सरसच असतो.

आपल्याला हवा तो मिस्टर राईट शोधत एलिझाबेथ टेलर यांनी सात विवाह केले होते. का? त्यांचा शोध दरवेळी फसला का? बायकांना नेमकं काय हवं असतं?

वाढणारे घटस्फोट पाहता मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं म्हटलं जातं. हातात पैसा आहे म्हणून त्यांना लग्नाची गरज नाही असंही म्हणतात लोक. पण यात तथ्य आहे का? कारण इतकं शिक्षण पूर्ण करुन, उत्तम पगाराची नोकरी असूनही मुलं मुली ठरवून किंवा प्रेमविवाह करताना दिसतातच ना!

खूपदा एखाद्या जोडीला पाहून लोक म्हणतात हा कसला तरीच आहे, पण तरीही ती मुलगी मनोमन प्रेम करते त्याच्यावर. संसार छान सुरळीत करतानाही दिसतात ते. मग प्रश्न पडतो की खरंच मुलींना काय हवं असतं?

 

१. आदर-

 

 

आयुष्यात साधं सरळ गणित असतं…आदर द्या आणि आदर घ्या! आपला आत्मसन्मान हा सर्वात मोठा असतो, पण अहंकार आणि आत्मसन्मान यात अतिशय अस्पष्ट रेष असते.

आत्मसन्मान जपणारा, चार चौघात अपमानास्पद वागणूक न देणारा पुरुष कोणाही स्त्रीच्या आदराला पात्र असतो. तो देणारा पुरुष स्त्रीला आवडतो.

२. प्रेमळपणे वागणारा वागवणारा पुरुष-

 

 

केवळ आपल्याशीच नाही, तर आपल्या माणसांना प्रेम देणारा, त्यांचीही काळजी घेणारा पुरुष स्त्रीयांना जवळचा वाटतो. खूपदा बायकोनं आपल्या आई वडिलांना विचारावं, त्यांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा मुलाची असते. आजकाल जावयालाही मुलगा समजून सासू सासरे वागतात.. तर मुलीचीही अपेक्षा असते, की त्यानंही आपल्या माहेरच्या माणसांचा आदर ठेवावा. काळजी घ्यावी.

रोज रोज उठून माहेरी जावं असं कधीच कोणी अपेक्षा करत नसतं. पण अधूनमधून चौकशी करावी एवढीच माफक अपेक्षा असते. जो पुरुष हे छोटेसे पण महत्त्वाचे धोरण पाळतो तो कधीही आदराला, प्रेमाला पात्र असतो.

 

३. छोट्या छोट्या गोष्टी सांभाळणारा-

 

 

कोणतीही स्त्री अख्खं स्वयंपाकघर सांभाळते. तिला एक कप चहा किंवा कॉफी करुन घेणं अवघड नसतं. कधीतरी नवऱ्यानं अचानकपणे दिलेला एक आयता कप पण तिला खुश करुन जातो.

कामाच्या रामरगाड्यात दमून गेलेल्या पत्नीला नवरा जेव्हा म्हणतो, दमलीस..आता बास झालं ते काम आराम कर.. तेव्हा बायकोच्या आनंदाला पारावार उरत नाही. अशा दिसताना किरकोळ दिसणाऱ्या पण मोठ्या आनंददायी गोष्टी सांभाळणारा पुरुष कधीही आवडतोच.

 

४. उत्तम श्रोता-

 

 

स्त्रीला एक ऐकणारा कान हवा असतो. कितीतरी प्रश्न, त्याची उत्तरं तिला ठाऊक असतात. कधी-कधी त्याला इलाज नाही हे पण दिसत असतं. त्यावर इलाज सुचवा असंही तिला वाटत नसतं. पण ती मनमोकळेपणाने बोलते ते बोलणं ऐकणारा नवरा..मित्र सदैव त्यांच्या हृदयाजवळ असतो.

 

५. आपुलकीने वागणारा-

कोणत्याही परिस्थितीत आपण आहोत…आपण करुया असं म्हणून आश्वस्त करणारा पुरुष कधीही आदराला प्रेमाला पात्र असतो. जो मी…माझं करत राहतो त्या पुरुषापासून भलेही तो नवरा असला तरी स्त्रीया मानसिक अंतर राखून राहतात.

६. आनंदी राहणारा-

 

 

आपल्या सोबत असताना आनंदी राहणारा पुरुष स्त्रीला अतिशय प्रोत्साहित करतो. सोबत असताना तोंड पाडून, अबोलपणे धुमसत असलेल्या पुरुषाला स्त्रीया थंड प्रतिसाद देतात.

हे ही वाचा – ‘तिला’ प्रपोज करताय? तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी!

७. प्रत्येकवेळी शारीरिक सुख न शोधणारा

 

 

काही वेळा मनातल्या थकव्याला एक आश्वासक मिठीही पुरेशी असते. त्याक्षणी दुसरा कसलाच स्पर्श नको असतो. असा आश्वासक आधार देणारा पुरुष स्त्रीला अतिशय आवडतो. त्यासाठी तो मदनाचा पुतळा हवा असं नसतं.

९. कधी कधी तिचं वेडेपण सहन करणारा-

 

 

प्रत्येक वेळी गंभीरच रहावं असं नसतं.. की स्वित्झर्लंडची ट्रीपच हवी असते असंही नसतं. जवळपास कुठंतरी चालत जावं सोबतीने.. एखादी पौर्णिमेची रात्र लांबवर चालत जाऊन यावं.. कधीतरी केलेल्या फालतू विनोदाला पण हसून दाद द्यावी..बस्स एवढ्या माफक अपेक्षा असतात स्त्रीच्या.

रुप, पैसा, हुद्दा, पगार या सर्वांच्या पुढे असतो तो सुस्वभाव. तुम्ही दिसायला राजबिंडे असाल‌ आणि स्वभावाने खत्रूड.. काय उपयोग त्या राजबिंडे असण्याचा. पण तुम्ही समजूतदार असाल..रुप दोन नंबर असलं तरी बिघडत नाही काही. तुमच्या वागण्यानं तुम्ही स्त्रीचं हृदय जिंकता. सुस्वभावी पुरुष जगात नेहमीच स्त्रीचं मन जिंकतो.. चांगला जोडीदार होतो.. हेच स्त्री पुरुषात शोधते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version