' वेदनारहित प्रसूती चांगली की वाईट? फायदे – तोटे समजून घ्या… – InMarathi

वेदनारहित प्रसूती चांगली की वाईट? फायदे – तोटे समजून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील सर्वात मोठं सुख अपत्यप्राप्ती होणं हे आहे, पण हे मूल जन्माला घालताना आईला अतिशय वेदनांचा सामना करावा लागतो. ज्याक्षणी आई बाळाचा चेहरा बघते त्याक्षणी सर्व वेदना विसरुन जाते.

असंही सांगितलं जातं, की ज्यावेळी प्रसूती होते त्यावेळी आईच्या शरीरात अशी संप्रेरके तयार होतात, की त्या क्षणाची वेदनादायी आठवण निसर्ग पुसून टाकतो. नंतर ते फारसं आठवतही नाही. म्हणजे निसर्गाने स्त्रीला ते सोसायची ताकद दिलेलीच आहे, पण त्या वेदना विसरण्याचीही सोय करुन ठेवली आहे.

 

baby delivery InMarathi

 

आजकाल बहुतेक लोकांचा कल हा नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरीयन करण्याकडेच दिसतो. प्रसूतीच्या असह्य वेदनांना थोडा कमी करण्याचा प्रयत्न इतकंच. यावरही शास्त्रानं‌ अजून एक पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, वेदनारहित प्रसूती.

प्रसूती वेदना ही जगातील सर्व वेदनांपेक्षा कठीण आहे.. संपूर्ण शरीरातील हाडे एकाच वेळी चुराडा होतील इतक्या महाप्रचंड वेदना असतात त्या. त्या कमी करता येतील का? यासाठी शास्त्रानं ही पद्धत शोधून काढली आहे.

 

delivery pain inmarathi

 

 

काय असते ही वेदनारहित प्रसूती?

इंजेक्शन देऊन शरीराचा विशिष्ट भाग बधिर केला जातो. यामध्ये आईला इंजेक्शन देऊन तिच्या पोटापासूनचा भाग बधिर केला जातो. यातही अजून वेगळे प्रकार आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. इंजेक्शन देऊन बधिर करणं.

२. नाकाद्वारे वायू हुंगायला देणं.

३. एपिड्यूरल अनाल्जेसिक.

४. कमी प्रमाणात एपिड्यूरल देणे.

यातही स्पायनल अॅनेस्थेशिया म्हणजे केसाएवढ्या सुईने मज्जारज्जूच्या नसा बधिर करण्यासाठी इंजेक्शन दिले जाते. कमरेपासून खालील भाग बधिर केला जातो. यामुळे पूर्ण भूल देण्याचे दुष्परिणाम टाळता येतात.

 

anesthesia inmarathi

 

आणि दुसरा प्रकार म्हणजे पूर्ण भूल देणे.

निसर्गानं स्त्रीला पुरुषांपेक्षा कणखर बनवलं आहे, पण तरीही काही वेळा प्रसूती वेदना टाळून वेदनारहित प्रसूती करण्याकडं बहुतांश पाश्चात्य देशात कल असतो. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. फायदा आणि तोटा. या वेदनारहित प्रसूतीचे पण दोन्ही पैलू आहेत. काही फायदे…काही तोटे.

यातील सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेदनांपासून सुटका. मरणप्राय वेदनांपासून सुटका यामुळे मिळते. पण स्त्रीला काही परिणामांना तात्पुरतं किंवा कायमचं सामोरं जावं लागतं. काय आहेत फायदे तोटे?

१. प्रसूतीच्या दरम्यान ज्या वेदना सहन कराव्या लागतात, कळा देताना जी दमणूक होते ती दमणूक या पध्दतीत टाळता येते.

२. प्रसूतीच्या दरम्यान बाळही बाहेर येण्यासाठी पोटात फिरत असतं. त्यालाही जोर द्यावा लागतो.त्याचं डोकं खाली सरकावं लागतं. जर मणक्याकडे बाळाचं तोंड राहीलं, तर बाळाची पोझिशन बदलण्यासाठी डाॅक्टर इंजेक्शन देतात. त्यात असलेल्या एपिड्यूरलच्या कमी मात्रेमुळे आईच्या योनिमार्गात असलेले स्नायू शिथिल होतात आणि बाळ बाहेर यायला मदत मिळते.

 

 

३. नैसर्गिक प्रसूती दरम्यान आईचा रक्तदाब वाढू नये म्हणून काळजी घ्यावी लागते, पण या वेदनारहित प्रसूती दरम्यान हा प्रश्न निकालातच निघतो.

४. काही विशिष्ट प्रसंगी जर फोरसेप्स म्हणजे चिमटे वापरुन प्रसूती करायची वेळ आलीच, तर या वेदनारहित प्रसूतीचा चांगलाच उपयोग होतो.

५. नैसर्गिक प्रसूती दरम्यान स्त्रीला जे अनेक त्रास उद्भवतात त्यात पेल्व्हिक मसल्सचा त्रास होतो. पेल्व्हिक मसल्स म्हणजे शरीरातील पोटाच्या खाली असणारे अंतर्गत अवयव म्हणजे मूत्राशय, योनी, गुदद्वार. याचा संबंध थेट शारीरिक संबंध प्रस्थापित करताना येत असतो. या भागाला नैसर्गिक प्रसूती दरम्यान त्रास होऊन काहीतरी वेगळं दुखणंही उद्भवू शकतं. वेदनारहित प्रसूतीमुळं ही हानी कमी होते.

याबरोबरच याचे काही तोटेही आहेत. ते‌ पुढीलप्रमाणे:

१. पाठदुखी-

 

 

एपिड्युरलमुळे खूपदा स्त्रीयांना पाठदुखी, मळमळणं, चक्कर येणं असे त्रास होऊ शकतात.

२. रक्तदाब-

प्रसूती दरम्यान जर आईचा रक्तदाब एपिड्यूरलमुळं कमी झाला, तर बाळाच्या हृदयाचे ठोकेही मंदावतात आणि ते थोडं धोकादायक ठरू शकतं.

३. डोकेदुखी-

मणक्यात इंजेक्शन देताना जर ते औषध थोडंसं जरी गळालं, तरी आईला खूप जास्त प्रमाणात डोकेदुखी उद्भवू शकते.

४. काही केसेस मध्ये एपिड्यूरलमुळे नसांचे मोठे नुकसान होऊ शकते.

५. काहीवेळा ही वेदनारहित प्रसूती प्रक्रिया जास्त वेळ चालते त्यामुळं स्तनपानालाही अडचण येऊ शकते.

breast feeding inmarathi 1

 

६. वेदनारहित प्रसूती करताना इंजेक्शन देऊन पोटापासून खालचा सर्व भाग बधिर केला जातो त्यामुळं भूल उतरेपर्यंत चालताना, उठताना कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय हे शक्यच होत नाही.

थोडक्यात सांगायचं तर एपिड्यूरल वेदनारहित प्रसूती करायला मदत करतं, पण त्याचे परिणाम प्रसूतीनंतर पण दिसतात. त्यामुळं ती करण्याचा पर्याय तुमच्यासमोर आहे, पण तो वापरताना तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला हा जास्त महत्त्वाचा आहे.‌ प्रत्येक रुग्णाची प्रकृती वेगवेगळी असते. त्याला लागणारी औषधं पण वेगवेगळी असतात आणि ते केवळ तुमचे डाॅक्टरच सांगू शकतात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?