Site icon InMarathi

पॅनिक होणं साहजिक आहे पण पॅनिक अटॅक मात्र गंभीर, वाचा महत्वाच्या ५ टिप्स!

amitabh bacchan featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पॅनिक – हा एक इंग्रजी शब्द आहे. पण, त्याचा वापर सध्या बोली भाषेत इतका होत आहे की तो शब्द फक्त इंग्रजी भाषेपुरता उरलेलाच नाहीये. आपल्याकडे एक म्हण फार योग्य आहे, “रोगापेक्षा त्याची भीती अधिक वाईट.”

पॅनिक मध्ये असणं म्हणजेच ‘भीती वाटणं’ या परिस्थतीतून आजकाल खूप लोक जात आहेत.

मागच्या सहा महिन्यात प्रत्येकाने इतक्या वेगवेगळ्या परिस्थिती बघितल्या आहेत की साधं टीव्हीवरच्या बातम्या बघताना, नोकरी बद्दल असलेली अनिश्चिततेचा विचार करताना, आपल्यावर सध्या असलेल्या कर्जाचा विचार करताना कधीही कोणालाही टेंशन येऊ शकते.

इतकी वर्ष आपण सर्वात कठीण आजार म्हंटलं की, ‘हार्ट अटॅक’, ‘कॅन्सर’, ‘ब्लड प्रेशर’ ही नावं जास्त ऐकून आहोत. ‘पॅनिक अटॅक’ हे अजून एक नाव या यादीत समाविष्ट झालं आहे.

‘पॅनिक अटॅक’ चा साधारणपणे अर्थ सांगायचा तर ‘ती मनस्थिती जेव्हा तुम्हाला तुमचं जगणं, तुमचा पुढचा क्षण हा एखाद्या डोंगरा एवढा दिसायला लागतो.’

 

 

डोळ्यासमोर अंधारी येणे, कमालीची अस्वस्थता वाटणे ही या अटॅक ची काही लक्षणं म्हणता येतील. सध्या आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल ‘पॅनिक होणे’ ही मनस्थिती बऱ्याच वेळेस अनुभवायला मिळत आहे.

कितीही उपचार उपलब्ध झाले आहेत तरीही जवळच्या व्यक्तीला ‘कोरोना झाला’ हे दोन शब्दच आपली शांतता भंग होण्यासाठी पुरेसे आहे.

जवळच्या नात्यातील व्यक्तीचा फोन रीचेबल नसणे, मेसेज त्यांच्यापर्यंत न पोहोचणे यापैकी काहीही होत असेल की ‘पॅनिक मीटर’ आपलं काम करायला सुरुवात करते.

योग्य वेळी सकारात्मक व्यक्तींची साथ न मिळणे हे याचं मूळ कारण म्हणता येईल.

टेंशन निर्माण करणाऱ्या अटॅक मध्ये ह्रदयाची धडधड वाढते, घाम फुटतो किंवा श्वास कमी पडल्यासारखं वाटतं. छातीत दुखणे, मानसिक संतुलन बिघडणे किंवा अचानक मरणाची भीती वाटायला लागणे ही लक्षणं प्रामुख्याने दिसायला लागतात.

पाश्चिमात्य देशातून सुरुवात झालेल्या या आजाराची भारतात अजून तरी खूप रुग्ण वाढल्याचं चित्र दिसत नाहीये.

पण, अमेरिकेत मात्र त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ११% लोकांना दरवर्षी ‘पॅनिक अटॅक’ येतो असा एक डेटा उपलब्ध आहे. काय करता येईल असं काही आपल्याला न होण्यासाठी :

१. दीर्घ श्वसन :

 

 

कोणतंही काम करताना जर का तुम्हाला थोडं जरी अस्वस्थ वाटत असेल तर काही क्षण स्वतःसाठी काढावेत आणि दीर्घ श्वसन करावे. असं केल्याने ‘पॅनिक अटॅक’ चा धोका आणि तीव्रता ही नक्कीच कमी होत असते.

डॉक्टर एक अशी पद्धत सांगतात की, दीर्घ श्वसन करताना नाकाद्वारे श्वास घ्यावा, १ ते ५ पर्यंत मोजावे आणि तोंडाद्वारे श्वास सोडून द्यावा.

 

२. आराम करा :

 

 

आपल्या शरीराची ही गरज आपणच ओळखावी आणि आपल्याला जीवाची जी घालमेल होत आहे त्यामुळे जर डोकं जड वाटत असेल तर थोड्या वेळ चक्क आराम करा.

‘जान है तो जहान है’ या म्हणीप्रमाणे आपण तंदुरुस्त तर जग सुंदर हे कायम लक्षात ठेवावं.

टेन्शन येत आहे याची जाणीव व्हायला सुरुवात झाली की आपण घेतलेली एक ‘पॉवर नॅप’ आपल्याला परत ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकते.

 

३. डोकं शांत ठेवा :

 

 

‘पॅनिक अटॅक’ हा कोणता बाह्य आजार नसून ही एक अंतर्गत भीती आहे. जगापासून विभक्त झाल्याची भीती, आपण कोणालाच नको आहोत ही भीती आणि कोणीच आपल्याला चांगलं म्हणत नाहीये हा गैरसमज.

प्रत्येक जण सध्या व्यस्त असतो आणि उत्तम रीतीने आपल्या परीने संघर्ष करतच असतो. कोणाला कामं सोडून तुमचं कौतुक करायला वेळ नाहीये.

तुम्ही नोकरीवर आहात म्हणजे चांगलं काम करत आहात, तुमचं कुटुंब तुमच्यासोबत आहे म्हणजे तुम्ही त्यांचे हिरो आहात. हे स्वतःला सांगितलं तरी शांत वाटेल.

अस्वस्थतेच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी एखाद्या दृश्य वस्तूवर हात ठेवा, एखादा आवडणारा खाद्यपदार्थ खाऊन स्वतःचं लक्ष दुसरीकडे न्या.

 

४. गोष्टी मान्य करायला शिका :

 

 

एखादी घटना जेंव्हा आपल्या मनासारखी घडत नसते तेव्हा आपलं मन हे तिथेच अडकलेलं असतं. सगळं काही आपल्या मनासारखं होऊ शकत नाही ते मान्य करायला शिकावं आणि मुलांना हे लहानपणीच शिकवावं.

‘तुम्हाला काय सतावत आहे?’ हे याचं उत्तर निदान स्वतःला प्रामाणिकपणे द्या. एक तर ती गोष्ट मान्य करा, नाही तर त्याकडे दुर्लक्ष करायला सुद्धा शिकणं आवश्यक आहे.

दुर्लक्ष करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. काही जण बुद्धीबळ खेळतात तर काही लोक क्रिकेट बघतात. यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला लागू पडेल ते बघा आणि त्यानुसार कृती करा.

५. एनर्जी लाईन :

 

 

कोणत्याही कंपनीची जशी एक टॅगलाईन आपण नेहमी ऐकत असतो. तसंच, आपला आत्मविश्वास वाढेल यासाठी एखादी ओळ नक्की करा. अशी एखादी तर ओळ असतेच जी ऐकून आपल्याला छान वाटत असतं.

काही जणांसाठी ते देवाचं नाव असतं. तर काहींसाठी ही “हम होंगे कामीयाब… एक दिन” सारखी एखादी सकारात्मक ओळ असेल. याची अजून उदाहरणं सांगायची तर, “ऑल इज वेल”, “मी हे करू शकतो” ह्या ओळी सांगता येतील.

काही वेळेस आपण ठणठणीत असतो. पण, आपल्या एखाद्या घरातील व्यक्ती किंवा कलीगला भीती वाटत असते. त्यावेळी काय करावं?

१. जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत रहा. कधी कधी तुमचं सोबत असणं हे सुद्धा खूप मोलाचं असतं. त्याची जाणीव ठेवा.

२. त्या व्यक्तीला एखाद्या शांत ठिकाणी घेऊन जा.

३. शांत रहा. दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घ्या. त्या व्यक्तीला सतत “शांत हो” चा सल्ला देऊ नका.

४. “मी काही मदत करू शकतो का?” हे त्या व्यक्तीला विचारा. “काही लागलं तर तो सांगेलच” अशी अपेक्षा करू नका. त्याला स्वतःहून विचारा.

 

 

५. ही व्यक्ती तुमच्या सोबतच असल्यास दोघांनीही डोळे बंद करून दीर्घ श्वसन करावे. ही व्यक्ती लांब असेल आणि फोन वरून बोलत असेल तर त्यांना ‘स्ट्रेस बॉल’ सारखी एखादी वस्तू हातात घ्यायला सांगा.

‘पॅनिक अटॅक’ ची पूर्ण वेळ ही साधरणपणे २० ते ३० मिनिटे असते. त्या वेळात जर का तुम्ही शांत राहू शकलात किंवा समोरच्या त्रस्त व्यक्तीला शांत करू शकलात तर तुम्ही पुढे वाढणाऱ्या आरोग्य समस्या रोखू शकता.

हे सर्व सहज साध्य करण्यासाठी नियमित व्यायाम करणे, फिरायला जाणे सारखे उपाय आपल्या जीवनशैलीचा भाग असणं आवश्यक आहे.

कोणताही प्रश्न छोटा असतानाच त्यावर उपाय शोधा आणि तो उपाय आमलात आणा. छोट्या प्रश्नाचा डोंगर बनण्याची वाट बघू नका.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version