“संबंध” आलेल्या प्रत्येक पुरुषाच्या नोंदी जाहीर करून या सौंदर्यवतीने इतिहास घडवला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजच्या काळात स्त्री आणि पुरुष यांतील दरी जरी कमी होताना दिसत असली तरी यामागे स्त्रियांचा मोठा लढा आहे.चूल आणि मूल सोबत इतर ही जबाबदाऱ्या त्या सहज पार पाडू शकतात हे स्त्रियांनी दाखवून दिलेलं आहे. त्याबाबत कधी तरी नंतर बोलू.
पण स्त्रियांचा हा लढा काही लहान नाही, आगीतून फुफाट्यात जाणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्याला तोंड देत त्यांनी त्या घटना निभावून नेल्या.
कधी तर जीव गमवावा लागला, बदनामी सहन करावी लागली,पण त्याला पण न जुमानता त्या ताठ उभ्या राहिल्या आणि आजची सक्षम स्त्री आपणास दिसून येते.
स्त्रियांच्या अस्तित्वाचा लढा हा विषय निघाला की केरळच्या सवित्रीचा उल्लेख झाला नाही असं होतं नाही.
व्यभिचार झाला की त्यात फक्त स्त्री दोषी नसते तर ज्यामुळे तिला त्या प्रसंगाला प्रवृत्त व्हावं लागलं आणि ज्याच्या ज्याच्या मुळे तिला हे कृत्य करावं लागलं ते ते सर्व यामध्ये दोषी असतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे सिद्ध करण्यासाठी सावित्रीला स्वतः ला विद्रोही म्हणून उभं करावं लागलं. आणि विशेष म्हणजे हा लढा तिने जिंकला. तर बघूया आज याच सावित्री बद्दल जिच्यामुळे केरळ मधल्या नंबुदरी ब्राम्हण स्त्रियांच्या जगण्याला एक वळण मिळालं.
सावित्री ही केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातल्या नंबुदरी ब्राह्मण घरातली कन्या. दिसायला सुंदर आणि हुशार असल्याने कोणीही सहज प्रेमात पडेल अशी तिची एकूण छबी होती.
ऑर्थोडॉक्स घरातली असल्यामुळे वयाच्या १८व्या वर्षी ती विवाहाच्या बंधनात अडकली. पण वयाच्या २३व्या वर्षीच तिच्यावर खटला चालवला गेला.
आरोप होता वैश्यावृत्तीचा. जेव्हा खटला सुरू झाला तेव्हा तिने सगळे आरोप मान्य केले. पण हे सगळे अपराध तिने एकटीने केले नसल्याचे तिने जाहीर केले.
जर तिचे कृत्य जर अपराध असेल तर माझ्या सोबत हा दोष त्या पुरुषांचा सुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे यावर सावित्री अडून राहिली.
मुळात एवढ्या कमी वयात आजही ज्या वळणावर ज्यांच्या मुळे आली होती त्यांना अद्दल घडवण्यासाठी सावित्रीने हे पाऊल उचलले होते.
खटल्याच्या वेळेस सावित्री एका मागून एक नाव घेत गेली. कोणासोबत कधी संबंध प्रस्थापित केले कोणाच्या अंगावर कोणती निशाणी आहे याचं तंतोतंत वर्णन तिने केलं.
वेदांचे ज्ञाते, संस्कृत पंडित, मंदिरातील पुजारी, समाजतले मोठे नामवंत व्यक्ती सगळे यात होते. कोण उच्च कोण नीच काहीच भेद नव्हता, इथे सगळे तिचे गुन्हेगार होते.
सावित्रीला समजण्यासाठी आधी नंबुदरी महिलांच्या जीवनाबद्दल जाणून घेणे महत्वाचे ठरते.
या महिलांचे जीवन चौकट बद्ध असते की त्यांचे कौमार्य हे भंग नाही झाले पाहिजे. त्या महिला फक्त घरातून मंदिर आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांच्याच घरी जाऊ शकत होत्या ते पण नोकर सोबत असले तरच.
त्यांचे पूजा स्थान हे वेगळे असायचे. त्यांना शृंगार करण्याचा अधिकार नव्हता. सोन्याच्या दागिन्यांना त्या हात सुद्धा लावू शकत नव्हत्या. समाजाने त्यांना फक्त चांदीचे दागिने घालण्याचा अधिकार दिला होता.
त्यांना कायम पडद्याआड राहावे लागत असे, एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या भावासमोर आणि वडिलांच्या समोर देखील यायला परवानगी नव्हती.
नंबुदरी परिवारात मोठ्या मुलांची लग्न हीच फक्त त्यांच्या समाजातल्या मुलींशी होत असत. त्यामुळे घरातले लहान तरुण समाजाबाहेर मुलींशी लग्न करून आपला संसार थाटत असत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात नंबुदरी स्त्रिया या अविवाहित राहत असत, यापैकी कोणाला जर लग्नाला स्थळ आलंच तर तो आधी पासूनच विवाहित असल्याची शक्यता जास्त असायची.
बघायला गेलो तर या महिला जिवंत असतानाच नरक यातना भोगत होत्या. पण पुरुषांना मात्र देवतांचा दर्जा दिला गेला होता.
जर चुकून कोणा महिलेने कोणाशी प्रेम संबंध ठेवलेच तर समर्थविचारमची प्रक्रिया सुरू होत असे आणि त्या महिलेवर बहिष्कार टाकला जात असे.
सावित्री ला याच ‘समर्थविचारम’ च्या प्रक्रियेच्या माध्यमातून दंडीत केले जाणार होते. जर आरोप सिद्ध झाला तर गुन्हेगार महिलेला प्रथम एका कोठडीत कैद केले जात असे. मग कुटुंब प्रमुख राजाला खटल्याची माहिती देत असत.
राजा खटल्यासाठी एका प्रधान किंवा न्यायाधीशाची नियुक्ती करत असत, जो शक्यतो त्या गावचा किंवा आजूबाजूच्या गावातला असे.
नंतर प्रधान किंवा न्यायाधीश महिलेच्या कोठडी बाहेरून तिला प्रश्न विचारत असे, नंतर त्यावरून ती स्त्री गुन्हेगार आहे की नाही हे ठरत असे.
जर दोषी आढळले गेले तर समाजतून बहिष्कृत होणे अटळ होते.
समर्थविचारमच्या दरम्यान स्त्रीने आरोप कबूल करावे म्हणून ना ना प्रकारचे अत्याचार तिच्यावर केले जात असे आणि मुख्य म्हणजे हे अत्याचार स्त्रियाच करत असत.
उदाहरण म्हणजे आरोपी स्त्री ला चटई मध्ये गुंडाळून छतावरून ढकलून देणे, कोठडी मध्ये उंदीर, साप सोडणे,कमीत कमी जेवण देणे इत्यादी.
नातेवाईकांच्या कडून तर त्या स्त्री वर नेहमी आरोप कबूल करण्यासाठी दबाव घातला जाई. तर, सावित्री ने अशा काळात आपले जीवन व्यतीत केले होते.
सामाजिक धार्मिक बंधनांमुळे सावित्री सारख्या अनेक महिलांचे जीवन दुष्कर झाले होते.
आणि सावित्रीचे हेच कृत्य या रुढींच्या विरोधात आढळले गेले आणि सावित्रीने जे केले ते या सडलेल्या रुढींवर मोठा आघात होता.
सावित्रीच्या या खटल्यात विशेषता अशी होती की तिने ज्यांच्या ज्यांच्या सोबत संबंध ठेवले त्याचे रेकॉर्ड तिच्याकडे होते, त्यामुळे तिच्या सोबत ते सर्व पुरुष दोषी ठरवले गेले.
सावित्रीच्या या खटल्यानंतर नंबुदरी समाजात अनेक बदल घडून यायला लागले. महिलांनी त्यांच्यावर असलेल्या पारंपरिक बेड्या तोडून मुक्त राहण्यास सुरवात केली.
सावित्रीने केरळच्या या समाजात तिच्या वृत्तीने आणि कृतीने परिवर्तन घडवण्यास सुरवात केली होती.
म्हणतात की ६४ पुरुषांची नाव आणि त्यांचे वर्णन केल्यानंतर कोचीच्या राजाने हा खटला बंद केला आणि सावित्री ला बहिष्कृत करून समाजतून बाहेर केले.
राजाच्या या निर्णयाला त्याची भीती कारणीभूत होती कारण सावित्री सोबत संबंध ठेवणारी ६५वी व्यक्ती खुद्द राजा होता. समाजातुन बहिष्कृत झाल्यानंतर सावित्री कुठे गेली कोणाला माहीत नाही.
पण, सावित्रीच्या या विद्रोही वृत्तीचा समाजावर एवढा परिणाम झाला की १९१८ नंतर एकही महिला ‘समर्थविचारम’ च्या अग्निपरीक्षेतुन गेली नाही!
आज १०० वर्षानंतर सुद्धा सावित्रीची ही घटना तंतोतंत लागू पडते. स्त्री ही केवळ वस्तू नाही तर तिला सुद्धा भावना आणि इच्छा असतात.
पुरुषांप्रमाणे ती सुद्धा समाजाचा भाग आहे याची दखल घेण्यास सावित्रीने समाजाला प्रवृत्त केले!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.