बापरे, १४ कोटींचं कबुतर? कारण वाचाल, तर थक्कच व्हाल….
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
१४ कोटींचं कबुतर…आश्चर्य वाटलं ना वाचून? हिरे जवाहीरे कोटीच्या कोटी उड्डाणे पार करतात. काही ब्रँडेड गाड्यांची किंमतही कोट्यवधी रुपये कसते, पण चक्क कबुतरांची किंमत १४ कोटी? या कबुतरात असं आहे तरी काय?
रेसर कार, बंगले, गाड्या ही शौकीन लोकांना मोहात पाडणारी प्रकरणं. पूर्वी काही लाखांच्या घरात असणारी ही सारी कौतुकाची बाब आता कोटींची उड्डाणं पार करुन गेली आहेत. सोन्याचा भाव तर गगनापार पोचला आहे. सामान्य लोकांचा आवाका इथवरंच.
साधी माणसं, त्यांचे छंद, आवडीनिवडी पण साध्या. कोविडपूर्व काळात म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत हिवाळा संपला, की वेगवेगळ्या गावांत वेगवेगळ्या देवांच्या जत्रा, उरुस भरत. त्यात हौसेने लोक बैलगाडीच्या शर्यती भरवत, कोंबड्यांची झुंज लावत. कुस्तीची मैदानं जमत, पण कबुतरांची शर्यत लावली जाते हे माहीत आहे का?
आपल्याला कबुतर शांततेचं प्रतीक म्हणून माहिती आहे. फार फार तर निरोप देण्यासाठी पूर्वी कबुतरे वापरत हे माहीत. पण कबुतरांची शर्यत???
हा एक नवा शौक.. कबुतरांची शर्यत लावायची. वाटलं ना आश्चर्य? घोड्यांची, बैलांची, कार्सची, माणसांची शर्यत लावतात.. पण कबुतरांची सुद्धा??? होय. कबुतरांची पण शर्यत लावतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कबुतर हा अवघ्या जगात सापडणारा पक्षी आहे, पण याचं वैशिष्ट्य असं, की याला माणसांची संगत आवडते. पांढरा आणि राखाडी या दोन रंगातच हा पक्षी दिसतो. त्याचा वापर पूर्वी संदेश पोचवण्यासाठी करत असत, पण चीनमध्ये कबुतरं पाळतात, नुसतीच पाळत नाहीत तर शर्यतीसाठी त्यांना प्रशिक्षण सुध्दा दिलं जातं.
आपलं मनोरंजन करण्यासाठी माणूस किती क्रूर होऊ शकतो बघा! दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये कबुतरांची शर्यत लावली जाते. त्या शर्यतीसाठी ऑक्टोबर महिन्यात या कबुतरांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतात. या शर्यतीमधून कबुतरांचे मालक लाखो रुपये कमावतात. ही कमाई डाॅलर्सच्या रुपात असते. म्हणजे त्या मुक्या जीवाच्या जीवावर माणूस कसा गब्बर होतो.
चीनमधील लोकांचं म्हणणं असं आहे, की कबुतरांची शर्यत ही संस्कृती आहे. खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ १३ व्या शतकात सुरु केला गेला. यासाठी खास युरोपमधील कबुतरांची आयात केली होती असं इतिहास सांगतो, पण पुढं साधारण १९३० साली या शर्यतींवर सरकारने बंदी घातली.
नंतर चीनमधील बऱ्याच शहरांमध्ये अशा शर्यतीसाठी कबुतरांची पैदास केंद्रं सुरू करण्यात आली आणि बघता बघता हा खेळ श्रीमंतांचा शौक बनला.
हा सगळा पैशाचा खेळ. म्हणूनच, त्यांच्या संस्कृतीचा भाग असलेली ही शर्यत लावण्यासाठी चिक्कार पैसा खर्च करायचीही त्यांची तयारी असते. मग त्याकरिता अशी प्रशिक्षित कबुतरं विकत घेऊन शर्यतीत वापरुन त्यातून पैसा मिळवायचा हे साधं गणित यामध्ये आहे.
बीजिंगमध्ये अगदी कट्टर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवूनच कबुतरं पाळली जातात, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. युरोप हे कबुतरांचं जन्मस्थान असलं, तरी त्यांचा व्यावसायिक वापर चीनमध्येच केला जातो.
लंबी रेस का घोडा म्हणतात ना आपल्याकडं, तसं हे लंबी रेस का कबुतर म्हणावं लागेल. २०१८ साली झालेल्या अनेक शर्यती या कबुतरानं जिंकल्या आहेत. हेच त्याचं गुडविल ठरलं आणि विक्रमी दरात त्याची बोली लावली गेली.
–
- हे १० प्राणी सुद्धा बुद्धिमत्तेच्या बाबतीत माणसापेक्षा फार मागे नाहीत, बरं का…
- मोक्ष देणारी २ कबूतरं आणि बरच काही जाणून घ्या ‘अमरनाथ’ यात्रेबद्दल!
–
साधारणपणे एक कबुतर दहा वर्षे प्रजनन करु शकतं. त्यामुळे त्याचा दर वाढता असतो, पण आश्चर्याची गोष्ट अशी, की ही मादी कबुतर आहे जिची खरेदी करायला चीनमधील दोन व्यावसायिक अतिशय उत्सुक होते. या कबुतराचं नांव आहे न्यू किम!
लिलावात न्यू किमची किंमत दोनशे डाॅलर्स ठरवली होती, पण बोली वाढत वाढत १९ लाख डॉलर्स इतकी झाली. १.६ दशलक्ष युरो इतकी ही बोली लावली गेली आणि हा असामान्य आकडा कबुतराच्या मालकाला मालामाल करुन गेला.
भारतीय रुपयांमध्येही रक्कम चौदा कोटी पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी चार वर्षे वयाच्या कबुतराची विक्री चौदा लाख डॉलर्सला झाली होती. न्यू किमनं ते रेकाॅर्ड मोडून नवा आकडा प्रस्थापित केला आहे.
एवढा मोठा दर न्यू किमला मिळायचं कारण म्हणजे, २०१८ साली तिनं अनेक शर्यती जिंकल्या आहेत त्यात नॅशनल मिडल डिस्टन्स ही शर्यत होती. त्यानंतर न्यू किमला तिच्या मालकानं निवृत्त केलं. आता ज्या नव्या मालकानं तिला अव्वाच्या सव्वा बोली लावून खरेदी केलं आहे तो न्यू किमचा उपयोग प्रजननासाठी करणार आहे.
थोडक्यात कोणाचं भाग्य कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. न्यू किमनं शर्यती तर जिंकल्याच, पण निवृत्ती घेतली आणि जाता जाता मालकाचं उखळ पांढरं करुन गेली.
सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आपण गोष्टीत ऐकली होती..वाचली होती, पण पाहिली नव्हती. मालकासाठी लाॅटरीचं तिकीट ठरुन जॅकपॉट लावणारी न्यू किम ही एक नवीच सत्यकथा ठरली आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.