Site icon InMarathi

स्वरा भास्करने केलं असं काही की युजर्स “झोमॅटोवर” झाले नाराज!

swara bhaskar featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला २ गट पडलेले दिसतील. एक म्हणजे उजव्या विचारसरणीचे आणि दुसरे म्हणजे डाव्या विचारसरणीचे. त्यातही बरेचसे कलाकार हे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आपल्याला बघायला मिळतात.

शबाना आजमी, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह, अनुराग कश्यप, कुणाल कामरा अशी काही मोठ मोठी नावं तुम्हाला ह्या गटात आढळतील. यातलं एक आणखीन कायम चर्चेत असलेलं नाव म्हणजे स्वरा भास्कर!

तनु वेड्स मनू, अनारकली ऑफ आराह, रांझना, नील बट्टे सन्नाटा अशा बऱ्याच सिनेमातून स्वरा भास्कर हिची अदाकारी आपण पाहिली आहेच.

शिवाय सो कॉल्ड “फेमीनिजम” वर भाष्य करणाऱ्या वीरे दी वेडिंग या सिनेमात सुद्धा तिने तिच्या इमेजला अनुसरूनच भूमिका केली!

 

 

पण स्वरा भास्कर हे नाव तिने केलेल्या भूमिकांपेक्षा तिने केलेल्या असंबद्ध वक्तव्यामुळे आणि गोंधळलेल्या भूमिकेमुळे जास्त चर्चेत असतं हे आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे!

मग ते मी टू मुव्हमेंट विरोधात उभं राहणं असो, फेमीनिजम च्या समर्थनार्थ फलक पकडून कॅमेरा समोर येणं असो, देशातल्या स्त्रियांच्या समस्येविषयी स्टँड घेणं असो किंवा CAA विरोधात केलेली स्टेटमेंट असो!

 

 

स्वरा भास्करच्या प्रत्येक स्टेटमेंटमधून, तिने घेतलेल्या स्टँडवरुन किंवा तिच्या बऱ्याचशा मुलाखतींवरुन ती प्रचंड गोंधळलेली दिसून येते. विरोधाला विरोध म्हणून ती डाव्याविचारधारेला सपोर्ट करते हे तिच्या बऱ्याच स्टेटमेंटवरुन समजून येते!

पण कालपासून स्वरा भास्कर एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून झोमॅटो ह्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीला टॅग करून त्यांनी रिपब्लिक भारत या चॅनल वरुन त्यांच्या जाहिराती काढून घ्याव्यात असे आवाहन केले आहे!

 

 

रिपब्लिक चॅनलने सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये केलेली ढवळाढवळ, टीआरपीचा घोळ, आणि एकंदरच रिपब्लिक चॅनलची वाईट गोष्टी आणि hatred पसरवण्याची आयडियोलॉजी यामुळेच स्वरा भास्करने हे ट्विट केल्याचं म्हंटलं जात आहे!

या ट्विटमध्ये तिने झोमॅटो सारख्या कंपनीने अशा चॅनल्सच्या माध्यमातून जाहिरात देऊ नये असे स्पष्टपणे मांडले आहे. यावर झोमॅटोच्या अधिकृत अकाऊंटवरुन स्वराच्या ट्विटला उत्तर देखील दिलं गेलं. 

आणि नेमकं इथेच लोकांना हे पटलं नाही आणि त्यांनी स्वरा भास्कर आणि झोमॅटो अशा दोन्हीला ट्रोल करायला सुरुवात केली!

 

 

एकंदरच या तिच्या ट्विटला लोकांनी फारसं सिरियसली घेतलं नसल्याचं त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून समजतंय. स्वरा भास्करचा एकंदरच एकसूरी आणि गोंधळलेला स्टँड यावरून लोकांनी तिला खूप ट्रॉल केलं आहे.

अशाच काही मजेशीर प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत!

 

 

लोकांच्या प्रतिक्रिया पाहून स्वरा आणि झोमॅटो यांची अवस्था अशीच काहीशी झाली असणार!

 

 

 

 

 

 

लोकांनी तनिष्क प्रमाणे झोमॅटोवर सुद्धा चांगलीच टीका केल्याचं दिसून येत आहे

 

 

 

 

झोमॅटो नाही तर स्वीगि आहेच अशी भावना आता लोकांच्या मनात आलेली आहे, आणि लोकांनी झोमॅटो डिलिट करायला देखील सुरुवात केलेली आहे!

 

 

अशा बऱ्याच कॉमेंट्स मधून नेटीजन्स हे त्यांचा राग व्यक्त करत आहे. झोमॅटो सारख्या कंपनीने स्वरा भास्कर सारख्या गोंधळलेल्या व्यक्तीच्या ट्विटला सिरियसली घेतल्याने इंटरनेटवर लोकांनी इतका राग व्यक्त केल्याचं दिसत आहे!

कोणताही ब्रॅंड असो, त्यांनी कोणत्याही स्टेटमेंट वर उत्तर देताना किंवा एखादा स्टँड घेताना हजार वेळा विचार करायलाच हवा हे या उदाहरणावरुण स्पष्ट होते. 

लोकं स्वरा भास्करला किती सिरियसली घेतील याची कल्पना नाही, पण झोमॅटो कंपनीला याचा फटका बसेल हे मात्र नक्की आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version