' डावखुऱ्या मुलासाठी सुरू केला बिझनेस, घेतली ५००००हून अधिक ऑर्डर्सची भरारी! – InMarathi

डावखुऱ्या मुलासाठी सुरू केला बिझनेस, घेतली ५००००हून अधिक ऑर्डर्सची भरारी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या आसपास बरेचदा दोन प्रकारच्या व्यक्ती पहायला मिळतात. डावखुरे आणि उजव्या हातांनी काम करणारे. बहुतांश गोष्टी ज्या आपण उजव्या हाताने करतो, त्याच सर्व गोष्टी डावखुरे लोक डाव्या हाताने करतात.

या डावखुऱ्या मंडळींसाठी फारशी साधने उपलब्ध नाहीत. उदाहरणार्थ, पेन, पेन्सिल, कटर, भूमितीय साधने, हस्त कलेसाठी लागणाऱ्या गोष्टी, कात्री इत्यादी.. तशी तर खूप मोठी यादी होईल, पण काही महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींबद्दल आपण बोलतोय.

दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्या अतिशय महाग..अवाच्या सव्वा किमतीला.. त्यामुळे सर्वच डावखुऱ्या लोकांना अशा गोष्टी विकत घेणं परवडतही नाही.

विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत जेव्हा हे घडत असतं, तेव्हा बरेचदा पालकांना हे कळतच नाही, की आपला पाल्य सर्वसाधारण मुला-मुलींप्रमाणे उजव्या हाताने का लिहित नाही. काहींना हा मुलांच्या वयातील दोष वाटतो, पण लक्षात घ्या की डावखुरे असणे यात काहीच गैर नाही. हा कोणताही रोग किंवा व्याधी नाही.

 

handwriting inmarathi

 

अशीच घटना घडली एका १० वर्षाच्या शाळेत जाणाऱ्या मुलाबाबत. मग त्याच्या पालकांनी या समस्येवर मात करत एक नवाच बिजनेस कसा उभा केला. याचीच ही रंजक कथा वाचा.

ही २०१५ सालची घटना आहे. गुरिंदर नावाचा पाचवी इयत्तेतील मुलगा अचानकपणे एका समस्येत अडकला. उजव्या हाताचा वापर करुन लिहिणे, हस्तकला करणे, गोष्टी हातात पकडणे या गोष्टींमध्ये त्याच्या लक्षात आलं, की आपल्या डाव्या हाताचा वापर जास्त होतोय आणि उजव्या हातानी काही गोष्टी करणे, मुख्यत्वे लिहिणे तर शक्यच होत नाहीये. हळूहळू त्याच्यातील हा बदल त्याच्या पालकांनाही जाणवू लागला होता.

 

left hand shop inmarathi

 

शाळेत इतर मुलांच्या तुलनेत गुरिंदर मागे पडू लागला…विशेषत: अभ्यासात. कारण लिहिण्याचा स्पीड अचानक कमी झाला होता. तसेच इतर शालेय साहित्य जे उजव्या हाताच्या दृष्टीकोनातून बनवलेले असते, त्याचा वापर करुन डावखुऱ्या लोकांना काम जमत नाही. तसेच बेंचवर बसण्याची जागादेखील विरुद्ध असावी लागते. जेणेकरुन डावा हात जास्त अॅक्टिव्ह राहील आणि लिहिणे सोपे होईल.

अखेर त्याला आणि त्याच्या पालकांना या समस्येची उकल झाली. आपला मुलगा डावखुरा आहे हे कळल्यावर त्या दृष्टीने पालकांनी प्रयत्न सुरू केले.

आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांसोबत चालायचे आणि वेग सांभाळून पुढे जायचे म्हणजे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत होती मात्र, खंबीर पालकांनी कंबर कसली आणि यावर तोडगा कसा काढता येईल याचा विचार सुरू केला.

टेक्निकल गोष्टी साध्य करणं खूप महत्त्वाचं होतं. डावखुरे लोक जे साहित्य वापरतात, ते एकतर प्रचंड महाग होतं आणि सहसा सगळीकडे उपलब्ध नव्हतं. ऑनलाईन सेलिंग वेबसाईटवर ते जास्त करुन उपलब्ध होतं, परंतु किंमत प्रचंड महाग!

लेफ्टीज वापरतात त्या कात्रीची किंमत १२०० रुपये तर, पेन्सिलला टोक काढणाऱ्या कटरची किंमत ६०० रुपये. पेनाची किंमत १५०० रुपये.. इतक्या महाग वस्तू कोण आणि कशासाठी घेईल?

 

left hand shop inmarathi

 

मात्र गुरिंदरच्या पालकांनी याचा सखोल अभ्यास सुरू केला. केवळ त्यांच्या मुलासाठी नाही, तर एकूणच जे कोणी डावखुरे आहेत, त्या सर्वांनाच स्वस्त किंमतीत वस्तू कशा उपलब्ध होतील यासाठी त्यांनी स्वतः इतर देशांतील कंपन्यांसोबत संपर्क करुन किमान किंमतीत वस्तू उपलब्ध करुन देण्यास सुचवले. त्याप्रमाणे फ्रान्सच्या एका कंपनीने अशी किट्स द्यायला तयारी दाखवली.

गुरिंदरचे पालक संदिप आणि पवित्रा यांच्या अथक परिश्रमांनंतर या गोष्टी आता साध्य होत आहेत. फ्रान्सच्या कंपनीच्या मदतीने त्यांनी गरजेच्या आणि महत्त्वाच्या तसेच नित्य वापराच्या वस्तूंचे किट तयार करुन घेतले आहे जे अत्यंत स्वस्त किंमतीत विक्री करता येईल.

संदीप आणि पवित्रा यांनी भारतातील एकूण डावखुऱ्या लोकांचा एक डेटाबेस काढला आहे त्यानुसार, किमान १० कोटी लोक भारतात डावखुरे आहेत. म्हणजे त्यांना अशा साहित्याची नक्कीच गरज असणार याचाच विचार करुन संदीप यांनी अशा सर्व स्वस्त वस्तुंचे किट तयार करुन थेट विक्रीच सुरू केलीये. ज्यामुळे त्यांचा बिजनेस तर वाढतोच आहे आणि डावखुऱ्या मुला-मुलींना याचा अधिक फायदा होत आहे.

 

left hand shop inmarathi1

 

१५०० रुपयांची वस्तू आता केवळ २०० रुपयात,

६०० रुपयांची वस्तू ३० रुपयात आणि

१२०० रुपयांची कात्री केवळ १०० रुपयात खास डावखुऱ्या लोकांसाठी आता या विशेष दुकानात उपलब्ध आहे.

तुम्हीही या दुकानाला भेट देऊ शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?