Site icon InMarathi

IAS ऑफिसरने असे काही केले की ३० तृतीयपंथीय व्यक्ती झाले स्वयंपूर्ण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मंडळी आजपर्यंत आपण अनेक यशस्वी उद्योजक मंडळींबद्दल आणि त्यांच्या उद्योगांबद्दल वाचलं असेल.

त्यांनी त्यांचा उद्योग कशा पद्धतीने संघर्षातून तयार केला आणि पुढे कसा वाढवला याच्या अनेक कथा तुम्हाला नक्कीच माहिती असतील परंतु आज ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही अशाच एका दुर्लक्षित व्यक्तीकडून उभारलेल्या उद्योगाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

दक्षिण भारतात काही वर्षांपूर्वी काही तृतीयपंथी मंडळींनी एकत्र येत एक उद्योग स्थापन करायचे ठरवले आणि त्यांनी दूध डेअरी चा उद्योग स्थापन करायचा निर्णय घेतला.

काही वर्षांपूर्वी स्थापन झालेला हा उद्योग आज मात्र अगदी व्यवस्थित पद्धतीने चालू आहे.

इतर देशांप्रमाणेच भारतात देखील तृतीयपंथी व्यक्तीला हीन नजरेने पाहिलं जातं, त्यांना प्रगतीच्या, शिक्षणाच्या संधीपासून दूर ठेवलं जातं.

 

 

अनेक वेळी त्यांची इच्छा नसताना देखील त्यांना वेश्याव्यवसायात ओढलं जातं किंवा कुठल्या तरी लग्नामध्ये नाचवलं जातं. या व्यक्तींकडे ना पुरेस उत्पन्न असतं, ना त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचं घर असतं.

२०१४ ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने भारतामध्ये तृतीयपंथी असण्याला मान्यता दिली तेव्हा कुठे यांच्यासाठी थोड्याफार प्रमाणात संधी निर्माण झाल्या.

आता काही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये देखील तृतीयपंथी व्यक्तींना काम करण्याची संधी दिली जाते, एवढेच नाही तर त्यांना इतर सोयी सुविधा देखील दिल्या जातात.

भारतामध्ये तृतीयपंथी व्यक्तीची अशी पार्श्वभूमी असताना काही तृतीयपंथीयांनी मिळून एखादा व्यवसाय उभा करणं हे एक मोठं दिव्यच होत. परंतु दक्षिण भारतातील नागरिकांनी आणि तेथील प्रशासनानी मदत केल्यामुळेच हा डेअरीचा व्यवसाय उभा राहू शकला.

 

 

थूथूकुडी गाव जेथे हा प्रकल्प चालू आहे तेथील जिल्हाधिकारी श्री संदीप नांदुरी यांनीदेखील या प्रकल्पाला मोलाची साथ दिलेली आहे असे हे सर्व तृतीयपंथी व्यक्ती सांगतात.

द बेटर इंडिया या पोर्टल शी बोलताना श्री संदीप नंदुरी असे म्हणाले की –

“अनेक व्यक्ती एकदा मदत करतात आणि नंतर विसरून जातात, परंतु लक्षात घ्या एका वेळी मदत करण हे या प्रश्नाचं उत्तर नाही तृतीयपंथी व्यक्तींना प्रचंड मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी प्रशासनाने मदत केली आहे.”

हा प्रकल्प केवळ ३० तृतीयपंथी व्यक्ती एकत्रपणे चालवत आहेत. हा प्रकल्प आत्ता महिन्याला तीन लाख रुपये कमावतो म्हणजेच प्रत्येकाला हक्काचे आठ हजार रुपये मिळतात.

माहिती प्रमाणे या जिल्ह्यात जवळपास अडीचशे पेक्षा जास्त तृतीयपंथी व्यक्ती आहेत या व्यक्ती शासनाकडून मिळणाऱ्या रकमेच्या भरोशावर जीवन व्यतीत करतात परंतु या ३० व्यक्ती मात्र मेहनत करून स्वतःचं अस्तित्व टिकून आहेत.

३६ व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मदत केलेली आहे या तीस व्यक्तींना पशुपालनाचे कौशल्य शिकवून त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत आणि प्रशासनाकडून पाठिंबा देण्याचं मौल्यवान काम येथील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे.

म्हणूनच आज श्री संदीप नंदुरे यांचं सगळीकडे कौतुक होत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यात देखील मोठी मदत केली.

 

 

व्यवसाय सुरू झाल्यानंतर देखील सामान्य लोक दूध घेतील की नाही याबद्दल संभ्रम असल्यामुळे प्रशासनाने त्यांना जिल्हा बँकेची संलग्न होऊन एक ब्रँड तयार करण्याचा सल्ला दिला त्यासाठी मदत देखील गेली.

एवढी मदत मिळाल्यानंतर या तीस जणांनी पण आळस न करता मेहनत सुरू केली हे सकाळी सहाला उठतात आणि आपल्या कामाला लागतात.

दिवसाला एकूण ३० लिटर दूध विकलं जातं आणि याचा दर ३३ रुपये लिटर एवढा असतो. भूमिका सांगते की हा व्यवसाय सुरू व्हायच्या आधी मी बस आणि ट्रेनमध्ये जाऊन भीक मागत असे.

परंतु या व्यवसायाने आमचं जीवनच बदलला आहे या सर्व प्रवासाबद्दल भूमिका जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानते.

 

 

आणि प्रशासनाला धन्यवाद देते की त्यांनी विश्वास दाखवून त्यांना जीवन बदलण्याची संधी दिली हा व्यवसाय येत्या काळात अजून मोठा होईल असा विश्वास देखील भूमिका नाही या वेळी बोलून दाखवला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version