' WhatsApp-११४ अब्ज रुपयांच्या कंपनीत किती इंजिनिअर काम करत असतील? – उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल! – InMarathi

WhatsApp-११४ अब्ज रुपयांच्या कंपनीत किती इंजिनिअर काम करत असतील? – उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

WhatsApp – २०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात facebook ने १९ बिलियन डॉलर्स (तेव्हाचे सुमारे ११४ अब्ज रुपये) मोजून विकत घेतलेली कंपनी.

विशेष हे की WhatsApp ही एक तोट्यातील कंपनी होती. तरी फेसबुकने विकत घेतली. फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी !

ह्या विकत घेण्याच्या व्यवहारात, WhatsApp च्या दोन्ही फाउंडर्सनी मस्त कमाई केली.

Jan Koum ने सुमारे ४० अब्ज रुपये आणि Brian Acton (आधीचा Yahoo! मधला इंजिनिअर) ने सुमारे २१ अब्ज रुपये कमावले. शिवाय Koum फेसबुकच्या बोर्डमधे सामील झाले आणि त्यांची whatsApp मधली CEO ची position सुद्धा कायम राहिली !

WhatsApp-Koum-and-Acton-marathipizza

स्त्रोत

अश्या ह्या WhatsApp मधे किती इंजिनिअर काम करत असतील? कमीत कमी तीन-चारशे? जास्त? पाचशे? हजार?

उत्तर आहे — ५७.

होय — सत्तावन्न.

हे आम्ही नाही, स्वतः CEO म्हणत आहे.

एक फेब्रुवरीला Jan Koum ने पुढील फेसबुक स्टेटस पोस्ट केलं :

WhatsApp च्या विवीध आकडेवारी दाखवणारं हे info-graphic अनेकांना अचंभित करेल. सर्वात मोठी अचंभित करणारी गोष्ट आहे – शेवटचा आकडा.

फक्त ५७ इंजिनिअरर्स…!

आपलं जिवन कितीतरी विवीध प्रकारे बदलून टाकणाऱ्या ह्या awesome मेसेजिंग app वर फक्त ५७ इंजिनिअर काम करत आहेत.

अर्थात, इतर सपोर्ट स्टाफ असणारच. पण mobile application साठी महत्वाचं काम इंजिनिअरच करतात.

एवढ्या छोट्या टीमने मेसेजिंगचं जग बदलवून टाकणारं एवढं मोठं काम केलं ह्याबद्दल त्यांना सलामच ठोकला पाहिजे.

तसं पहाता अब्जावधी रुपये मोजून फेसबुकने हा सलाम ठोकलाच आहे !

आणि आपणही रोज कित्येकवेळा WhatsApp वापरत असताना, कळतनकळत ह्या ५७ इंजिनिअर्सला धन्यवाद देत असतो की…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?