' नखं खाण्याची वाईट सवय घालवायचीये, पण जमत नाहीये? मग या घ्या टिप्स… – InMarathi

नखं खाण्याची वाईट सवय घालवायचीये, पण जमत नाहीये? मग या घ्या टिप्स…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही सवयी असतात. आपल्या नकळत त्या सवयी नंतर आपली ओळख बनतात. आपल्या माघारी बोलतांना लोक त्या सवयीचं नाव घेऊन आपल्याबद्दल बोलत असतात.

कोणतीही सवय एकदा लागली, की ती बदलणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी मनाशी खूप निग्रह करावा लागतो. “माणूस हा सवयीचा गुलाम असतो” हे व.पु.काळे यांचं हे वाक्य अगदी बरोबर वाटतं.

नखं खाण्याची एक सवय अशीच आहे. काही जणांना फावल्या वेळात किंवा “आता पुढे काय होईल?” हा विचार करतांना नखं खाण्याची फार सवय असते.

 

nail biting habit inmarathi

 

क्रिकेटची मॅच बघतांना इंग्रजी कमेन्टेन्टरचं “what a nail-biting finish” हे वाक्य आपण सर्वांनीच ऐकलेलं असेलच. त्याचवेळी कॅमेरामन हे चतुराईने स्टेडियममधील मॅच मध्ये समरस झालेल्या लोकांकडे कॅमेरा नेऊन आपल्याला याचा अर्थ संदर्भ देऊन सांगत असतात.

मॅचच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये किंवा एखादा थ्रिलर सिनेमा बघत असतांना उफाळून येणारी ही नखं खाण्याची ही सवय आरोग्यासाठी चांगली नाहीये, त्यामुळे आपल्याला नखांच्या अवतीभोवती इन्फेक्शन होऊ शकतं. वारंवार नखं खाल्ल्याने सर्दीचा त्रास होऊ शकतो. दात खराब होऊ शकतात.

हे सगळं कळत असतं, पण वळत नसतं. ही सवय कशी सोडावी? ही सवय घालवण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत:

 

१. नखं छोटी ठेवा:

 

nail inmarathi

 

 

साहजिकच पहिला उपाय कोणीही हाच सांगेल, पण हे लक्षात राहिलं असतं, तर नखं वाढलेच नसते आणि पुढचे प्रश्न आलेच नसते.  टुथब्रशच्या बाजूलाच जर नेल-कटर ठेवलं, तर कदाचित त्याकडे तुमचं लक्ष जाईल आणि वेळोवेळी नखं कापण्याचं तुमच्या लक्षात येईल.

कोणतीही गोष्ट आपल्या कामाशी जोडली की लक्षात राहते. नखं कापलेली असली, की टायपिंग स्पीड वाढतो आणि तुमचं काम कमी वेळात पूर्ण होतं. हा उपयोग तुम्ही लक्षात ठेवला, तर नखं आपोआप कापली जातील.

 

२. नेलपेंटचा वापर करा:

 

nail polish inmarathi

 

आपल्याकडे नेलपेंट हे फक्त स्त्रियांनीच वापरावं अशी एक मान्यता आहे आणि नेल पेंट म्हणजे फक्त सौंदर्य प्रसाधन म्हणूनच आपण बघतो, पण त्यापासून काही वैद्यकीय फायदे सुद्धा आहेत.

सतत हवेच्या संपर्कात येणारे आपले हात आणि त्वचा यामध्ये नेल पेंट किंवा पॉलीश हे एकाप्रकारे आवरण म्हणून काम करत असतं. नेलपेंटचा वास चांगला नसल्यास तुमची नखं खाण्याची सवय आपोआप कमी होईल.

३. हातमोजे वापरणे:

 

nail inmarathi2

 

शक्य असल्यास पातळ हातमोजे वापरा. हिवाळ्यात आपण जसे लोकरीचे हातमोजे वापरतो, तसे बाकीच्या ऋतूत सुद्धा वापरले तर आपल्याला वारंवार आपले नखं दिसणार नाहीत आणि नखं खाण्याची सवय आपोआप कमी होईल.

 

४. हातांना व्यस्त ठेवणे:

 

using Mobile while eating InMarathi

 

हातांना चित्र काढण्यात किंवा लिहिण्यात, विणकाम करण्यात बिझी ठेवावं. अशी कोणतीच आवड नसल्यास क्यूब खेळण्यात दोन्ही हात व्यस्त ठेवा.

आजकाल तर मोबाईल गेम्स खेळून तुम्ही स्वतःला बिझी ठेऊ शकता. नखं खावीशी वाटली, की लगेचच मनात दुसरे विचार आणा.

 

६. हाताला बँडेज लावून ठेवणे:

 

nail inmarathi1

 

हातावर लावण्यासाठी एक छोटं बँडेज मिळतं. सुट्टीच्या दिवशी ते हाताला लावून ठेवा आणि रात्री झोपायच्या आधी परत काढून ठेवा. असं केल्याने बँडेज काढल्यावर दिसणाऱ्या व्रणांमुळे आपली ही सवय चांगली नाही हे लक्षात राहील.

कोणतीही सवय लागण्यासाठी आणि ती सोडण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो, असं एका अभ्यासातूनसमोर आलं आहे. त्याचप्रमाणे, ही सवय जाण्यासाठी थोडा वेळ द्या आणि संयम ठेवा. हा विश्वास ठेवा, की तुम्ही ही सवय घालवू शकता.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?