Site icon InMarathi

मोती साबणाची मागणी दिवाळीतच जास्त का असते? यामागे आहे एक कनेक्शन, बघा

moti soap ad inmarathi2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

दिवाळी आणि मोती साबण हे एक समीकरणच आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘अलार्म काकां’च्या जाहिरातीमुळे मोती साबणाबद्दल लोकांच्या मनात परत एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे.

दिवाळी आहे आणि नरकचतुर्दशीचे ‘अभ्यंग स्नान’ करतांना मोती साबण नाहीये असं फार कमी मराठी घरात होत असावं. गोलाकार असा हा साबण सगळ्यांसाठीच फार खास आहे.

 

 

टाटा ऑईल मिल्स कंपनी (TOMCO) ने मोती साबणाची निर्मिती केली होती. १९९३ मध्ये टाटा ऑईल मिल्स ही तत्कालीन हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये समाविष्ट झाली. मोती साबणाला त्यावेळी २५ रुपयांच्या किमतीमुळे प्रीमियम साबण म्हणून समजलं जायचं.

मोतीचा आकार, चंदनाचा फ्लेवर या गोष्टी मोती साबणाचे वैशिष्ट्य होत्या. सुरुवातीला ज्या जाहिरातींमधून मोती साबणाला लोकांपर्यंत आणलं गेलं, त्यात साबण मोत्यांच्या कोंदणात ठेवलेला असायचा. लोकांना ही कल्पना सुद्धा खूप नाविन्यपूर्ण वाटली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मोती साबणाची वेळ ही दिवाळीतच का येते? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे.

ट्रान्सेंड ब्रँड कन्सल्टिंगचे चीफ ब्रँड आर्किटेक्ट दिवाळी आणि मोती साबणचं कनेक्शन बद्दल बोलतांना सांगतात की, “अभ्यंग स्नान हे उटण्याशिवाय  केलं जात नाही. उटणे ही एक सुवासिक आयुर्वेदिक पावडर आहे. अभ्यंग स्नान करतांना आधी उटणे लावले जाते.

 

 

 

९०च्या दशकांत बाजारात आलेल्या विविध साबणांसमोर मोतीला तग धरण्यासाठी कंपनीने ‘उटण्या’चा फ्लेवर असलेला साबण अशी जाहिरात केली.

दिवाळीचा दिवा लावतांना बाजूला असलेल्या मोती साबणामुळे अशी प्रतिमा लोकांच्या मनात नकळत तयार झाली, की मोती साबण हा खास दिवाळी साठीच तयार करण्यात आला आहे.  ९० च्या दशकातील प्रत्येकजण हा मोती साबणाकडे एक बालपणीची आठवण म्हणूनच बघतो आणि विकतही घेतो.”

मोती साबणाच्या मार्केटिंग कॅम्पेनवर काम केलेले मधुकर सबनवीस सर सांगतात, की “महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या काही भागात अभ्यंग स्नानाला खूप महत्व आहे. या तीन राज्यातील मोती साबणाची मागणी पूर्ण करणे इतकाच आमचा उद्देश त्या काळात असायचा.

आम्ही एक गिफ्ट पॅक सुद्धा त्यावेळेस डिझाईन केला, ज्या एकाच पॅकमध्ये चंदन, गुलाब आणि खस हे तीन प्रकार विकले जायचे आणि या गिफ्ट पॅकला तेव्हा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मोती साबणाला एका वस्तूपेक्षा एक परंपरा म्हणून लोकांनी मान्य केलं याबद्दल आम्ही लोकांचे आभारी आहोत. ही परंपरा सुरूच रहो अशी आमची इच्छा आहे.”

दिवाळीसोबतच इतर धार्मिक विधींच्या वेळी सुद्धा मोती साबण वापरला जावा यासाठी कंपनीने बरेच प्रयत्न केले. २०१३ मध्ये काही ठराविक राज्यात मोती साबणाचा खप वाढवण्यासाठी कंपनीने एक कॅम्पेन सुद्धा चालवलं होतं.

९० च्या दशकात असलेल्या इतर साबणांपेक्षा असलेल्या जास्त किमतीमुळे त्याची खरेदी लोक सणाच्या वेळी करणं पसंत करायचे असं ही मार्केट ट्रेंड अभ्यासक सांगतात.

एक काळ असा होता, जेव्हा कितीही हलाखीची परिस्थिती असली, तरी कोणतीही व्यक्ती दिवाळीच्या वेळेस मोती साबण विकत घेतांना विचार करायची नाही. दिवाळीच्या किराणा यादीत मोती साबण हा नेहमीच असायचा.

दिवाळीच्या अभ्यंग स्नानात महत्त्वाचं मानल्या जाणाऱ्या मोती साबणाला इथून पुढे सुद्धा अशीच मागणी राहो आणि त्यामुळे आपल्याला त्या जुन्या काळाची आठवण येत राहो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version