आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दिवाळी आली की फटाक्यांवर सरकारची बंदी, पर्यावरणप्रेमींचा इकोफ्रेंडली दिवाळीचा नारा, त्यांना शह देण्यासाठी फटाके फोडूनच दिवाळी साजरी करणारे लोक हे आता काय नवीन राहिलेलं नाही.
कोणता सण उत्सव आला आणि वाद झाला नाही असं कधी झालेच नाही. दिवाळी आली आहे आणि आता फटाक्यांवर वाद विवाद सुरू आहे.
महाराष्ट्रात तर खाजगी ठिकाणी फटाके फोडा अस आवाहन खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पण खाजगी म्हणजे नेमकं काय ते त्यांनी सांगितलं नाही.
असो, फटाक्यांवर बंदी घालणे आणि ती उठवणे आता रोजचंच झालं आहे. तरी कुठे ना कुठे जल्लोषाच्या ठिकाणी फटाके हे उडवलेच जातात.
लहान मुलांचे पाऊस, भुईचक्र पासून ते मोठ्यांच्या सुतळी बॉम्ब, रॉकेट पर्यंत सगळेच विविध फटाक्यांची मजा घेतात. तर आज बघूया नेमकं फटाक्यांचा शोध हा लागला कसा ते!
बघायला गेलो तर फटाक्यांचा शोध हा अपघाताने लागला. गंमत वाटत असली तरी फटाक्यांचा विकास हा चीन मध्ये इसवीसनाच्या पूर्वी पासूनच होत आलेला आहे.
चीन मध्ये साधारण इसवी सन पुर्व २००च्या आसपास फटाक्यांचा ‘चुकून’ शोध लागला.
एका रात्री शेकोटीची लाकडं संपल्यानंतर कोणी तरी आगीत बांबूचा एक तुकडा फेकला. आगीमुळे बांबू गरम होत गेला आणि काळा पडला.
तसं अचानक त्या बांबू मधून निखारे बाहेर पडू लागले आणि मोठा आवाज होऊन त्या बांबूचे तुकडे झाले. या आवाजाला तिकडे असलेले सगळेच घाबरले.
स्थानिक चिनी लोकांचा समज झाला की जर याला मानव घाबरत असेल तर दुष्ट आत्मा नक्कीच घाबरत असेल.
त्यावेळी चिनी लोकांमध्ये अंधश्रद्धा होती की तिथे ‘निआन’ नावाच्या दुष्ट आत्म्याचा वास आहे आणि तो तिथली पिके नासवतो.
त्यामुळे त्या आत्म्याला घाबरवण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात ‘त्या’ बांबूच्या तुकड्याला जाळण्यात येऊ लागले.
पुढे या पद्धतीचे परंपरेत रूपांतर झाले आणि फटाके रुपी या बांबूला लग्न समारंभ सारख्या अनेक उत्सवात फोडण्यात येऊ लागले.
याच परंपरेला ‘पाओ चूक’ अस म्हटले गेले. पुढे हजारो वर्षे ही परंपरा चीन मध्ये चालू राहिली.
या बांबूच्या आवाज करून फुटण्याच्या रहस्यामागे अनेक चिनी शास्त्रज्ञ लागले आणि मानवनिर्मित आवाज करणाऱ्या रसायनाच्या शोधात ते लागले.
इसवी सन ६०० ते ९०० मध्ये गन पावडर चा शोध लागून विकास झाला. गंधक, पोटॅशियम नायट्रेट, आर्सेनिक सल्फाईड सारखी रसायने स्फोटक आहेत याची शास्त्रज्ञाना कल्पना आली.
ते या रसायनांचे मिश्रण एका बांबू मध्ये भरून ठेवत. या रसायनाच्या मिश्रणाला ते ‘हूओ याओ’ म्हणत.
मग हेच बांबू त्यांनी आगीत टाकले आणि हे बांबू त्याच बांबू प्रमाणे मोठा आवाज करून फुटायला लागले आणि कृत्रिम फटाक्यांचा शोध लागला.
या एवढ्याचं शोधवर ते शांत बसले नाही. मग यात कमालीचे संशोधन झाले. केवळ आवाजापूर्ती मर्यादित न राहता हे मिश्रण रोषणाई आणि आकाशात कसे उडून फुटतील यावर संशोधन सुरू झाले.
हे तंत्र शोधत असताना मात्र याचा वापर युद्धात सुद्धा होत गेला. चिनी लोकांनी हे फटाके युद्धात वापरून अनेक वेळा विजय देखील मिळवला होता.
कालांतराने हे तंत्र पर्यटकांनी युरोपात आणले आणि यावर यशस्वी प्रयोग सुद्धा केले.
रंगांसाठी मग सल्फरच्या मिश्रणामध्ये धातूंचे अंश मिसळले जाऊ लागले आणि आजचे प्रगत फटाके अस्तित्वात आले.
चीनच्या इतिहासात पाहिले असता चिनी लेखक बोयांग याने आपल्या पुस्तकात उडणाऱ्या ज्वाळा म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे तेच आजचे फटाके.
विविध चिनी राजवंशामध्ये फटाक्यांवर अधिकाधीक संशोधन होत गेले. त्यांच्याच काळात गन पावडर च्या मिश्रणाला कागदात गुंडाळून उडवायची ट्रिक जगासमोर आली.
तर अशा प्रकारे चीन मध्ये फटाक्यांचा शोध हा लागला. नंतर विविधांगी प्रयोग हे त्यावर होत गेले आणि आजचे प्रगत फटाके आपणास बघायला आणि वापरायला मिळत आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.