Site icon InMarathi

दिवाळीतील अभ्यंगस्नान केवळ परंपरा नाही, तर त्यामागे आहेत आरोग्यदायी लाभ! वाचा

abhyangsnan inmarathi3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताचे आयुर्वेदशास्त्र भरपूर प्रगत आहे. आयुर्वेद हे माणसाला निरोगी व सुदृढ आयुष्य कसे जगता येईल हे सांगते. याच आयुर्वेदातील वेगवेगळ्या वैज्ञानिक आधार असलेल्या जीवन पद्धती “परंपरा” म्हणून आपल्या भारतात आजही पाळल्या जातात. त्यातीलच एक दिवाळीला केले जाणारे अभ्यंगस्नान.

“अभ्यंगस्नान” ह्या शब्द दोन शब्दांना जोडून बनलेला आहे. अभ्यंग म्हणजे तेलाने केलेली मालिश, आणि स्नान म्हणजे अंघोळ. ही फक्त दिवाळीसाठी असलेली एक परंपरा नसून दररोज अभ्यंगस्नान करणं अतिशय लाभदायी आहे. कसं ते पाहूया.

 

 

अभ्यंगस्नान हे आपण वर्षातून एकदाच नरकचतुर्दशीच्या दिवशी करतो. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून, अंगाला तिळाचे तेल लावून मालिश करून, औषधी उटण्याने अंघोळ करतो. अभ्यंगस्नान हे नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्याने सगळी मरगळ आणि आळस निघून जी तरतरी येते, जो उत्साह येतो त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण. या अभ्यंगस्नानाचे वैज्ञानिकदृष्ट्या बरेच फायदे आहेत.

१) तणावातून मुक्ती मिळते –

संशोधातून असे समोर आले आहे, की सुगंधी तेलाने केलेल्या मालिशमुळे आपला ताण ९०% कमी होतो.

२) हृदयविकारांपासून बचाव होतो –

 

 

ताणाचा आपल्या चेतासंस्थेवर म्हणजेच नर्व्हस सिस्टमवर अतिशय नकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे हृदय विकार होऊ लागतात.

अभ्यंगस्नान करताना केलेल्या तेलाच्या मालिशमुळे व वापरल्या जाणाऱ्या सुगंधी उटण्यामुळे ताण कमी होतो. हृदयाच्या नसा आणि रक्तवाहिन्या मोकाळ्या होऊन रक्ताभिसरण सुरळीत होते. ज्याने हार्टअटॅक, ब्लॉकेज हे विकार टाळले जातात.

३) रक्तदाबाचा त्रास नाहीसा होतो –

भरपूर वैज्ञानिकांनी अंगाच्या मालिशचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात याच्याविषयी संशोधन केलेले आहे.

त्यांच्या संशोधनानुसार, अभ्यंगस्नान करताना केल्या जाणाऱ्या विविध तेलांच्या मालिशने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन हायपरटेन्शन आणि रक्तदाबाचा त्रास नाहीसा होतो.

४) त्वचेचे सौंदर्य खुलते –

 

 

 

हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊन फाटणे, भेगा पडणे हे त्रास सुरू होतात, पण अशावेळी आपण तेलाने मालिश करून ते तेल अंगात मुरु दिल्यास हे त्रास कमी होतात.

अभ्यंगस्नानात सोबतीला उटणं असतंच. उटण्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचेला येणारी खाज कमी होते आणि कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा इन्फेक्शन झाले असेल ते नाहीसे होते.

याच बरोबर त्वचेवर सुरकुत्या येणे, डाग येणे आणि उर्वरित म्हातारपणाची लक्षणेही कमी होतात.

या अभ्यंगस्नानाचा फायदा द्विगुणित होण्याकरता आपण योग्य तेल वापरणे गरजेचे आहे –

 

 

कोरड्या त्वचेकरिता बदाम, तीळ आणि अवोकाडोच्या तेलाचा वापर करावा.

संवेदनशील त्वचेकरिता तूप किंवा सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करावा.

तेलकट त्वचेकरिता जवसाच्या किंवा सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतील.

५) स्नायू व सांधे मोकळे होतात –

अभ्यंगस्नानात डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंत संबंध अंगाची तेल लावून मालिश केली जाते. तेलाच्या मालिशने व उटण्याच्या रवाळ दाण्यांनी आपले अकडलेले स्नायू व सांधे मोकळे होतात.

६) हाडं मजबूत होतात –

 

 

लहान मुलांची नियमित तेलाने मालिश करून अंघोळ घातली जाते. त्यांची हाडं बळकट व्हावी हे त्यामागील कारण होय, पण आपण मोठे झालो की आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. पोटातून खाल्लेले कॅल्शियमच आपल्याला पुरेल हा समज होऊन आपण मालिश करण्याकडे फारसे लक्ष देत नाही.

ज्यांना हाडं आणि सांधे दुखण्याचा त्रास आहे, त्यांनी आपली हाडं मजबूत होण्यासाठी वेगवेगळ्या तेलांनी नियमित मालिश केल्यास त्यांची हाडं मजबूत होतील.

नियमित अभ्यंगस्नान केल्याचा हा एक खूप मोठा फायदा आहे, ज्यामुळे मणक्यात गॅप येणे, अवेळी हाडं ठिसूळ होणे हे त्रास आपल्याला लवकर शिवणार नाहीत.

याचबरोबर मालिशचे भरपूर फायदे आहेत. जसे –

स्फूर्ती आणि सतर्कता वाढते.

शारीरिक शक्ती आणि बळ वाढते.

अभ्यंगस्नान करण्याची योग्य पद्धत –

 

 

तेल कोमट करून घ्या. तेलाने मालिश केल्यानंतर अर्धा तास हे तेल अंगात मुरू द्या आणि मग अंघोळ करा. गर्भवती स्त्रियांनी, फ्रॅक्चर झालेल्यांनी आणि कोणती शारीरिक समस्या असलेल्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने अभ्यंगस्नान करावे.

या अत्यंत गुणकारी अभ्यंगस्नानाचा फायदा करून घेण्यासाठी आपण रोज हे स्नान करू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version