Site icon InMarathi

आईची नोकरी गेल्यामुळे लेकाने केलं असं काम, की सगळे करतायत सलाम!

subhaan seling tea inmrathi3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०२० हे वर्ष कोरोनामुळे झालेल्या नुकसानामुळे प्रत्येकाच्या नेहमीच लक्षात राहील. चीन मधून सुरुवात झालेल्या या व्हायरसने आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर किती मोठा परिणाम केलाय आहे हे येणारा काळच सांगेल.

जागतिक अर्थकारणाला इतका जबर धक्का देणारी ही एकमेव घटना असेल हे सगळेच मान्य करतील. जगभरातील कित्येक लोकांवर कोरोनामुळे बेरोजगारीची वेळ आली.

ज्या लोकांची नोकरी टिकून राहिली त्यांना पगार कपात, सक्तीची रजा असे काही पर्याय मान्य करावे लागले. अचानक ओढवलेल्या या परिस्थितीत आपल्या सगळ्यांच्याच मानसिक स्थैर्याचा कस लागला. समाजातील प्रत्येक वर्ग कोरोनामुळे आलेल्या आर्थिक आव्हानांमुळे बदलला हे नक्की!

ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी एकत्र येऊन या परिस्थितीचा सामना केला, त्यांना कोरोनामुळे एक नवीन दिशा मिळाली. लोक अजून जबाबदार झाले. आर्थिक तूट भरून काढणे ही फक्त कुटुंब प्रमुखाची जबाबदारी नसते, त्यासाठी सगळ्यांचं योगदान लागतं हे आपल्याला कळलं.

मुंबई मधील एका कुटुंबाने असाच एक आदर्श लोकांसमोर ठेवलाय. सुभान या १४ वर्षाच्या मुलाने असं एक काम करून दाखवलंय.

 

 

सुभानच्या वडिलांचं १२ वर्षांपूर्वी निधन झालं. सुभानच्या आई या एका स्कूल बससाठी अटेंडन्ट म्हणून काम करत होत्या.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शाळा ऑनलाईन झाल्या आणि स्कूलची गरजच संपली आणि कित्येक लोकांची नोकरी गेली. सुभानच्या आईला सुद्धा या दिवसांत नोकरी सोडावी लागली.

कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीची नोकरी गेल्याने पूर्ण कुटुंब एका कठीण परिस्थितीतून जात होतं. सुभान या परिस्थितीत समोर आला आणि त्याने पूर्ण कुटुंबाची आर्थिक जवाबदारी घ्यायची ठरवली.

नागपाडा, भेंडी बाजार या भागात सुभानने स्वतःची चहाची टपरी सुरू केली. स्वतःची शाळा थांबवली आणि आपल्या बहिणींना ऑनलाईन शाळा अटेंड करण्यासाठी आर्थिक तरतूद केली.

कोरोनानंतर सुभान परत शाळेत जाण्यास सुरुवात करणार आहे, पण सध्या त्याने फक्त त्याच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं आहे. काही दिवसांपूर्वी ही बातमी सोशल मीडिया वर आली आणि ANI या वृत्तवाहिनीने सुभानची मुलाखत घेतली.

 

 

सुभानने त्यावेळी सांगितलं की, “मी रोज भेंडीबाजार इथे चहा बनवतो आणि नागपाडा सारख्या इतर भागात सुद्धा जाऊन चहा विकतो. माझ्याकडे चहाचं दुकान नाहीये, पण मी त्यासाठी थांबलो नाही. मी रोज ३०० ते ४०० रुपये कमावतो आणि माझ्या आईला देतो. त्यातील काही पैसे मी बचत खात्यात सुद्धा जमा करतो.”

इतक्या कमी वयात असलेल्या या समजूतदारपणाचं आणि जबाबदारी घेण्याच्या स्वभावाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आर्थिक समस्या या कधीच कायमस्वरूपी नसतात. तुम्ही त्या आल्यावर कसे वागता? यावर त्या आर्थिक समस्येचा काळ ठरतो असं म्हणता येईल.

काही दिवसांपूर्वी आपण ‘बाबा का ढाबा’ हे सुद्धा असंच उदाहरण आपण बघितलं, जिथे ८० वर्षाच्या व्यक्तीला त्याच्या हॉटेलमध्ये ग्राहक मिळत नव्हते. सोशल मीडिया वर ही खबर वाऱ्यासारखी पसरली आणि एका रात्रीत ‘बाबा का ढाबा’ पूर्ण दिल्लीला कळला.

आजपासून दहा वर्षांपूर्वी हे शक्य होत नव्हतं, पण आज इंटरनेट हे कित्येक लोकांसाठी एक ढाल म्हणून काम करत आहे. उद्या सुभानच्या हातचा चहा पिण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या तर प्रत्येकाला आनंदच होईल.

 

 

संपूर्ण भारतात प्रगतशील राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात कोरोनाने गाठलेला उच्चांक हा खरंच एक चिंतेचा विषय आहे. मागच्या काही दिवसात कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बदलेल असा आशावाद निर्माण झाला आहे.

दिवाळीनंतर सुद्धा कोरोना परिस्थती नियंत्रणातच असावी आणि ही दिवाळी सुभान सारख्या प्रत्येक मेहनती व्यक्तीच्या आयुष्यात भरभराट घेऊन येणारी असावी अशी आशा करूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version