Site icon InMarathi

कीबोर्डवर असलेल्या F आणि J बटनांवर खुणा का असतात? जाणून घ्या

keyborad inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या ‘कि बोर्ड’वर सुमारे १०० किज असतात. १९७० मध्ये एक रचना निश्चित ठरवण्यात आली आणि ती सर्व कॉम्प्युटर तयार करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली.

कॉम्प्युटर किबोर्डची रचना ही बऱ्यापैकी आपल्या जुन्या टाईपरायटर सारखीच असते. फक्त टाईपरायटर पेक्षा कॉम्प्युटरमध्ये एस्केप (ESC), डिलीट (Delete), फंक्शन किज, शिफ्ट हे जास्तीचे पर्याय आणि बटन्स असतात.

या सर्व किजला मुख्यत्वे तीन प्रकारात सांगायचं तर ते अल्फाबेट्स, न्यूमरीक आणि punctuations हे तीन प्रकार ठळकपणे सांगता येतील.

कॉम्प्युटर किबोर्ड मध्ये कर्सर किजचा सुद्धा महत्वाचा रोल असतो. एक्सेल मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी तर या कर्सर किज अत्यंत महत्वाच्या आहेत.

आपल्याला माहीत आहे का इतक्या महत्वाच्या किज असतांना सुद्धा लेटर F आणि लेटर J या किज वर एक छोटा पण ओळखू येणारा उंचवटा/एक लाईन का दिलेली असते?

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – F1 ते F12 या Function Keys चा योग्य वापर समजून घ्या आणि मित्रांनाही सांगा

कदाचित आपण F आणि J लेटर्सचं हे वैशिष्ट्य बघितलं नसेल. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या आसपास असाल तर पटकन बघून घ्या; म्हणजे आम्ही कशाबद्दल सांगत आहोत हे आपल्या लगेच लक्षात येईल.

कॉम्प्युटर वरच्या किजची जागा खाली न बघता लक्षात येण्यासाठी ही रेष F आणि J या दोन बटनांवर देण्यात आली आलेली असते. हा बदल June E Botich यांनी सुचवला होता.

या दोन किजला ‘पोझिशन किज’ हे नाव देण्यात आलं आहे. या दोन किज कडे न बघताही तुम्ही दिलेल्या रेषेमुळे टाईप करू शकता.

आपण जर का टाइपिंगचा कोर्स केलेल्या असल्यास तुम्हाला आठवेल, की पहिला कोर्स हा आपले दोन्ही हात कोणत्या लेटर वर ठेवावेत? हे शिकवलं जातं.

या पहिल्या कोर्समध्ये तुमचा डाव्या हाताची चार बोटं हे तुम्हाला A, S, D, F या किज वर ठेवायचं शिकवलं जातं आणि उजव्या हाताची चार बोटं ही J, K, L, ; (कोलन) या किज वर ठेवायचं शिकवलं जातं. अंगठा हा स्पेस बार वर ठेवायला शिकवला जातो.

कॉम्प्युटर टायपिंग शिकवण्याची ही पद्धत फक्त टायपिंगची गती (स्पीड) वाढवण्यासाठी ठरवण्यात आली आहे. टायपिंग करणाऱ्या व्यक्तीची चूक होऊ नये या उद्देशाने हे शिकवण्यात येतं.

 

 

जेव्हा तुमच्या दोन्ही हाताची बोटं या दोन किज वर असतात, तेव्हा तुम्हाला किबोर्ड वरील कोणतीही किज शोधायला सोपं जातं, हे सुद्धा या दोन किजचं वैशिष्ट्य सांगता येईल.

कॉम्प्युटर माहिती इनपुट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या किबोर्डला गतीने हाताळणं हे आजकाल प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्यासाठी वापरात येणारे Ctrl+Alt+Del हे शॉर्टकट सुद्धा माहीत असायला हवे आहेत.

आपण दिलेल्या इनपुटवरच कॉम्प्युटर कडून येणारं आउटपुट हे अवलंबून असतं, तेव्हा आपल्याला किबोर्डची पूर्ण माहिती असायलाच हवी. 

कॉम्प्युटरची बेसिक माहिती शिकवणारा MS-CIT हा कोर्स राज्य सरकारने खूप वर्षांपासून सुरू केला आहे. सध्याच्या परिस्थतीत नव्याने कॉम्प्युटरचा वापर शिकणाऱ्या व्यक्तींसाठी हा अभ्यास महत्वाचा ठरू शकतो.

स्मार्टफोनचा वापर कितीही वाढलेला असला तरीही कॉम्प्युटर, लॅपटॉप हे आपलं स्थान टिकवून आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याच्यातील काही बारकावे शिकून स्वतःला या डिजिटल क्रांती साठी सज्ज करावं आणि आपल्या बिजनेस, नोकरी मध्ये यश मिळण्यास अजून एक प्रयत्न करावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version