Site icon InMarathi

उतारवयात हाडांचा त्रास होऊ नये, म्हणून आजपासूनच या गोष्टी पाळा!

bone health inmrathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

असं म्हणतात, की “शरीर हे एक मशीन” आहे. या यंत्राचा अर्थात आपल्या शरीराचा आधार म्हणजे आपली हाडं. हाडांवरच आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया अवलंबून आहेत.

कधी विचार केलाय का की उतार वयात, शरीरातील कोणत्या घटकाची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते? हाडं! म्हातारपणात हाडांचे भरपूर त्रास उद्भवतात. जसे, हाडांत गॅप येणे, हाडे ठिसूळ होणे, म्हातारपणात हलक्याश्या धक्क्याने हाडं तुटण्याचा, दुखण्याचा भयंकर त्रास जाणवू शकतो.

माणसाची हाडं बाल्यावस्थेपासून वाढायला सुरुवात होऊन, किशोरावस्थेत हाडं वाढण्याचा वेग वाढतो. ३० वर्षापर्यंत आपली हाडं पूर्णपणे वाढलेली असतात. त्यामुळे हा काळ आपल्या शरीराकडे विशेष लक्ष देण्याचा काळ असतो. यावेळेत जर आपण आपल्या हाडांची योग्य काळजी घेतली, तर म्हातारपणात होणारे त्रास टाळता येऊ शकतात.

या वयात हाडांची वाढ एकदम व्यवस्थित होऊन ती दणकट व मजबूत होण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याच्या काही टिप्स पाहूया!

१) कॅल्शियमयुक्त आहार घ्या –

 

 

आपली हाडं ही ६०% कॅल्शियमने बनलेली असतात. त्यामुळे हाडांच्या वाढीला चालना देणाऱ्या कॅल्शियमचा आपल्या आहारात समावेश असायलाच हवा.

कॅल्शियम आपल्याला दूध, ताक, दही, चीज, सोयाबीनच्या वड्या, तोफू, बदाम, पांढरे तीळ, पालक, सॅल्मन मासळी यांपासून मिळते.

कॅल्शियम जर नैसर्गिकरित्या अन्न पदार्थांतून मिळाले तर उत्तम. शक्यतो कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणे टाळा.

कॅल्शियम आपण जितके घेऊ, त्यापेक्षा कमी प्रमाण शरीरात शोषले जाते. त्यामुळे दिवसातून २-३ वेळा कॅल्शियमयुक्त अन्न पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.

२) प्रोटिनयुक्त आहार घ्या –

 

 

कॅल्शियम बरोबरच हाडांच्या वाढीसाठी प्रोटिनअत्यंत महत्त्वाचं आहे. ४०% हाडं ही प्रोटीन पासूनच बनलेली असतात, त्यामुळे आपल्या आहारातून आपल्याला पुरेसे प्रोटिन मिळतंय की नाही, हे बघा.

प्रोटीन मिळण्यासाठी आपल्या आहारात – वेगवेगळ्या डाळी, सुका मेवा, अंडी, मोड आलेले कडधान्य, जवस, अळीव, शेंगदाणे यांचा समावेश करा.

३) सकस आहार घ्या –

आपल्या आहारातून आपल्याला व्हिटॅमिन डी, के, मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फोरस मिळतंय का हे बघा. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश करा.

व्हिटॅमिन डी जे सगळ्यात महत्वाचे असते, ते आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. याच व्हिटॅमिनमुळे आपली हाडं कॅल्शिअम सुरळीतपणे शोषून घेतात. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष ठेवा आणि सकस, संतुलित आहार घ्या.

 

 

४) व्यायाम करून शरीराला अॅक्टिव्ह ठेवा –

 

 

एखादी मशीन बंद असली, की ती व्यवस्थित काम करत नाही, त्याच प्रमाणे शरीर अॅक्टिव्ह नसल्याने हाडं आणि सांधे अकडतात. शरीर अॅक्टिव्ह राहिल्याने सांधे लवचिक होतात व हाडं दणकट राहतात.

व्यायाम करताना, वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या आणि स्ट्रेचिंग या व्यायाम प्रकारांवर जास्त भर द्या. याने उतारवयात होणारा हाडांच्या आजारांचा त्रास कमी होतो.

५) कॅफिन टाळा –

 

 

कॅफिनचं सेवन जास्त असेल, तर हाडांच्या कॅल्शियम शोषूण घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दिवसाला १-२ कप कॉफी किंवा चहा इतकंच घ्या.

६) अमली पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळा –

 

 

धुम्रपान, तंबाकू, बिडी, मद्यपान या सगळ्यापासून कधीही लांबच राहिलेलं बरं. या सगळ्यांमुळे बोन लॉस होऊन, फ्रॅक्चर व हाडं ठिसूळ होण्याची दाट शक्यता असते.

याशिवाय फुफ्फुसासंबंधी आजार, कॅन्सर वगैरे होण्याचीही भीती असते. त्यामुळे आजच या पदार्थांचे सेवन थांबवा.

 

७) लो कॅलरी डायट टाळा –

वजन कमी करणे म्हणजे कमी कॅलरी शरीरात जाऊ देणे हा एक मोठा गैरसमज आज पसरलेला आहे. वजन करण्याच्या नादात आपण योग्य तो आहार घेत नाही. शरीराला हव्या त्या घटकांचा योग्य पुरवठा होईल असा आहार घ्या.

संशोधनानुसार, झटपट वजन कमी करताना होणारी हाडांची हानी कधीही भरून निघत नाही. आपला बोन लॉस होऊन, पुन्हा वजन जरी वाढले तरी ती हाडं नाजूकच राहतात.

 

 

शरीराच्या सगळ्याच समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम या दोनच गोष्टी पाळा आणि आनंदी, रोगमुक्त जीवन जगा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version