Site icon InMarathi

नखांच्या बाजूची त्वचा निघाल्यामुळे विव्हळण्यापेक्षा, “असं का होतं?” आणि उपाय, वाचा

nail peeling inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पहिल्या इम्प्रेशनसाठी फक्त आपला चेहरा आणि कपडे महत्वाचे असतात असं नाहीये. पर्सनल गृमिंगचा एखादा युट्युब विडिओ बघितला असेल, तर त्यात आपल्या नखांचा सुद्धा विशेष भाग असतो हे आपल्याला कळून येईल.

नखं ही फक्त बोटाच्या संरक्षणाकरता असतात असं नाही. नखांवरून सुद्धा आपले व्यक्तिमत्व ठरवले जाऊ शकते.

नखं नीट नेटकी व्यवस्थित कापलेली असतील, तर सदर व्यक्तीचे काम सुद्धा नीटनेटके आहे हे समजते. नखं खाल्लेली असतील, तर व्यक्ती कठीण प्रसंगी घाबरून जाते किंवा अतिरिक्त ताण घेते हे दिसून येते.

नखांची नीट काळजी घेतली नाही, की आपल्या नखांच्या आजूबाजूला असलेली त्वचा निघते. हे दृश्य दिसायला ही फार किळसवाण वाटतं आणि ही सालं निघण्याची प्रक्रिया फार त्रास दायक असते.

 

 

तुम्हीही या बोटांची सालं निघण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर पुढील लेख हा तुमच्या भरपूर उपयोगाचा आहे. नखांच्या आजूबाजूची सालं का निघतात याची काही कारणं व त्यावरील उपाय –

१) वातावरणातील बदल –

वातावरणातील बदलामुळे सुद्धा हा त्रास उद्भवतो. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी होऊन हा त्रास होतो. यासाठी वातावरण बघून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात हाताला मोईश्चरायझिंग हॅन्ड क्रीम लावा, जास्त वेळ हात पाण्यात भिजत राहू देऊ नका. उन्हात जात असाल, तर हातमोजे घाला आणि योग्य सनस्क्रीन लावा.

२) केमिकल्सचा संपर्क –

आपले हात दिवसभर कितीतरी वेळा केमिकल्सच्या संपर्कात येतात. सगळ्यात जास्त नुकसान हे भांड्याच्या व कपड्याचा साबणाने होत असते.

ज्यांना हा त्रास आहे त्यांनी शक्यतो अशी कामं करताना किचन ग्लव्जचा वापर करावा. याने हात कोणत्याही प्रकारच्या केमिकल्सच्या संपर्कात येणार नाहीत.

 

 

सौंदर्य प्रसाधने निवडताना त्वचेवर कोमल ठरतील अशी सौंदर्य प्रसाधने निवडा यामुळे नखांच्या आजूबाजूची सालं निघणार नाहीत.

३) हॅन्ड सॅनिटायझरचा जास्त वापर  – 

अल्कोहोल बेस असलेल्या हॅन्ड सॅनिटायझरचा अतिरेक झाला, की नखांच्या बाजूची त्वचा निघू लागते. काही लोक वारंवार हॅन्ड सॅनिटायझर वापरतात, त्यामुळे नखांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय कोरडी होऊन निघू लागते. म्हणून, हॅन्ड सानिटायझरचा अनावश्यक वापर टाळा.

४) व्हिटॅमिनची कमतरता –

कधी कधी नखांच्या आजूबाजूची सालं निघणं हे एक शरीरात सुरु असलेल्या गडबडीचे लक्षण असू शकते. ही सालं निघायला लागली, की त्वरित डॉक्टरांना भेटा. आपल्या शरीरात व्हिटॅमिन B3 ची कमतरता असू शकते.

 

 

डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने आपल्या आहारात बदल करून या त्रासापासून सुटका मिळू शकते.

५) त्वचाविकार –

सोरायसिस, हॅन्ड एक्झिमा, एक्सफोलिएटीव्ही केरॅटोलिसिस (Exfoliative keratolysis) ह्या सगळ्याच रोगांची अगदी पहिल्या स्टेजची लक्षणं म्हणजे नखांच्या आजूबाजूची सालं निघणं, पण नेहमीच नखांची सालं निघणं हे वेगळं आणि या रोगांमुळे निघणं वेगळं.

या रोगांमुळे सालं निघत असतील तर, त्वचा लालसर होणे, खाज येणे, भेगा पडणे, आग होणे आणि सालं निघणे इतक्या गोष्टी होतात.

जर आपल्या नखांच्या आजूबाजूची सालं निघणं कमी होत नसून उलट दिवसेंदिवस वाढत असेल, त्यात पस होत असेल किंवा जखम होत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा व त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील ट्रीटमेंट सुरु करा.

६) कावासाकी आजार –

 

 

हा रोग ५ वर्षाखालील वयोगटातील मुलांना होतो. या आजाराच्या तीन स्टेजेस असतात.

पहिल्या स्टेज मध्ये ५ दिवसांपर्यंत भरपूर ताप येतो.

दुसऱ्या स्टेज मध्ये बोटांची आणि नखांच्या आजूबाजूची सालं निघू लागतात व हे वाढत जाते.

तिसऱ्या स्टेज मध्ये तळहात, हाता- पायांची बोटं हे सगळे भरपूर सुजते. त्यामुळे तापानंतर बाळाच्या नखांच्या आजूबाजूची सालं निघतायत का याकडे लक्ष द्या आणि वेळीच डॉक्टरांना दखवून उपचार सुरु करा.

७) अॅलर्जी –

 

 

नखांच्या आजूबाजूची सालं निघण्याला कारणीभूत असलेल्या अॅलर्जीमध्ये निकेल अॅलर्जी किंवा लॅटेक्सच्या अॅलर्जीचा समावेश आहे. यामुळे anaphylactic shock ही समस्या निर्माण होते. ज्यात त्वरित उपचारांची गरज असते.

या अॅलर्जीत आपल्या हाताची बोटं सुजतात, खाज येऊन सालं निघतात. त्यामुळे हे सगळे संकेत दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून उपाचार सुरु करा.

लॅटेक्स हे किचन ग्लव्जमध्ये सुद्धा आढळते. हे ग्लव्ज वापरणाऱ्या व्यक्तीला ही अॅलर्जी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जेव्हाही ग्लव्ज विकत घ्याल, तेव्हा ते लॅटेक्स फ्री आहेत की नाही हे तपासूनच घ्या.

८) पाण्याची कमतरता –

 

 

डिहायड्रेशन झाल्याने बरेच विकार होतात. त्यातील एक म्हणजे नखांच्या आजूबाजूची सालं निघणं. वारंवार हा त्रास होत असेल, तर दिवसभरात आपण ८-९ ग्लास पाणी पितोय का याकडे लक्ष द्या. लक्षात राहत नसेल, तर आपल्या स्मार्टफोन मध्ये अलार्म लावा.

वरील गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version