सावधान! त्वचेची योग्य काळजी घेतली नाहीत, तर हिवाळा सौंदर्यासाठी घातक ठरेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गुलाबी थंडी – आपल्या सर्वांच्या आवडीचा ऋतू. थंडी पडली, की आपल्याला वेध लागतात ते स्वेटर्स, कानटोपी आणि दुलईचे.
थंडी हा ऋतू बऱ्याच जणांचा सर्वात आवडता असण्यामागे हे पण कारण असावं, की या दिवसात तुम्ही ‘घड्याळाकडे न बघता’ बाहेर फिरू शकता. म्हणजे असं की, उन्हाळ्यात दुपारी बारानंतर कुठे बाहेर जाणे म्हणजे उन्हाचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात तर सगळंच बेभरवशी. या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला हिवाळ्यात विचार करावा लागत नाही.
या दिवसात इतर दोन्ही ऋतूंमध्ये काही लोकांना होणारे पचनाचे त्रास होत नसतात. खाण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम मानला जातो.
या आल्हाददायक हिवाळ्यात एक आव्हान असतं ते म्हणजे त्वचा निरोगी ठेवण्याचं. ज्याला कदाचित काही दिवसांनी ‘स्किन केअर चॅलेंज’ हे नाव दिलं जाईल.
त्वचा कोरडी होण्याचा त्रास हिवाळ्यात खूप लोकांना त्रास होत असतो. चेहरा कोरडा पडणे, हात कोरडे पडणे हे या दिवसात होणं अगदी स्वाभाविक आहे. त्वचेच्या या त्रासांची योग्य काळजी घेतली पाहिजे.
काही भागात जिथे तापमान अगदी कमी असते, तिथे या दिवसांत हिटर लावून घर उबदार ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण या दिवसात हिटर किंवा इतर कोणत्याही पद्धतीने उबदार वातावरण तयार करायचा प्रयत्न केला, तरीही त्वचा ही कोरडी होतच असते.
हे टाळण्यासाठी काय करावं? खालील गोष्टी लक्षात ठेवा :
१. योग्य Moisturizer वापरा:
आपण कोणतं ना कोणतं moisturizer क्रीम वापरत असतो. त्यातील काही फक्त उन्हाळ्यासाठी असतात, पण आपण ते अनावधानाने वर्षभर वापरत असतो. हिवाळ्यात moisturizer घेतांना त्यात ऑइलचं प्रमाण म्हणजे “ऑइंटमेंट” किती आहे ते तपासून घ्या.
वॉटर बेस आणि ऑइल बेस या दोन प्रकारचे moisturizer उपलब्ध असतात. त्यापैकी ऑईल बेस त्वचेवर एक थर निर्माण करून त्वचेची काळजी घेतात.
ऑईल बेसमध्ये सुद्धा मिनरल ऑईल, प्रीमरोझ ऑईल किंवा आलमंड ऑईल या प्रकारांना प्राधान्य दिलं जावं.
२. योग्य सनस्क्रीन लोशन निवडा:
सनस्क्रीन म्हणजे फक्त उन्हाळ्यात वापरावं असा काहींचा समज असतो, तसं काहीही नसतं. हिवाळ्यात सनस्क्रीन लोशन वापरताना फक्त ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’ सनस्क्रीन लोशन निवडावं असं तज्ञ लोक सांगतात.
बाहेर जाण्याच्या ३० मिनिटं आधी तुम्ही हे लोशन हातांना लावू शकता. तुम्ही जर खूप वेळ बाहेरच असणार आहात तर ते लोशन नियमित वापरा.
३. हातांची जास्त काळजी घ्या:
हातांची त्वचा नाजूक असते. तुमच्या हातांना कोरडं न होऊ देण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, हाताला खाज सुटणे किंवा भेगा पडणे असे त्रास होऊ शकतात. त्यासाठी जास्तीत जास्त वेळेस हातमोजे (ग्लोव्हज) वापरावेत.
४. ओले हातमोजे आणि पायमोजे घालू नका:
ओले हातमोजे जास्त वेळेसाठी हातात राहिल्यावर किंवा ओले पायमोजे तसेच राहिल्यावर हिवाळ्याच्या दिवसात त्वचेला खाज सुटू शकते. ते चुकूनही या दिवसात वापरू नयेत.
५. मुबलक पाणी प्या:
हिवाळ्यात तहान कमी लागते, तरीही योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. याने त्वचा तजेलदार राहते.
६. पायांची विशेष काळजी घ्या:
हिवाळ्यात तुमच्या पायांना पेट्रोलीयम जेली किंवा ग्लिसरीन लावा. त्यामुळे पायाची त्वचा कोरडी होणार नाही कारण त्यात moisturizer लवकर आणि आतापर्यंत पोहोचेल.
७. गोळ्या कमी करा:
तुमची त्वचा कोरडी होत असेल, तर त्यासाठी कोणतीही गोळी ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. तुमच्या त्वचेला त्यामुळे त्रास होऊ शकतो.
८. खूप गरम पाणी वापरू नका:
हिवाळा आहे म्हणून खूप कडक पाण्याने आंघोळ करू नका. त्यामुळे त्वचा कोरडी होते.
९. डॉक्टरांचा सल्ला घ्या:
जर तुमची त्वचा सतत कोरडी होत असेल, तर प्रत्येक वेळी फक्त मेडिकलमध्ये विचारून क्रीम खरेदी करू नका. तुमच्या त्वचेच्या समस्या समजून घेण्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडे जा. त्यानुसार ,एकदाच योग्य ती ट्रीटमेंट घ्या.
महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स विकत घेतांना ते तुमच्या त्वचेला योग्य आहेत, की नाही ते आधी तपासून घ्या. योग्यवेळीच समस्या ओळखा आणि चिंता न करता हिवाळ्याचा आनंद घ्या
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.