Site icon InMarathi

फक्त एकच मासा पकडून आजीबाई झाली लखपती, वाचा थक्क करणारी कथा!

granny inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आर्थिक बाबतीत कोणाचं नशीब केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही. कोणाचे पडलेले शेअर्स अचानक उभारी घेऊन लाखोंच्या फायद्यात जातात.आधीच कोरोनामुळे अनेकजण हवालदिल झाले आहेत.

मागे नाशिक मधल्या कोथिंबीरीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या कोथिंबीरला लाखोंची बोली लागली होती.बराच काळ ती बातमी ट्रेंड मध्ये सुद्धा होती.

अचानक लॉटरी लागल्यासारखी असे अनेक घटना या आपल्या आजूबाजूला घडत असतात. अशीच घटना घडली ती बंगाल मधल्या एका आजीबाई सोबत.

भगवान जब देता है तब छप्पर फाड के देता है, असे या आजींबद्दल बोललो तर वावगे वाटायला नको.

एका दिवसात त्यांचा ‘वक्त बदल गया,जजबात बदल गये’ असंच काहीसं झालं! या आजी पेशाने कोळी. मासेमारी हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन.

पण वयामुळे आणि एकट्या असल्याने त्यांच्याकडून हवी तेवढी मासेमारी केली जात नाही. त्यामुळे आर्थिक बाबतीत सुद्धा तंगी.

 

 

पण, त्यादिवशी त्यांच्या जाळ्यात मासा नाही तर सोन्याचा मासा आला म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. आजीबाईचे दिवस फिरले. गरिबीतून थेट त्या लखपती झाल्या.

तर झालं असं, बंगालच्या सुंदरबन भगत गंगा बंगालच्या उपसागरात जिथे मिळते तिथे चकपुतडुबी या गावात त्या आजी राहतात. त्यांचं नाव पुष्पा कर.

रात्री जाळं टाकून दिवसा त्यातून मासे काढण्यासाठी त्या गेल्या असता त्यांच्या जाळ्यात असा मासा आला होता ज्याची किंमत लाखांच्या घरात होती.

भोला प्रजातीचा हा मासा हा तसा सामान्य. पण पुष्पा यांच्या जाळ्यात अडकलेला मासा तब्बल ५२ किलो वजनाचा होता.

पुष्पा सांगतात, नेहमी प्रमाणे त्यांचा दिवस किनाऱ्यावर गेला. जाळे मोकळे करून मासे विकण्यासाठी त्यांची तयारी चालू होती. पण आज त्यांचं जाळं जरा जास्तच जड वाटत होतं.

आधी जाळं कुठे तरी अडकले आहे असं वाटलेलं पण नंतर लोकांच्या मदतीने ओढून बाहेर काढलं तर सगळ्यांचे डोळे विस्फारले.

एक भला मोठा बंगाली भोला मासा त्याच्या जाळ्यात होता. एवढा मोठा मासा त्यांनी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. ग्रामस्थांच्या माहितीनुसार मासा आकाराने आणि वजनाने खूप मोठा होता.

आणि वजनामुळे त्याला किंमत सुद्धा चांगली मिळेल. ग्रामस्थांच्याच मदतीने तो मासा बाजारात आणला गेला. एका ग्रामस्थाच्या मते पुष्पा यांचं आयुष्य हा मासा बदलवून टाकू शकतो.

 

 

हा मासा बाजारात शंभर नव्हे, हजार नव्हे, दहा हजार नव्हे तर लाखो रुपये मिळाले आहेत. तब्बल तीन लाख रुपयांना हा मासा विकला गेला.

पुष्पा म्हणतात, त्यांनी आजपर्यंत एका दिवसात एवढी कमाई कधीच नाही केली. एवढा पैसा पाहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ.

त्यांनी ६२०० रुपये प्रति किलो किमतीने हा मासा विकला. ज्यामुळे त्यांना तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्या माशामुळे मिळाले आहे.

मासा जाळ्यात मेलेला होता. जर तोच मासा त्यांनी जिवंत बाजारात आणला असता तर त्यांना अजून जास्त किंमत त्याची मिळाली असती अस बाजारातल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

एक दृश्य डोळ्यासमोर आणा. मुंबईच्या डॉकवर ५० किलोचा रावस मासा सापडला आहे. आता अंदाज लावा की लिलावात याची किती किंमत जाईल? निश्चितच लाखाच्या घरात.

पण हा भोला मासा खाण्यासाठी कमीच वापरतात.औषध आणि तेल यासाठी याचा जास्त वापर होतो. म्हणून ६००० रुपये किलो त्याला भाव मिळाला.

 

हे ही वाचा – मुलांच्या भविष्याची चिंता वाटतेय? बचतीचे हे मार्ग तुम्हाला नक्कीच चिंतामुक्त करतील…

तोच जर मासा जिवंत असता तर दहा ते पंधरा हजार किलो पर्यंत भाव त्यांना मिळाला असता.

भोला माश्याच्या प्रजातीचे सुक्या माशांना तब्बल ८०,००० किलो एवढा भाव आहे. दक्षिण पूर्व आशियात या माशांना प्रचंड मागणी असते.

तर, कोणाचं नशीब कसं फळफळेल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघड आहे, हे पुष्पा कर यांच्या सोबत घटनेने कळून येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version