आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जेवताना पाणी प्यायल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा आईचा ओरडा खावा लागतो. जेवताना पाणी पिणे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे असे बरेच एक्सपर्टसुध्दा सांगतात.
पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तेही गरजेचे असते मग, आपण नक्की काय केले पाहिजे? पाणी कधी प्यायले पाहिजे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असे असेल.
–
- गरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..?
- जेवणानंतर आपल्याकडून नकळत होणार्या या गोष्टी ठरू शकतात अत्यंत घातक!
–
आयुर्वेदाने पाणी कधी प्यावे यावर दिलेले उत्तर :
आयुर्वेदात जेवताना, जेवणानंतर किंवा जेवणा दरम्यान पाणी पिण्याला चुकीचे म्हटलेले नाही. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनानुसार जेव्हा तुम्हाला पाणी प्यावेसे वाटेल तेव्हा पाणी पिणे गरजेचे आहे मग, ते जेवणाआधी असो जेवणानंतर असो वा जेवणात दरम्यान!
परंतु जेवणाआधी, जेवणादरम्यान व जेवण झाल्यावर पाणी किती प्रमाणात आणि कधी प्यावे याचे काही नियम आयुर्वेदाने घालून दिले आहेत ते आपण जाणून घेऊयात!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पाश्चात्त्य अभ्यासकांचे असे म्हणणे आहे जेवणाआधी पाणी पिणे जठराच्या आरोग्यासाठी चांगले असते. तसेच त्यामुळे वजन कमी होते. परंतु आयुर्वेद असे समजत नाही जेवणाआधी पाणी प्यायल्यामुळे जठरातील द्रव्य सौम्य होतात.
ही द्रव्य पचन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणूनच, आयुर्वेदाला असे वाटते की जेवणाच्या काही तासाआधी पाणी प्यायले पाहिजे.
आयुर्वेदानुसार साधारण जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हवे. कारण जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यामुळे पचन प्रक्रियेत बाधा निर्माण होते तसेच वजन वाढण्याची शक्यता आहे असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.
आयुर्वेदानुसार जेवणादरम्यान पाणी पिणे चुकीचे समजले जात नाही परंतु जेवताना अतिरिक्त पाणी पिण्याऐवजी थोडया प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे ज्यामुळे अन्नाचे मोठेमोठे तुकडे लहान व्हायला मदत होते ज्यामुळे त्यांचे पचन नीट होते.
जेवताना थंड पाणी पिऊ नये असे आयुर्वेदात सांगितले आहे. थंड पाणी शरीरातील आम्लांचे प्रमाण वाढवते आणि त्यामुळे पाचनप्रक्रियेत बाधा येऊ शकते असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. ज्यामुळे ॲसिडीटी होऊ शकते.
चहा, कॉफी तसेच हवाबंद पेय जेवणादरम्यान घेऊ नये असे आयुर्वेद सांगते. जेवताना खोलीच्या तापमानाशी समान असलेले पाणी प्यावे. पाणी खूप प्रमाणात पिता कामा नये ज्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते.
आता आपण न्यूट्रिशनिस्ट असे म्हणणे जाणून घेऊया!
न्यूट्रिशनिस्टच्या अनुसार पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेला घटक आहे. जेवल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे शरीराच्या पचनसंस्थेला इजा पोहोचते असे तुम्ही ऐकले असेल परंतु हे चुकीचे आहे.
जेवताना, जेवल्यानंतर आणि जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने पाचनप्रक्रियेत बाधा येत नाही त्यामुळे, जेवणाआधी किंवा जेवणा नंतर पाणी पिणे चुकीचे आहे असा समज करून घेऊ नका.
उलट जेवणाआधी आणि जेवणात दरम्यान पाणी प्यायल्यामुळे पचनप्रक्रियेत मदत होते.
–
- काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर खरंच घातक परिणाम होतात का?
- पाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच!
–
पाण्यामुळे अन्नाचे मोठे तुकडे मऊ आणि लहान होतात त्यामुळे त्यातील पोषकद्रव्ये शोषून घेणे शरीराला सोपे पडते तसेच पाण्यामुळे खाल्लेले अन्न मऊ होऊन अभिसरण नीट होते म्हणूनच, पाण्याच्या सेवनामुळे बद्धकोष्टता दूर होते.
पाण्यामध्ये कॅलरी नसते परंतु पाणी प्यायल्यामुळे भूक कमी होते. जे लोक अधिक पाणी पितात त्यांना कमी भूक लागते.
जेवताना जास्त प्रमाणात पाणी प्यावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. काहीजणांना अधिक पाणी प्यावेसे वाटते तर, काही कमी पाणी पितात पण, पाणी हे पचनक्रिया साठी चांगले आहे आणि जेवताना जर तुम्ही पाणी प्यायलात तर तुमच्या पाचन प्रक्रियेत काहीच बाधा येणार नाही. उलट याची मदतच होईल.
खूप जास्त जेवण जेवल्यानंतर संतुलित प्रमाणात पाणी प्यायले तर तुम्हाला काहीच बाधा होणार नाही. हायड्रेशन साठी पाणी उपयुक्त असते. तसेच पचन संस्थेतील अन्नाच्या मार्गात सुरळीतपणा येतो.
अपोलो हॉस्पिटल च्या चीफ न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहत्यागी म्हणतात,
“जेवणादरम्यान जेवणाआधी किंवा जेवणानंतर पाणी पिण्यात काही गैर नाही. परंतु तुम्ही खूप खाल्ले असेल आणि कमी पाणी पीत असाल तर यामुळे तुम्हाला जठराच्या समस्या होऊ शकतात किंवा तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणार नाही आणि त्यातील उपयुक्त पोषक द्रव्य शरीराला नीट शोषून घेता येणार नाही.”
पुढे त्या असेही म्हणतात की, जेवताना थंड पाणी पिणे टाळले पाहिजे कारण जेवताना थंड पाणी किंवा शितपेय प्यायल्यामुळे पचनप्रक्रिया संथ होते.
जेवण झाल्यानंतर तुम्ही किमान एक ग्लास तरी पाणी प्यायला हवे. या पाण्याचे तापमान खोलीच्या तापमानाशी समान असायला हवे.
त्या असेही म्हणतात की जर तुम्ही जेवताना खूप प्रमाणात पाणी प्यायलात तर तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल ज्यामुळे तुम्ही कमी जेवाल. म्हणूनच तुम्ही जेवताना अतिरिक्त प्रमाणात पाणी नाही प्यायले पाहिजे.
“पाणी प्यायल्यामुळे पचन प्रक्रिया नीट होते, जर तुम्ही खूप प्रमाणात जेवला असाल तर तुम्ही संतुलित प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही किमान एक ग्लास तरी पाणी प्यायला हवे” असे फोर्टिस हॉस्पिटलच्या सीनियर न्यूट्रिशन थेरपिस्ट डॉ. मीनल शाह म्हणतात.
थोडक्यात काय तर वरून आपल्या हे लक्षात येते की यापुढे जेवताना पाणी प्यावे की नाही प्यावे याचा विचार करायची गरज नाही फक्त ते प्रमाणात प्यायला हवे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
महत्वाच्या ऐतिहासिक व वर्तमान घडामोडींची माहिती : inmarathi.com
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.