सतेज कांती हवी असेल तर महागडे क्रीम सोडा, हा एकच घरगुती उपाय करून बघा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“मिळवा सायीसारखी कोमल त्वचा आमच्या बॉडी लोशनने” ही अशी जाहिरात आपण हमखास किती तरी वेळा ऐकली, वाचली आणि बघितली असेल. आपण याच जाहिरातींना भुलतो आणि विविध क्रीम्सच्या मागे लागून आपल्या अत्यंत नाजूक त्वचेला खराब कारुन घेतो.
आपल्या चेहऱ्याची त्वचा लहान बाळाच्या त्वचेप्रमाणे नाजूक आणि कोमल असते. तिच्यावर भरपूर केमिकल्सचा मारा केल्याने त्वचेच्या पेशींना हानी पोहोचते आणि विविध त्वचाविकार होतात, आपली त्वचा खराब होते.
आपल्या त्वचेची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आपण चेहऱ्याला काय लावतोय याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण हल्ली आपल्याला इतकं सगळं तपासत बसायला वेळ असतो कुठे? वेळेच्या अभावी आपण दिसेल ते वापरतो.
तुम्हालाही वेळ नसेल आणि इतर उपायांचा कंटाळा आला असेल, तर आमच्याकडे एक सोपा उपाय आहे. “दुधावरची साय!” होय! दुधाची साय चवीला जितकी गोड लागते, शरीरासाठी जितकी पोषक असते तितकीच, त्वचेसाठी महत्त्वाची असते.
पाहूया, ‘साय’ आपल्या सौंदर्याला कशा प्रकारे द्विगुणित करू शकते ते!
१) साय: एक उत्तम मॉइश्चरायझर –
साय ही एक अत्यंत उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. सायीच्या गुणधर्मामुळे, आपल्या चेहऱ्याच्या कोरड्या त्वचेला आवश्यक तेल मिळते. त्यामुळे कोरडेपणा नाहीसा होतो.
साय हिवाळ्यात चेहऱ्याला लावली, तर चेहऱ्यासाठी ते फार उपयोगी आहे. किती ही बोचरी थंडी असली तरी आपला चेहरा अगदी सायीसारखा मऊ राहतो.
नुसती साय लावली तरी तिचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे तुम्ही नुसतीच साय सुद्धा लावू शकता. तुमची त्वचा जास्तच कोरडी असेल, तर सायीत थोडे मध घालून हे मिश्रण त्वचेवर लावू शकता. याने सायीत असलेले माईश्चरायझिंग तत्व दुप्पट होते.
हे मिश्रण २०-२५ मिनिटे त्वचेवर राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. असे आठवड्यातून एकदा जरी केले, तरी एका महिन्यात तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक जाणवेल, कोरडेपणा कमी झालेला दिसून येईल.
२) त्वचा उजळण्यास मदत करणे –
साय ही एखाद्या उत्तम “अँटी टॅन” क्रीम प्रमाणे काम करते. आपण बाहेर जातो तेव्हा धूळ आणि उन्हामुळे आपली त्वचा काळी पडते, पण साय लावल्याने हे टॅन पूर्णपणे निघून आपली त्वचा पुन्हा उजळून निघते.
हे करण्यासाठी तुम्ही नुसती साय सुद्धा वापरू शकता किंवा सायीत बेसन घालून हे मिश्रण सुद्धा वापरू शकता. आठवड्यातून फक्त २ वेळा १० मिनिटे साय चेहऱ्यावर लावून ठेवा, तुमच्या त्वचेवरील टॅन निघून ती पुन्हा उजळेल.
३) त्वचेला तेज प्रदान करणे –
सायीमुळे मऊपणा- गोरेपणा येतोच शिवाय आपल्या त्वचेला तेज सुद्धा मिळते. निस्तेज त्वचा दिसायला फार बरी दिसत नाही. त्यासाठी काही लोक महागड्या लेझर ट्रीटमेंट्स घेतात, पण हे काहीही न करता, साय लावून घरच्या घरीच तुम्ही उत्तम दिसू शकता.
उत्तम गुण येण्यासाठी सायीत बेसन किंवा हळद टाका. हळद टाकत असाल, तर एक मोठा चमचा साय घेऊन त्यात केवळ पाव चमचा हळद घाला. हे मिश्रण त्वचेवर २० मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा केल्यास जास्त फायदेशीर ठरतो.
४) डाग घालवणे व त्वचा स्वच्छ करणे –
त्वचेवर कोणत्याही प्रकारचे डाग असतील, तर साय लावल्याने ते डागही कमी करता येतात. यासाठी सायीत अर्ध्या लिंबाचा रस घाला व हे मिश्रण त्वचेवर लावा. १० मिनिटे, हलक्या हाताने मालिश करा.
त्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा कापसाच्या बोळ्याने त्वचा पुसून घ्या आणि मग पाण्याने धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा डाग नाहीसे होईपर्यंत करा. यामुळे त्वचेवर साचलेली माती आणि तेल निघून जाईल.
५) सुरकुत्यांपासून बचाव करणे –
सायीत ‘अँटी-एजिंग’ तत्त्व आढळतात, त्यामुळे चेहऱ्याला साय लावली की आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. चेहरा टवटवीत राहतो.
आठवड्यातून दोन वेळा १०-१५ मिनिटे, साध्या सायीने चेहऱ्याचा मसाज करा आणि ५ मिनिटे साय वाळू द्या. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होईल. सायीत असलेलं अँटी- एजिंग तत्त्व त्वचेत खोलवर मुरून त्वचा अगदी फ्रेश वाटेल, सुरकुत्या येणार नाहीत.
६) मृतपेशी घालवणे –
साय एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. सायीने मालिश केल्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून त्वचा तजेलदार दिसते.
अजून चांगल्या परिणामांसाठी सायीत बेसन किंवा वाळवून बारीक करून घेतलेली संत्र्याची सालं घालून ह्या मिश्रणाने आपल्या मानेला, हातांना, गुडघ्यांना आणि कोपरांना १०-१५ मिनिटे मालिश करा. याने डेड स्किन निघून जाईल व त्वचा आणखीन मऊ होईल.
इतक्या फायद्याची असलेली साय नक्की वापरा आणि सायीसारखी मऊ आणि कोमल त्वचा मिळवा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.