' शनिवारची बोधकथा : भुकेसाठी झटणाऱ्या ह्या आजोबांना न्याय मिळेल का? – InMarathi

शनिवारची बोधकथा : भुकेसाठी झटणाऱ्या ह्या आजोबांना न्याय मिळेल का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गरीबी आणि भूक हे दोन माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत ही गोष्ट जगजाहीर आहे. आणि सध्या ह्या कोरोना काळात कित्येकांना या २ गोष्टीचे महत्व कळून चुकले आहे!

कित्येक लोकांची २ वेळची जेवायची सुद्धा भ्रांत होती, कित्येकांच्या हातून कामं काढून घेतली. ह्या महामारीने प्रत्येक माणसाला आहे त्यात समाधान मानायला शिकवलं खरं!

पण शेवटी पोटाची भूक भागवायला माणसाला हात पाय हलवावेच लागतात.

“असेल हरी तर देईल खटल्यावरी” असा विचार करून कोणाचेच पोट आजवर भरलेले नाही! आणू ही भूक भागवण्यासाठी मनुष्य काहीही करू शकतो हे सुद्धा तितकंच खरं आहे!

स्वतःची किंवा स्वतःच्या परिवाराची भूक भागवण्यासाठी माणूस चुकीचे मार्ग सुद्धा अवलंबू शकतो हे आपण अमिताभ बच्चन यांच्या दीवार सिनेमातल्या एका सीन मध्ये सुद्धा पाहिले आहे!

स्वतःच्या आई वडिलांसाठी अन्न चोरी करून पळणाऱ्या गरीब मुलाच्या पायावर जेंव्हा शशी कपूर (पोलिस ऑफिसर) गोळी झाडतो.

 

deewar scene inmarathi

 

आणि नंतर त्याला त्याची चूक समजल्यावर तेच अन्न जेंव्हा तो त्या मुलाच्या आई वडिलांना द्यायला जातो तिथे त्याला जाणीव होते गरीबी आणि भुकेची!

अशीच एक बोधकथा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत!

एक आटपाट नगर होते आणि त्या आटपाट नगराच्या कर्तव्यदक्ष राजाचे त्याच्या प्रदेशाकडे चांगलेच लक्ष होते. नगरात कोण अडचणीत आहे किंवा काय समस्या आहेत हे सगळं जाणून घेऊन तो राजा तिथल्या प्रजेसाठी जमेल तसं कार्य करत होता!

एकंदरच नगर हे तसं मोठं आणि प्रशस्त होतं पण गरीबीने त्या नगरात हैदोस घातला होता. आणि ह्या गरीबीमुळेच राज्यात चोरीच्या घटना वरचेवर ऐकू येत होत्या.

राजाच्या न्याय दरबारात रोज काही ना काहीतरी समस्या किंवा गुन्ह्याचा खटला येतच होता. या एवढ्या मोठ्या समस्येला आळा कसा घालायचा हा त्या राजापूढे सर्वात मोठा प्रश्न होता!

 

darbar inmarathi

 

अशातच एके दिवशी एका वृद्ध आजोबांना न्याय दरबारात आणले गेले. वय असेल साधारण ६० ते ६५ च्या मध्ये. त्यांच्यावर चोरीचा आरोप होता. एका वृद्ध माणसावर चोरीचा आरोप लागतो आहे हे समजताच राजाने या प्रकरणात जातीने लक्ष घालायचे ठरवले!

खटला चालू होताच असे कळले की ही वृद्ध व्यक्ति गरीब असून, त्यांच्याकडे पैसे नाहीत, वाढत्या वयामुळे काम करून कमावणे सुद्धा त्यांना जमत नाही. जी काही जमापुंजी होती ती त्या आजोबांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च केली.

अशा परिस्थितीत त्यांच्यावर एका खानावळीतून रोटी भाजी चोरी करताना पकडले गेले.

 

roti bhaaji inmarathi

 

हा सगळा प्रकार ऐकून राजाला काहीच सुचेना, आपल्या राज्यातली परिस्थिति सुधारण्यासाठी त्याने एक उत्तम निर्णय घ्यायचे ठरवले!

राजाने न्याय दरबारात उभ्या असलेल्या त्या वृद्ध आजोबांकडे पाहून सांगितले की –

“बाबा तुम्ही चोरी तर केली आहेत, त्यामुळे तुम्हाला दंड किंवा शिक्षा ठोठावणं हे माझं कर्तव्य आहे! पण तुमच्या वयाच्या मानाने तुम्हाला शिक्षा ठोठावणं हे नियमात बसणार नाही,आणि तुमच्यावर समजा दंड आकाराला तर तो तुम्ही भरू शकणार नाही. कारण दंड भरण्यासाठी पैसे असते तर तुम्ही चोरी केलीच नसती!”

एवढं म्हणत राजाने न्याय दरबारात एक कटाक्ष टाकला आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला उद्देशून तो म्हणाला –

“या आजोबांचा दंड आज मी इथे बसलेल्या प्रत्येकाकडून वसूल करणार आहे. कारण आपल्या या राज्यात एका गरीब माणसाला पोट भरण्यासाठी चोरी करावी लागते ही बाब आपल्या राज्यासाठी लज्जास्पद आहे!”

असे म्हणत राजाने तिथे बसलेल्या प्रजेकडून दंड वसूल केला आणि जमा झालेली रक्कम त्या वृद्ध माणसाच्या स्वाधीन करून राजाने मनोमन ठरवले की यापुढे माझ्या राज्यात कोणालाच भूक भागवण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करावा लागणार नाही!

 

darbar inmarathi 2

 

राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या हातात काहीतरी काम आणि त्यातून त्याला उत्पन्न निर्माण होईल यासाठी राजाने प्रयत्न चालू केले!

या संपूर्ण कथेच तात्पर्य काय तर माणसाकडे माणूस म्हणून पाहिलं तरच न्याय होतो.

त्यामुळे या कथेतल्या राजासारखे खऱ्या आयुष्यात आपल्या राज्यकर्त्यांनीसुद्धा प्रत्येकाकडे काहीतरी काम आणि त्यातून उत्पन्न मिळाव याची खबरदारी घ्यावी, तर कुणीच या चुकीच्या वाटेवर जाणार नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?