Site icon InMarathi

गुहेच्या मधलं मत्स्यालय देतंय “Baby Dragons” ना जन्म…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

स्लोवेनिया ह्या मध्य युरोपातल्या देशात एक आगळं वेगळं मत्स्यालय आहे. गुहेमधलं मत्स्यालय.

पिव्का नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या तब्बल २२ किलोमीटर लांब असलेल्या ह्या गुहेत हे मत्स्यालय उभं आहे. जगातलं एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून हे मत्स्यालय प्रसिद्ध आहे.

 

स्त्रोत

स्त्रोत

स्त्रोत

ह्या मत्स्यालयात dragon सारख्याच प्राण्यांचं अस्तित्व आहे.

Olm – हा तो प्राणी. हे प्राणी आग ओकत नाहीत पण ह्या उभयचर सरपटणाऱ्या प्राण्यांचे अनेक गुणधर्म dragon ह्या काल्पनिक प्राण्यासारखे आहेत. ते १०० वर्ष जगू शकतात – ज्यात सुमारे १० वर्ष अन्नाशिवाय तग धरू शकतात. त्यांना डोळे नसतात, वास आणि आवाज हेरण्याची त्यांची क्षमता अतिशय तीक्ष्ण असते. ह्याच क्षमतेवर ते शिकार करतात. शिवाय – हे प्राणी electric (विद्युत) आणि magnetic (चुंबकीय) क्षेत्र ओळखू शकतात.

स्त्रोत

ह्यांची मादी १५ वर्षांनंतर प्रजननक्षम होते. दर ६ वर्षांच्या अंतराने ती अंडी देऊ शकते. २० दिवसांच्या काळात मादी ३० ते ६० अंडी देते.

सध्या ह्या मत्स्यालयात एक मादी अंडी देण्यास तयार आहे.

स्त्रोत

२०१३ सालीसुद्धा ह्या मादीने अंडी दिली होती पण इतर olms नी ती अंडी खाऊन टाकली. त्यामुळे ह्या वेळी सर्व कर्मचारी प्रचंड खबरदारी घेत आहेत. मादीच्या tank मधून इतर सर्व olms काढून टाकले आहेत.

मत्स्यालयातील सर्वात मोठं आकर्षण असणाऱ्या ह्या Olm ची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने सार्वजन खूप उत्तेजित आहेत.

लवकरच त्यांच्याकडे Baby Dragons असणार आहेत !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version