Site icon InMarathi

कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर फलंदाजाला “बकरा” बनवण्याची किमया करणारे गोलंदाज!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट आणि जगभरातील फॅन्स हे समीकरण वेगळ आहे. जगभरात हजारो खेळ खेळले जातात परंतु काही खेळ मात्र खूपच प्रसिद्ध होतात त्यामागील मुख्य कारण म्हणजे खेळाडू आणि त्यांचे जगभरात पसरलेले फॅन्स.

२०-२० च्या काळात क्रिकेट हा फक्त फलंदाजांचा खेळ आहे की काय. असे वाटू लागले आहे! परंतु लक्षात घ्या क्रिकेटमध्ये गोलंदाजही चमत्कार करून दाखवू शकतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना प्रत्येक विकेट महत्त्वाची असते, विकेट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

 

 

त्यातच जर एखाद्या नवोदित खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली तर मात्र तो खेळाडू सर्वांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो.

या लेखात आपण अशाच काही गोलंदाजांना बद्दल जाणून घेणार आहोत.

 

१. भुवनेश्वर कुमार :

 

 

भुवनेश्वर कुमार ओळखला जातो त्याच्या अफलातून स्विंगसाठी. २०१२ ला आपल्या वन-डे क्रिकेट मध्ये पाऊल ठेवणाऱ्या भुवनेश्वर कुमारने चेन्नई येथील सामन्याच्या पहिल्याच बॉलवर एक अप्रतिम ईनस्विंग टाकत मोहम्मद हफिजची विकेट मिळवली.

त्रिफळाचीत झालेल्या मोहम्मद हाफिजला पहिल्याच बॉलवर इनिंग संपवून परतावे लागले.

तो सामना भारताने गमावला परंतु भुवनेश्वर कुमार चे नाव सर्वांच्या लक्षात राहिले. आज भुवनेश्वर कुमारने ११४ सामन्यांमध्ये १३२ विकेट घेतल्या आहेत.

 

२. इंजमाम उल हक :

 

 

आपल्या सर्वांनाच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक चांगलाच लक्षात असेल, त्याच्या बॅटिंग मुळेच तो सर्वांना लक्षात आहे.

परंतु मंडळी तुम्हाला हे माहिती नसेल की इंजमाम उल-हक यांनीदेखील आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेली आहे. १९९१ मध्ये फैसलाबाद येथे खेळत असताना इंजमाम याने चक्क ब्रायन लाराची विकेट मिळवण्यात यश प्राप्त केलं.

या सामन्यामध्ये बॉलिंग करत असताना इंजमाम यांनी तीन ओवर टाकत २४ रन दिले आणि १ विकेट मिळवली. पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाव कमावलेल्या दिग्गजांनी पैकी एक अशीच इंजमाम उल हक यांची ओळख आहे.

 

३. सर क्लाईव्ह लाॅयड :

 

 

लाॅयड यांचा उल्लेख जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असा केला जातो. १९७३ मध्ये ओवल वर खेळत असताना आवश्यकता म्हणून लाॅयड यांनी बॉल हातात घेतला.

यावेळी त्यांनी चक्क विरोधी टिमचे कर्णधार माईक डेनेन्स आणि माइक स्मिथ यांची विकेट मिळवली. लाॅयड यांच्या नावावर दोन वर्ल्डकप मिळवणारा कर्णधार असा विक्रम आहे.

त्यापुढे देखील त्यांनी अनेक मॅचेस मध्ये बाॅलिंग करत काही विकेट आपल्या खात्यात मिळवले आहेत.

 

४. केविन ओ’ ब्रायन :

 

 

आयर्लंड टीम क्रिकेटमध्ये जास्त प्रसिद्ध नसली तरीही त्यांच्या एका मेडियम पेसर बोलरने इंग्लंड विरुद्धच्या मॅच मध्ये आपल्या करिअरच्या पहिल्याच बाॅल वरती विकेट मिळवली होती.

केविन ने आपल्या मिडीयम पेस वरती चक्क इंग्लंडचा कर्णधार अँड्रु स्ट्रॉस याची विकेट मिळवली केविन तेव्हापासून प्रत्येकाच्या चांगल्याच लक्षात आहे.

त्याने खूप कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत तरीही त्या सामन्या मुळे तो सर्वांच्या लक्षात आहे.

 

५. कीमो पॉल :

 

 

वेस्टइंडीजची टीम त्यांच्या धारदार आणि वेगवान बॉलिंग साठीच ओळखली जाते. वेस्टइंडीज चे बॉलर बॉडी लाईन बॉलिंग आणि ती ही अत्यंत वेगवान यासाठी खरंतर कुप्रसिद्ध आहेत.

२०१८ मध्ये किमोने आपल्या ODI करिअरची सुरुवात केली आपल्या Debue मॅच मध्ये त्याने जावेद अहमदीला पहिल्याच बाॅल वर परत पाठवलं.

किमोने खूप कमी काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी योगदान दिलं, त्याने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये २३ विकेट घेतलेले आहेत.

 

६. अजित आगरकर :

 

 

अजित आगरकर हे नाव ९० च्या दशकातील सर्वांनाच माहिती असेल त्या दशकातील यशस्वी बाॅलर पैकी एक अशी अजितची ओळख आहे.

आपल्या t20 करियर च्या पहिल्याच चेंडूवर त्याने साऊथ आफ्रिकेच्या प्रसिद्ध एबी डिव्हिलियर्सची विकेट मिळवली होती हा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला.

 

७. विराट कोहली :

 

 

फलंदाज म्हणून विराट कोहली सर्वांना परिचित आहेच परंतु विराटने त्याच्या t20 करिअरमध्ये पहिल्यांदा बॉलिंग करत असताना इंग्लंड विरुद्ध पहिल्याच बॉलवर केविन पीटरसनची विकेट मिळवली.

कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याने दिलेल्या संधीचा विराटने पुरेपूर फायदा उठवला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version