आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुम्हीसुद्धा ठेवलेल्या गोष्टी विसरून जात असाल, बोलता बोलता तुम्हाला ‘नक्की काय बोलायचं होतं’ हे आठवत नसेल किंवा ऐन परीक्षेच्या वेळी उत्तर आठवत नसेल, तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. सुदैवाने अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण आपली स्मरणशक्ती वाढवू शकतो.
पुढील उपाय सातत्याने केलेत, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल!
लक्ष केंद्रित करा
कोणतीही गोष्ट लक्षात राहण्यासाठी आपण ती किती लक्षपूर्वक करतो, वाचतो वा ऐकतो हे महत्त्वाचे आहे. ती गोष्ट ऐकताना, वाचताना आपले पुरेपूर लक्ष असले, तर ती आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहते.
तुम्ही परीक्षेआधी वाचत असाल, तर त्यावेळी टीव्ही, गाणे किंवा तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बंद करा आणि मग अभ्यास करा. यामुळे तुमचे लक्ष भरकटणार नाही.
बुद्धिवर्धक कसरती करा
ज्याप्रमाणे व्यायाम केल्यामुळे स्नायू बळकट होतात, त्याचप्रमाणे मेंदूला चालना मिळण्यासाठी काही बुद्धिवर्धक कसरती करायला हव्यात. बुद्धीला चालना देण्यासाठी कोडी सोडवणे, मेमरी गेम्स खेळणे, बुद्धिबळ इ. गोष्टी करायला हव्यात.
एका अभ्यासातून असे समोर आले आहे, की सलग पाच आठवडे प्रत्येक दिवसाला फक्त पंधरा मिनिटांसाठी जे बुद्धीवर्धक कसरती करतात, त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते.
व्यायाम करा
व्यायामामुळे मेंदूचे आरोग्य सुद्धा सुदृढ राहते.
तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नसेल, तर ऑफिसला जाता येताना चालत जा. लिफ्ट ऐवजी पायऱ्या चढा. शरीर जर सुदृढ असेल, तर तुमची स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहील.
ध्यान-धारणा करा
ध्यान केल्याने तुमच्या मेंदूला एक शांतता मिळते आणि जागेपणी चालू असलेल्या सततच्या विचारांना थोडा स्वल्पविराम मिळतो.
ध्यान केल्याने तुमच्या मनाचा आणि मेंदूचा एक संवाद होत असतो आणि त्याद्वारे पुढील कामासाठी एक दिशा मिळत असते.
गोड पदार्थ कमी खा
गोड पदार्थ आपल्याला सतत खावेसे वाटत असले, तरी त्यांचा तोटाही आहे. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे स्मरणशक्तीत घट होते.
नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे खाणे हे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु ज्या फळांच्या रसामध्ये अतिरिक्त साखर टाकण्यात येते, ते शक्यतो खाऊ नये.
पुरेशी झोप घ्या
“शांत झोप” ही उत्तम आरोग्याची गरज आहे असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. शरीराने आणि मनाने फ्रेश राहायचं असेल, तर विश्रांतीची गरज ही लागतेच.
तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणंसुद्धा आवश्यक आहे. शांत झोपेमुळे मरगळ, आळस निघून जातो, पण झोप पुरेशी झाली नाही तर मात्र त्रास होतो.
अति कॅलरी असलेले पदार्थ टाळा
ज्याप्रमाणे अति साखर असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे, त्याचप्रमाणे काही पदार्थांमुळे कॅलरी वाढण्याची शक्यता आहे, ते सुद्धा टाळणे गरजेचे आहे. यामुळे मेंदूचे आरोग्य जपण्यास मदत होईल.
अभ्यासकांनी असे सांगितले आहे, की अति कॅलरीचे सेवन केल्यामुळे वजनवाढ तर होतेच, पण यामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर सुद्धा परिणाम होतो.
वरील गोष्टी आजपासूनच करा आणि स्मरणशक्ती वाढवा!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.