आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
महिला सुरक्षा हा भारतासमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. महिला सक्षमीकरण करण्यात आपण आधीपेक्षा बरेच बदल केले आहेत. पण, आजही जेव्हा भारतातील बऱ्याच राज्यात परिस्थिती बदललेली नाहीये असंच दुर्दैवाने म्हणावं लागतं.
सरकार कोणतंही असो, ते महिला सुरक्षेसाठी कमी पडतं हे आपण कित्येक वर्षांपासून बघतच आहोत.
महिलांना कोणत्याही प्रकारे त्रास देणाऱ्या व्यक्तींना कडक शिक्षा व्हावी आणि कोणीही पुन्हा असा विचार सुद्धा करू नये यासाठी आपल्या समाजात फार मोठे बदल होणं अत्यंत आवश्यक आहे.
महिला सुरक्षेसाठी महिलांनी एकत्र येणं आणि स्वसुरक्षा करायला शिकणं ही सुद्धा काळाची गरज आहे. प्रत्येक मुलीला शाळेपासूनच स्वतःच्या बचावासाठी आणि वेळ प्रसंगी वाईट हेतू असलेल्या व्यक्तीवर आक्रमण करण्यासाठी तयार करणं या गोष्टीला आता पर्याय नाहीये.
अजून एक बदल व्हायला पाहिजे तो म्हणजे भारतीय इतिहासातील शक्तिशाली महिलांचं आत्मचरित्र हे अभ्यासक्रमात शिकवलं जावं.
शक्तिशाली महिलांच्या शौर्यगाथा या आपल्याकडे वर्षातील नवरात्र सारख्या ठराविक काळातच जास्त करून लिहिले आणि वाचले जातात.
हे असं न होता वर्षभर या शौर्यगाथा टीव्हीवर, सिनेमातून दाखवल्या गेल्या पाहिजे जेणेकरून प्रेरणादायी वाटेल.
आज एका अश्याच शूरवीर महिलेबद्दल आम्ही या लेखात माहिती देत आहोत. त्यांची ही कथा अंगावर शहारे आणेल याची खात्री आहे.
पाटणच्या राणी रुदाबाई यांनी केलेला पराक्रम हा कदाचित आपल्याला माहीत नसेल. १४६० ते १४९८ या काळात पाटण राज्यापासून कर्नावत (सध्याचं अहमदाबाद) पर्यंत राणा वीर सिंह वाघेला यांचं राज्य होतं.
रुदाबाई या वीर सिंह वाघेला यांच्या पत्नी होत्या. सौन्दर्यवती आणि शूरवीर अशी त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती.
१४९७ मध्ये पाटण या राज्यावर सुल्तान बेघारा याने हल्ला केला होता. या हल्ल्यात राणा वीर सिंह यांचं पारडं जड होतं. सुल्तान बेघारा कडे असलेलं ४०००० लोकांचं सैन्य हे वीर सिंह यांच्या २८०० सैन्यासमोर दोन अडीच तास सुद्धा तग धरू शकलं नव्हतं.
राज्य छोटं असल्याने त्या काळात इतकं सैन्य सुद्धा पुरेसं असायचं. पहिल्या युद्धात तर राणा वीर सिंह हे विजयी झाले होते.
पण, दुसऱ्या युद्धात राणा वीर सिंह यांना त्यांच्या एका निकटवर्तीय व्यक्तीने धोका देऊन शत्रूसोबत संगनमत केलं होतं आणि राणा वीर सिंहला मारण्याची, त्यांच्या राज्याची संपत्ती लुटण्याची त्यांनी योजना आखली.
युद्ध जिंकणे हे एकवेळ सोपं असेल, पण लोकांना विश्वासात ठेवणं हे त्या काळात खूप कठीण काम होतं. सुल्तान बेघाराने हेरलं आणि राणा वीर सिंह यांच्या सावकार पदी बसलेल्या व्यक्तीला राजाच्या संपत्ती मधील एक हिस्सा देण्याचं कबूल केलं.
सुल्तान बेघारा जी नजर ही राणी रुदाबाई यांच्यावर होती. सावकार ने सुल्तान बेघारा यांना राज्यातील सर्व गुप्त माहिती सांगितली. या माहितीमुळे सुल्तान बेघारा हे राणा वीर सिंह यांना युद्धात हरवू शकणार होते.
१४९८ मध्ये जेव्हा सुल्तान बेघाराने तिसऱ्यांदा पाटण वर हल्ला केला तेव्हा त्याच्याकडे दोन युद्धातील पराभव आणि सावकार कडून मिळालेली माहिती अशी दुहेरी शक्ती होती.
त्याने दुप्पट सैन्यासह हल्ला केला. राणा वीर सिंह हे यावेळी सुद्धा सुल्तान बेघारा ला हरवत होते. पण, सावकारने धोका दिला आणि त्याने राणा वीर सिंह यांना युद्धभूमीवर पाठीमागून वार करून त्यांना मारलं.
सावकाराने केलेल्या धोक्याने त्याचा सुद्धा काहीच फायदा झाला नाही. “गद्दार पे कोई भरोसा नही करता, वो किसी के साथ भी गद्दारी कर सकता है” असं म्हणत सुल्तान बेघाराने सावकार ला सुद्धा मारून टाकलं आणि स्वतः १०००० सैनिक घेऊन राणी रुदाबाई यांच्या महालाच्या दिशेने तो निघाला.
राणी रुदाबाई यांनी महालाच्या सर्वात उंच ठिकाणी २५०० महिला धनुर्धारी सैन्यासह स्वतःला सुरक्षित ठेवलं होतं. हे सैन्य राणी रुदाबाई यांच्या एका इशाऱ्यावर त्यांच्याकडे येणाऱ्या शत्रूवर एक साथ हल्ला करण्यास सक्षम होतं.
सुल्तान बेघाराने दूता मार्फत राणी रुदाबाई यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.
राणी रुदाबाई या युद्ध कलेत निपुण होत्या. त्यांनी सुल्तान बेघारा च्या प्रस्तावाला मान्य केला आणि त्याला मोजक्याच सैन्यासकट राजमहालात येण्याचं आमंत्रण दिलं.
राजमहालात सुल्तान बेघारा आल्यावर राणी रुदाबाई या स्वतः त्याच्या स्वागतासाठी गेल्या.
सुल्तान बेघारा जसा राणी रुदाबाई यांच्या जवळ आला, तसा राणी ने त्याच्या छातीत खंजीर खुपसलं. त्याचवेळी राणी रुदाबाई ने सैन्याला इशारा केला आणि त्यांनी सुल्तान बेघारा च्या सोबत आलेल्या सैन्याचा खात्मा केला.
सुल्तान बेघारा चा एकही सैनिक राणी रुदाबाई यांच्या धनुर्धारी महिला सैन्यासमोर तग धरू शकला नाही.
सुल्तान बेघारा च्या शरीराला कर्नावत शहराच्या मध्यावर टांगलं आणि सुल्तान बेघारा चं शीर धडापासून वेगळं करून त्याला पाटण राज्याच्या मध्यभागी राणी रुदाबाईने सैन्या मार्फत लटकवायला लावलं.
भारतीय महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक चेतावणी होती. राणी रुदाबाई यांनी या घटने नंतर स्वतः जलसमाधी घेतली. कोणत्याही शत्रूकडून हल्ला होऊन मरण्यापेक्षा जलसमाधी घेणं त्यांना जास्त योग्य वाटलं.
ही कथा वाचल्यावर महिलांना स्व संरक्षणासाठी हत्यार वापरण्याची मुभा दिली जावी असं वाटल्यास त्यात काही गैर नाहीये.
२५०० महिला सैन्याने केलेल्या १०००० सैनिकांच्या पराभवाला बरेच इतिहासकार महत्व द्यायचं विसरले आहेत असं म्हंटल्यास चूक होणार नाही.
महिला या त्यांच्या सुरक्षेसाठी सक्षमच आहेत. गरज आहे ती त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कायद्यात काही बदल करण्याची.
असं केल्यास कोणतीही महिला इथून पुढे कधीच ‘अबला नारी’ म्हणून संबोधली जाणार नाही. राणी रुदाबाई यांच्या पराक्रमाला शतशः नमन.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.