' आरोग्यासोबत या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्ही सगळीकडे जिंकाल! – InMarathi

आरोग्यासोबत या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्ही सगळीकडे जिंकाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे आपण स्वतः कडे लक्ष द्यायलाच विसरतो. या धकाधकीत जेवणाचे पथ्य सुद्धा आपल्याला धड पाळता येत नाही. त्यात आपण शहरात राहत असू तर ते अजूनच कठीण होऊन जाते.

परंतु स्वतःची काळजी घेणे हे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक सेल्फ केअर रुटीन पाळले पाहिजे.

म्हणजेच दिवसभरात काही ठराविक गोष्टींचे पालन करायला हवे. ज्याचा फायदा तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी होणार आहे.

असे बरेच उपाय आहेत जे तुम्हीही तुमच्या सेल्फ केअर रुटीन मध्ये सामील केली पाहिजे. त्यासाठी प्रथम तुम्हाला त्यांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

 

self care inmarathi

 

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सुचवणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या सेल्फ केअर रुटीन मध्ये सामील करायला हवेत.

शारीरिक निगा :

फिजिकल म्हटल्यावर तुम्हाला कळलेच असेल की ही सेल्फ केअर तुमच्या शरीराशी निगडीत आहे. या सेल्फ केअर मध्ये आम्ही तुम्हाला असे काही साधे उपाय सुचवणार आहोत जे दैनंदिन आयुष्यात करणे अत्यंत आवश्यक आहे.

बहुदा यांपैकी बऱ्याच गोष्टी तुम्ही करत असाल पण त्या किती वेळा केल्या पाहिजेत याबाबतीत योग्य माहितीसुद्धा मी आज पुरवणार आहोत.

सगळ्यात प्रथम म्हणजे दात घासणे तुम्हाला दररोज किमान दोनदा दात घासणे गरजेचे आहे एक सकाळी म्हणजे उठल्यावर आणि एक रात्रीचे जेवण उरकल्यानंतर.

बर्‍याचदा तुम्ही ऐकले असेल ते हायड्रेट याचाच अर्थ शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असायला हवे. आता ते नक्कीच वाढणार जर तुम्ही पुरेसे पाणी पीत असाल. म्हणून तुम्ही दिवसाला किमान अडीच लिटर पाणी प्यायला हवे.

 

water-health-inmarathi05

 

दिवसभराच्या कामात तुम्हाला थकवा टाळायचा असेल तर तुम्हाला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही दररोज किमान आठ तास झोप मिळाली पाहिजे.

जर तुम्ही वर दिलेल्या बेसिक गोष्टींचे पालन करत असाल तर नक्कीच तुम्हाला सेल्फ केअर रूटीनमध्ये काही बोनस गोष्टी करायला हव्यात.

तुम्ही तुमच्या कपड्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, वा तुम्ही एखादी सुंदर हेअर स्टाईल सुद्धा ठेवू शकता. ऐकायला तुम्हाला या गोष्टी खूप वरवरच्या वाटत असतील परंतु या गोष्टी सेल्फ केअर रुटीन मध्ये सामील केल्यामुळे आपल्याला तजेलदार वाटते.

तसेच इतर लोकांशी बोलताना आपल्या वेशभूषेमुळे आपला आत्मविश्वास दुणावतो. परिणामी आपण सकारात्मक राहतो.

वैचारिक निगा :

याचा संबंध अर्थातच तुमच्या बुद्धीशी येतो. त्यामुळे ज्या सवयी आम्ही या रूटीनमध्ये सुचवणार आहोत त्या अर्थातच तुमची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी असतील. बुद्धिमता वाढवण्याचा फायदा काय?

तर तुम्हालाही माहित आहे की दिवसभरात विविध लोकांशी होणाऱ्या संभाषणातून त्यांना तुमच्या बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो. ज्याची बुद्धिमत्ता अधिक त्याच्याकडे लोक जास्त आकर्षित होतात हे आपण बघितलेच असेल.

त्यामुळे तुम्हाला पण लोकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हायचे असेल तर बुद्धिमत्तेत वाढ करणे गरजेचे आहे. जर तुम्ही शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असाल तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला नवीन मित्र-मैत्रिणी जोडण्यात होईल.

जर तुम्ही ही नोकरी करणारे असाल तर यामुळे तुमचे बॉस, क्लाएंट किंवा कलिग्ज तुमच्या बुद्धीमुळे इम्प्रेस होतील. पण बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर त्याचे एक सेल्फ रुटीन असणे आवश्यक आहे.

तुम्हाला हे आठवते की तुम्ही तुमच्या कामाव्यतिरिक्त वा तुमच्या पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त शेवटचे कोणते पुस्तक वाचले? कधी वाचले?

 

intellectual self care inmarathi

 

गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी काय वाचन केले? तुम्हाला कळलेच असेल की माझ्या बोलण्याचा कल कोणत्या दिशेला चालला आहे.

हो बरोबर! जर तुम्हालाही तुमची बुद्धिमत्तेत वाढ करायची असेल तर तुम्ही विविध पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. उदा. कादंबऱ्या, कथा ऑटोबायोग्रफिज, इतिहासा संबंधित पुस्तके व अर्थशास्त्र संबंधित पुस्तके इत्यादी.

जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचे वाचन करत असाल तर तुम्हाला रस असलेल्या विषयांसंदर्भात पुस्तके वाचली पाहिजे ज्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही.

पण बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पुस्तके वाचणे हा काही एकच पर्याय नाही तुम्ही छोटे छोटे लेख वाचू शकता, युट्युब वर अनेक माहितीरहित व्हिडिओ बघू शकता, अनेक डॉक्युमेंटरीज बघू शकता.

यामधूनही तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर पूरक माहिती मिळेल. विकिपीडिया आणि गुगल सर्फिंग करून बर्‍याच गोष्टींची माहिती आत्मसात करू शकता.

प्रोफेशनल निगा :

याचा संबंध तुमच्या कामाशी निगडित आहे. जर तुम्ही ऑफिस मध्ये बरेच तास काम करता. काम करत असताना भले तुम्हाला त्रास होत असेल तर या त्रासाकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचे काम सुरू ठेवता तर यामुळे तुम्हाला नक्कीच तुमचे दिवसभराचे काम पूर्ण दमून सोडत असेल.

म्हणूनच तुमचे एक प्रोफेशनल रुटीन असलेच पाहिजे. बऱ्याचदा कामाचा अधिक लोड असेल तर आपण जेवणासाठी मिळालेला ब्रेक कमी करतो पण असे करणे टाळायला हवे.

तुम्ही जेवणासाठी पुरेपूर वेळ घ्यायला हवा आणि घाईत जेवता कामा नये. जर तुम्ही ब्रेकमध्ये जेवण चुकवत असाल तर हे तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही असे करता कामा नये.

 

lunchbreak inmarathi

 

जर तुम्हाला सतत काम करून तणाव जाणवत असेल तर तुम्ही थोडा वेळ थांबले पाहिजे या थोड्या वेळात तुम्ही थोडे चालून येऊ शकता जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल.

जर तुमच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत असेल तर नाही म्हणायला शिका कदाचित यामुळे काही संध्या चुकतील पण स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अध्यात्मिक निगा :

अध्यात्मिकता आपल्या मनाच्या शांतीसाठी खूप उपयुक्त असते या अध्यात्मिकते मुळे आपल्या सकारात्मक उर्जेत वाढ होते दररोजची होणारी चिडचिड कमी होते आणि परिणामी कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचे कसब आपोआपच आत्मसात होते.

 

meditate

 

रोज सकाळी उठल्यावर मेडिटेशन करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.

 

सोशल इंटरॅक्शन :

आपण बऱ्याचदा आपल्या कामात इतके गुंतलेले असतो की कुणाशी बोलण्याऐवजी आपल्या कामाला अधिक महत्त्व देतो. पण इतरांशी बोलल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो.

या आंतरिक आनंदामुळे आपण सकारात्मक होतो. आपल्या आयुष्यातील चढ-उतार समस्या यांविषयी आपण आपल्या मित्रांशी बोला. त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला बरे तर वाटेलच पण कदाचित तुम्हाला उपायही सुचवू शकतात.

जर तुमचे मानसिक आरोग्य तुम्हाला स्वस्थ ठेवायचे असेल तर इतरांशी बोलणे अत्यावश्यक आहे.

 

स्वच्छता :

घर स्वच्छ असेल तर घरात समृद्धी नांदते असे आपण बर्‍याचदा मोठ्यांकडून ऐकत आलो आहोत. हे ऐकून आपण दुर्लक्षही केले असेल परंतु त्यांचे बोलणे बरोबर आहे. याचा संबंध आपल्या मानसिकतेशी जोडलेला आहे.

जेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि सुंदर असते त्यामुळे आपल्याला आपोआपच तजेलदार वाटते आणि आपण सकारात्मक होतो.

 

house cleaning featured inmarathi

 

या सकारात्मकतेमुळेच आपल्याला दिवसभरात काम करण्याची ऊर्जा मिळते म्हणूनच तुम्ही एन्व्हायरमेंटल सेल्फ केअर रुटीन पाळलेच पाहिजे. थोडक्यात काय तर तुमचे घर स्वच्छ असेल तर घरात समृद्धी नांदेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?