Site icon InMarathi

समस्या अनेक, उपाय एक- हे सिक्रेट ठेवेल तुम्हाला चिरतरुण आणि फिट!

aditi rao inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“डिटॉक्स”बद्दल सगळ्यांनीच ऐकलं असेल. सध्या वाढत्या जिम कल्चरमुळे फिटनेस हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय झालाय. सध्या शरीर, मन दोघांची काळजी घेणे आपण सुरु केले आहे.

अशातच, शरीरातील निरुपयोगी आणि साचलेले अॅसिड आणि इतर दूषित घटक शरीरातून पूर्णपणे बाहेर काढून आपल्या फिटनेसला अजून वरच्या पातळीवर नेण्यासाठी आपण प्रयत्न करतो.

डिटॉक्स करण्यासाठी लागणारी अत्यंत गुणकारी वस्तू आपल्याला माहितीची आहे आणि आपण दैनंदिन जीवनात तिचा बराच वापरही करतो, ती म्हणजे हळद!

 

 

वेगवेगळ्या पद्धतीने आपण हळदीचे सेवन करू शकतो जसे, पदार्थांत, दुधात मिसळून, पाण्यात घालून. गरम पाण्यात हळद टाकून ते पाणी पिण्याचे फायदे बघूया! 

 

१) अल्झायमरची शक्यता कमी होते –

नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन जीवघेण्या अल्झायमर या रोगाला आपल्यापासून दूर ठेवण्यास उपयुक्त असते.

हळदीचे घटक आपल्या शरीरात “बीटा अमिलॉईड” हे कंपाऊंड तयार होऊ देत नाही. या कंपाऊंडमुळे शरीरातील पेशींना इजा होते आणि त्या मृत्यू पावतात. यामुळेच आपल्याला अल्झायमरचा त्रास होतो.

२) हृदयविकारांपासून बचाव होतो –

 

 

हळद रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते आणि atherosclerosis पासून आपल्याला सुरक्षित ठेवते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांत गाठी तयार होत नाहीत आणि रक्ताभिसरण सुरळीत होते.

३) जखम भरून निघते –

आपण जखम झाल्यावर हळद लावतो कारण, त्यामुळे जंतूचा संसर्ग टाळला जातो, रक्तस्त्राव थांबतो आणि सूज उतरते.

सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात हळद घालून घेतल्यामुळे जास्त फायदा होतो आणि शरीरात कुठे जखम असेल, कोणत्या प्रकारची अशुद्धी असेल तर हळदीमुळे निघून जाते.

४) रोगप्रतिकारशक्ती वाढते –

 

 

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला यापासून बचाव करण्यासाठी दुधात हळद घालून घेणे हे आपण नेहमीच करतो, पण बाराही महिने ठणठणीत राहायचे असेल, तर सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने ते शक्य होऊ शकते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अत्यंत गुणकारी आहे.

५) पचन सुधारते – 

हळदीच्या पाण्याने पोटातली, आतड्यात साचलेली सगळी अनावश्यक घाण साफ होते, आतड्यांचा अनावश्यक भार कमी होतो आणि त्यांना पचन क्रिया घडवण्यासाठी ऊर्जा मिळते. यानेच पचनशक्ती वाढते.

६) त्वचाविकारांपासून मुक्ती मिळते –

 

 

एक म्हण आहे “पी हळद आणि हो गोरी”, जी अगदी सत्य आहे. नियमित हळदीचे पाणी घेतल्याने त्वचेवरील पुटकुळ्या, फोड, खाज -खरूज सगळेच नाहीसे होते आणि आपली त्वचा अधिक टवटवीत, तेजस्वी होते.

७) अतिरिक्त वजन कमी होते –

 

 

पचन सुधारलं, की शरीरातील मेटॅबॉलिझम वाढते. त्यामुळे हळदीच्या पाण्याने वजनही कमी होऊ शकते.

८) बद्धकोष्ठता नाहीशी होते –

आजकाल सगळ्यांची कामं बैठकीची असल्याने बऱ्याचदा पोट अकडल्यासारखं वाटतं किंवा गॅस होतात. हळदीच्या पाण्याने ही बद्धकोष्ठता नाहीशी होऊन, आपण आपले पूर्ण लक्ष कामांकडे देऊ शकतो.

९) यकृत सुदृढ राहते –

हळदीचे पाणी यकृतासाठी फारच गुणकारी आहे. ते शरीराच्या रक्तशुद्धीकरणाच्या अवयवांना सुदृढ बनवते, ज्यामुळे रक्त अधिक प्रमाणात शुद्ध होते आणि यकृतावरचा अत्याधिक ताण कमी होतो. यकृताची कार्यक्षमता बरीच वाढते आणि यकृत सुदृढ राहते.

हळद पाणी पिण्यापूर्वी घ्यावयाची काळजी –

 

 

१) हळद गरम असते, त्यामुळे मूळव्याध, स्टोन असतील तर त्यांनी हळदीचे पाणी घेणे टाळावे.

२) डायबीटीज असलेल्या लोकांनी डॉक्टरांना विचारून हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.

३) ज्यांना अॅनिमिया आहे, त्यांनी हळद पाणी रोज न घेता आठवड्यातून २-३ वेळाच घ्यावे. कारण हळदीमुळे रक्तात लोहाचे शोषण कमी होते.

४) ज्यांची कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल आणि फार काळ न उलटल्यामुळे जखम ताजी असेल तर, त्या व्यक्तींनी हळद पाणी घेऊ नये.

हळद पाणी कसे घ्यावे? 

गरम किंवा कोमट पाण्यात, एक लहान चमचा हळद मिसळून हे पाणी सकाळी पिणे फायदेशीर ठरते. आलं आणि हळदीचा चहा सुद्धा घेऊ शकता.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version