' हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास टाळण्यासाठी या ६ टिप्स फॉलो करा! – InMarathi

हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास टाळण्यासाठी या ६ टिप्स फॉलो करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या शरीरात किती तरी घटना या नैसर्गिकरित्या घडत असतात. शरीरात होणारा एक नैसर्गिक बदल म्हणजे एका जागेवर जास्त वेळ बसल्यावर पायाला येणाऱ्या ‘मुंग्या’. आपल्यापैकी प्रत्येकाने हे नक्की अनुभवलेलं असेल.

कधी प्रवासात पाय आखूड करून बसल्यावर असं होतं, तर कधी घरात सुद्धा मांडी घालून बसायची सवय नसेल आणि तसं बसावं लागलं तर पायाला मुंग्या येतात.

वैज्ञानिक भाषेत या स्थितीला “पॅरास्थेशिया” असं नाव आहे. ज्याला इंग्रजी भाषेत पिन्स अँड नेडल्स असं नाव देण्यात आलं आहे.

शरीराच्या कोणत्याही भागाला अनियमित रक्तपुरवठा झाला, की असे बदल दिसत असतात. पॅरास्थेशियाची संवेदना आपल्याला शरीराचा एखादा भाग तात्पुरता काम करत नसल्यावर सुद्धा होत असते.

कोणत्याही क्षणी एखाद्या नसेवर नेहमीपेक्षा जास्त वजन पडलं की हा त्रास होतो. कधी कधी हा तात्पुरता त्रास असू शकतो तर कधी कायमचा. हा त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, दोन्ही पाय एकमेकांवर जास्त काळासाठी ठेवणे किंवा रात्री झोपताना डोक्याखाली हात ठेवून झोपणे.

यासाठी काही घरगुती उपाय आहेत, पण जास्त त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा. 

 

१. जॉइन्ट्सची हालचाल करा:

 

pains and needles inmrathi

 

जर तुमच्या हाताला मुंग्या आल्या असतील, तर तुमचा हात हा मनगटापासून हलवा, गोल फिरवा. असं केल्याने रक्तपुरवठा सुरळीत होईल आणि तुम्हाला बरं वाटेल.

हाच त्रास जर पायाला होत असेल, तर त्याला घोट्यापासून गोल फिरवण्याचा प्रयत्न करा.

 

२. मानेची हालचाल करा:

कधी कधी हा त्रास आपल्या खांद्यांमध्ये सुद्धा होत असतो. त्यावेळी आपल्या मानेची हालचाल करा. खाली, वर, उजवीकडे-डावीकडे बघा. असं केल्यास तुमचा त्रास कमी होऊ शकतो.

 

पायाला मुंग्या येऊ नयेत यासाठी काय करावं?

 

१. घट्ट शुज न वापरणे :

 

shoes inmarathi

 

तुमचे शुज जर तुम्हाला घट्ट होत असतील आणि तरीही तुम्ही वापरत असाल तर ते त्वरित बदला. पायाच्या बोटांपर्यंत रक्तपुरवठा झाला नाही तर पायाला मुंग्या येतात. तुमचं चालणं जास्त असेल आणि उभं राहणं सुद्धा जास्त असेल तर ही काळजी आधी घेणं गरजेचं आहे.

काही जणांना शुजचे लेस खूप घट्ट बांधण्याची सवय असते. अशा लोकांना सुद्धा हा त्रास होऊ शकतो. तुम्ही जर ठराविक वेळेसाठी लॅपटॉपसमोर बसणार असाल, तर शुज काढून ठेवा जेणेकरून पायांना आराम मिळेल.

हे ही वाचा – हे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात! तुम्हाला कल्पना आहे का?

२. स्ट्रेचिंग करणे:

 

stretching inmarathi

 

ज्या व्यक्तींची दिनचर्या ही एका ठिकाणी बसून काम करण्याची आहे, त्यांनी रोज काही वेळासाठी स्ट्रेचिंग करणं आवश्यक आहे. ज्या पायाला किंवा हाताला हा त्रास होत असेल, त्याला थोड्या वेळासाठी स्ट्रेच करावं म्हणजे हा त्रास होण्याची शक्यता कमी होईल.

 

३. थोड्या वेळेसाठी उभं राहणे:

पायाला मुंग्या आल्या असतील किंवा इतर वेळी सुद्धा थोडावेळ एका ठिकाणी उभं राहण्याचा सराव करावा. असं केल्याने गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे रक्त हे डोक्यापासून पायापर्यंत सुरळीत वाहते.

काही क्षण उभे राहिल्यानंतर १५ ते २० सेकंद पाय गोलाकार फिरवल्याने सुद्धा हा त्रास कमी होऊ शकतो.

 

४. रोज चालणे:

 

indian girl walk inmarathi

 

आपल्याला माहीतच आहे, की सकाळी फिरायला जाणे हा किती तरी व्याधींवर रामबाण उपाय आहे. हे नियमित सुरू ठेवल्याने पायाच्या नसांची लवचिकता वाढते.

पायाला मुंग्या आल्यावर सुद्धा जर आपण काही पावलं चालण्याचा प्रयत्न केला, तर आपले पाय हे लवकरच पूर्ववत स्थितीत येतात.

 

५. मसाज घेणे:

 

body massage inmarathi

हे ही वाचा – जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!

पायाचा मसाज किंवा संपूर्ण शरीराचा मसाज करणाऱ्या फिजिओथेरपी स्पेशालिस्टकडून मसाज घ्या, शरीराचे स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. यासाठी तज्ञ व्यक्तीच हवी. मनाप्रमाणे मसाज करू नका.

 

६. योग करणे:

 

yoga inmarathi

 

भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला “योग” आपणही आत्मसात करणं गरजेचं आहे. सूर्यनमस्कार आणि इतर योगासने केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

नेमके कोणते आसन करावे, कसे करावे हे योग्य शिकून घ्या, मगच करा.

रोज व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे या दोन्ही गोष्टींना जर आपण महत्त्व दिलं, तर आपण मुंग्या आल्या की होणाऱ्या वेदना नक्कीच कमी करू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?