आजार होऊच नये म्हणून देण्यात येणारी लस कशी तयार केली जाते?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लहान मुल जन्माला आलं की त्याच्यावर पहिले लसीकरण होतं. मग तिसऱ्या महिन्यात,सहाव्या महिन्यात आणि मग नवव्या महिन्यात. हल्लीच केंद्र सरकारने शाळेतल्या मुलांवर देखील काही लसींचे कंपलशन केले होते.
साथीचे रोग आणि आवश्यक असलेल्या घटकांच्या अभावामुळे होणारे रोग टाळण्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून हे लसीकरण केले जात असते.
हे झाले रोजच्या जीवनात होणारे लसीकरण. आजच्या काळात संपूर्ण जगासमोर उभा राहिलेला यक्ष प्रश्न आहे तो म्हणजे कोरोनाची लस केव्हा येणार?
कोरोनाची जगाला ओळख होऊन आता वर्ष व्हायला आलं. पण ऑक्सफर्ड, सिरम, जॉन्सन सारख्या मोठमोठ्या संस्था हे कोरोनाच्या लस निर्मितीच्या सध्या ट्रायलवरच आहेत.
कोण पहिल्या टप्प्यात आहे, कोणी दुसऱ्या तर कोणी तिसऱ्या. शिवाय प्रत्येक देशातल्या संस्था तसेच शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करून या भयंकर महामारीवर लस शोधायचा आटोकाट प्रयत्न करतायत!
मध्यंतरी रशिया ने लस काढल्याचा दावा केला, त्यानंतर अमेरिकेने सुद्धा असंच काहीसं वक्तव्य केलं पण पुढे काहीच घडलं नाही. ती लस कुठेच उपलब्ध करून देता आलेली नाही, मुळात अशी लस निघाली आहे की नाही यावर सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह आहेच!
आणि ह्या सगळ्या सावल्या गोंधळात भरडला जातोय तो तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस. लस आज येईल, उद्या येईल या आशेवर आपण गेले वर्षभर आहोत!
तर आज बघूया ही लस नेमकी बनते कशी. वैद्यकीय इतिहासात सगळ्यात पहिली लस बनवली ती एडवर्ड जेन्नर यांनी. १७९६ मध्ये चिकनपॉक्स अर्थात देवीच्या रोगावर त्यांनी यशस्वीरित्या लसींची निर्मिती केली होती.
लुईस पाश्चर यांची पाश्चराईज प्रोसेस ही देखील एक प्रकारची लस निर्मितीची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये दुध खराब करणाऱ्या जिवाणूंची दुधामध्येच वाढ थांबवली जाते.
लस बनवताना मुख्य करून आजाराला कारणीभूत असलेल्या घटकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. मग त्या घटकाला प्रतिबंध करू शकेल अशा घटकांची निर्मिती केली जाते.
मुख्य म्हणजे हे प्रतिबंध घटक हे आजाराच्या विषाणूपासूनच तयार केले जाते. विषाणूला कमकुवत करणारे घटक हे शक्यतो त्यांच्याच पेशींमध्ये बघायला मिळतात.
त्यामुळे लार्ज स्केल वर विषाणूंची निर्मिती त्याचसाठी केली जाते. काही वेळेस हे प्रतिबंधक घटक तयार करण्यासाठी मृत विषाणूंचा वापर देखील केला जातो.
कारण हे मृत विषाणू आजार निर्माण करण्यास निष्क्रिय असतात पण अँटीबॉडीज तयार करण्यासाठी हेच उपयुक्त असतात.
लस बनवताना पहिली पायरी असते अँटीजनची निर्मिती. ज्यामुळे शरीरात रोगाच्या बॅक्टेरियाला तोंड देण्याची क्षमता निर्माण होते. यामध्ये मुख्य करून रिकॉम्बिनेन्ट प्रोटीनची निर्मिती केली जाते.
हे रिकॉम्बिनेन्ट प्रोटीन जिवाणूंच्या पेशी किंवा यीस्ट पासून बनवले जाते. अँटीजेनच्या निर्मिती वेळी एका स्पेसिफिक ग्रोथ मीडियम च्या माध्यमातून लसीच्या क्षमतेची वृद्धी केली जाते.
जिवाणूंचा विकास हा बायोरिऍक्टर्सच्या माध्यमातून केला जातो जे एकप्रकारे अन्नपदार्थ आंबवल्यासारखे आहे.
दुसऱ्या चरणामध्ये पेशींमध्ये अँटीजेन सोडले जाते आणि त्याच्या वाढीसाठी उपयुक्त पदार्थांपासून त्याला विलग केले जाते. या प्रोसेसमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं जिवाणूंना मुक्त केले जाते.
यावेळी वृद्धी माध्यमाच्या प्रोटीनचे काही भाग तसेच राहू शकतात. ज्याला पुढच्या चरणामध्ये काढून टाकले जाऊ शकते.
ऍक्टिव्ह लसी तिसऱ्या चरणात पूर्ण निष्क्रिय होऊन जातात. तिसऱ्या चरणात मुख्य करून अँटीजेन चे शोधन होते.
ज्या लसी रिकॉम्बिनेशन प्रोटीन पासून बनले जाते, शोधनच्या वेळी क्रोमॅटोग्राफी (पदार्थांना वेगळे करण्याची पद्धत) चा वापर केला जातो.
चौथ्या चरणात एका सहायक पदार्थाचे (अँडजुव्हेंट) संयोजन होते. हा सहाय्यक पदार्थ असा पदार्थ असतो जो गैरविशिष्ट स्वरूपात प्रतिकार करण्याचा प्रक्रियांची वाढ करतो.
या लसींमध्ये स्टॅबिलायझर्स सुद्धा असू शकतात. जे अँटीजेनच्या शेलची लाईफ वाढवते किंवा परिरक्षक पदार्थांची निर्मिती करतो, जे मल्टिपल डोस वायल्सचा सुरक्षित पद्धतीने वापर होण्यास मदत करते.
एकदा का वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि बॉडीवर त्याचे प्रयोग यशस्वी झाले की लसीचे उत्पादन घेण्यास सुरू होते. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक चरणांनंतर बॉडीवर त्याची टेस्ट होते. सुरवातीला प्राणी आणि मग मानव.
कोरोनाच्या लसीच्या निर्मितीमध्ये मुख्य अडथळा म्हणजे कोरोनाचा विषाणू हाच मुळात प्रोटीनपासून तयार झालेला आहे.
त्यामुळे अँटीजेन तयार करताना जिथे प्रोटीन वापरले जाते तिथे दुसरा पर्यायी पदार्थ वापरावा लागणार आहे. त्यामुळे लसीच्या निर्मितीच्या पहिल्याच टप्प्यात मोठा अडथळा आला.
त्यावर सुद्धा मात करून तज्ज्ञांनी आता लस निर्मितीच्या प्रक्रियेत प्रगती साधली आहे.
कोरोनाच्या लसीची निर्मिती आता तिसऱ्या टप्प्यात असल्याचे मागे बातम्यांमध्ये एकले होते. एकूणच आता ते कोणत्या पोझिशनला आहे हे आता आपल्याला कळेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.