आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘मिर्झापुर -२ बघितलं का?’ सध्या हा एकच प्रश्न सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तुम्ही कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर बघा, दर तीन चार पोस्ट नंतर कोणी ना कोणी तरी मिर्झापुर २ बद्दल बोलतोय.
आपले काही मित्र हे स्वतःच्या मनोगतात मिर्झापुर मधील पात्राचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगत आहेत.
बरेच लोक घरूनच काम करत असल्याने आणि एकूणच इंटरनेट भारतात स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्याने मिर्झापुरला आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेकिंग प्रतिसाद सध्या मिळत आहे.
ऑगस्टमध्ये मिर्झापुरचे निर्माते आणि ऍमेझॉन प्राईमने सुरू केलेलं मार्केटिंग हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं आहे.
एखाद्या सिनेमा, टीव्ही शोबद्दल लोकांमध्ये उत्सुकता कशी निर्माण करावी? आणि त्यांचा इंटरेस्ट कसा कायम ठेवावा याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे ‘मिर्झापुर – २’.
या यशाचं कौतुक करण्याचं अजून एक कारण हे आहे की मिर्झापुरचा पहिला सिझन हा २ दोन वर्षांपूर्वी आला होता.
दोन वर्षांनी आलेल्या या दुसऱ्या सिझन ला तितकीच लोकप्रियता मिळवून देणे हे मार्केटिंग टीम समोर नक्कीच मोठं आवाहन होतं.
कथा चांगल्या पद्धतीने मांडल्याने सुद्धा मिर्झापुर २ ला चांगला प्रतिसाद मिळत आहे यात शंकाच नाही. पण, प्रेक्षकांना (त्यांच्या हातातील कामं बाजूला ठेवून) ऍमेझॉन प्राईम पर्यंत खेचून आणण्याचं काम कसं शक्य झालं? त्यासाठी या कॅम्पेन बद्दल जाणून घेऊयात :
१. मिर्झापुर – १ ला फ्री उपलब्ध करून देणे :
ऍमेझॉन या मार्केटिंग एक्स्पर्ट ग्रुप ने एक शक्कल लढवली की, त्यांनी ऍमेझॉन प्राईम app वर प्रत्येकाला मिर्झापुर १ चे सगळे एपिसोड फ्री मध्ये उपलब्ध करून दिले.
प्राईम मेंबरशीप असो वा नसो, प्रत्येकाने मिर्झापुर १ सिरीज बघितली आणि त्याच्यातील पात्रांची सर्वांना माहिती झाली. २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२० या काळात मिर्झापुर १ चे फ्री एपिसोड्स उपब्ध करण्यात आले होते.
जाणकार प्रेक्षकांना तेव्हाच सिझन २ आता लवकरच येणार असल्याची कुणकुण लागली होती.
२. ट्रेलर ची पद्धत :
मिर्झापुर सिझन २ च्या रिलीजची तारीख सांगण्यासाठी तयार केलेले ट्रेलर हे खूप युनिक पद्धतीने आणि मिर्झापुरमधील पात्रांच्या भाषेद्वारेच लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
सोशल मीडिया च्या प्रत्येक प्लॅटफॉर्म वर फक्त ‘कालीन भैय्या का निमंत्रण’ हेच गाजत होतं. ६ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आलेला ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला.
३. पात्रांची पुनर्ओळख आणि त्यांचा रोल :
मिर्झापुर २ च्या पात्रांकडून संवाद असलेले छोटे विडिओ ट्रेलर्स विविध माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले.
या छोट्या क्लिप्स असल्याने आणि आपल्याकडे आलेले विडिओ, फोटो फॉरवर्ड करणारा एक मोठा वर्ग असल्याने प्रत्येकापर्यंत मिर्झापुर २ पोहोचला.
लोकांना पहिल्या सिझन मध्ये आवडलेले हे पात्र आणि दुसऱ्या सिझन मधील त्यांचा रोल या क्लिप्स मधून लोकांना लगेच समजला आणि तो बघण्याची अर्थातच उत्सुकता निर्माण झाली.
४. पात्रांचा पुढील प्रवास :
ऍमेझॉन प्राईम ने YouTube वर काही विडिओ अपलोड केले ज्याच्या मध्ये त्यांनी पहिल्या पात्रात काय केलं आणि पुढच्या पात्रात त्यांना काय करायची इच्छा आहे हे त्यांनी लोकांना सांगितलं. सोशल मीडियावर हे ट्रेलर लोकांना खूप आवडले.
५. काँटेस्ट लाँच करणे :
मिर्झापुर २ ला हिट करण्यासाठी अजून एक मदत झाली ती म्हणजे विवो आणि डबल बुल सिमेंट सारख्या काँटेस्ट मुळे त्या वस्तूंचे ग्राहक हे नकळतपणे मिर्झापुर २ ला मिळाले.
या काँटेस्ट मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला ऍमेझॉन व्हाउचर्स देण्यात आले.
६. लोक सहभाग :
#MS2W आणि @yehhaimirzapur या नावाने ट्विटर वर सुरू केलेलं हॅशटॅग हे नवनवीन पद्धतीने प्रमोट करण्यात आलं आणि ते मोठ्या प्रमाणात रिट्विट झालं.
२१ ऑगस्ट ला हे कॅम्पेन ऍमेझॉन कडून सुरुवात करण्यात आलं होतं. रिलीज ची तारीख जाहीर करण्यासाठी फेसबुक इव्हेंट पेज तयार करण्यात आलं आणि प्रत्येकाला आपल्या परीने मिर्झापुर २ बद्दल असलेली उत्सुकता जाहीर करण्याचं अवव्हान करण्यात आलं.
२४ ऑगस्ट दुपारी १२ वाजताची वेळ निश्चित करून लोकांना त्यावेळी ऍमेझॉन ने प्रत्येकाला YouTube चॅनल वर ही रिलीज डेट बघण्याची नवीन पद्धत आमलात आणली.
नुसत्या या विडिओ ला एकाच वेळी १ लाखांहून अधिक लोकांनी त्या वेळी बघितलं आणि आजपर्यंत तो विडिओ ५८ लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे.
मिर्झापुर २ चे सगळे एपिसोड उपलब्ध होण्याची तारीख त्यानंतर लगेच ट्विटर वरून जाहीर करण्यात आली.
एक्सेल मुव्हीज या कंपनीची निर्मिती असलेलं मिर्झापुर ही एक क्राईम थ्रिलर आहे हे आणि त्याला मिळालेलं अभूतपूर्व यश हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी खूपच उत्साह देणारं आहे.
‘मिर्झापुर When?’ आणि ‘कब आ रहा है मिर्झापुर?’ या सोप्या आणि कॅची लाईन्स वापरून लोकांमध्ये याबाबतीत उत्सुकता निर्माण करणाऱ्या मार्केटिंग टीमचं कौतुक आहे.
कोणतंही मार्केटिंग कॅम्पेन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक स्टेप ही महत्वाची असते.
ऍमेझॉन प्राईम ने मिर्झापुर २ ला बंपर ओपनिंग मिळण्यासाठी आणि त्यांचे subscribers वाढवण्यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, YouTube या सगळ्याच मार्गांचा वापर केला.
उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांनी प्रयत्न आणि कृती केल्यावर यश मिळणं हे जवळपास आधीच निश्चितच झालेलं असतं.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.