लवकरच आकाशात दिसणार आहे “ब्लू मून”, कधी- केव्हा? वाचा आणि ही संधी सोडू नका
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘चंद्र’ हा आपल्या सर्वांचा आवडता आहे. चंद्र हा नेहमी पृथ्वीच्या बाजूने असल्याने चंद्रात होणाऱ्या प्रत्येक बदलाची सगळ्यांना नेहमीच उत्सुकता असते. खगोलप्रेमी हे चंद्रग्रहण, चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांकडे नेहमीच नजरा लावून बसलेले असतात.
नुकतंच, नासाच्या काही संशोधकांनी, ‘चंद्रावर पाणी’ असल्याचा दावा केला आहे. या बातमीकडे या संबंधित प्रत्येक व्यक्ती ही या आशेने बघत आहे. चंद्रावर जीवसृष्टी कधी होती का? किंवा होऊ शकते का? असे अनेक प्रश्न याने पुन्हा समोर आले आहेत.
भारतीय अवकाश संस्था ISRO ने लाँच केलेल्या चंद्रयान-२ आणि विक्रम लँडरच्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनात ताज्या असतानाच, आता नोव्हेंबर २०२० मध्ये NASA ने नियोजित केलेल्या चंद्र मोहिमेकडे पूर्ण जगाचं सध्या लक्ष वेधलं गेलं आहे.
चंद्राबद्दल नेहमीच कुतूहल असलेल्या सगळ्यांसाठी एक विशेष बातमी आहे. ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ मिनिटांनी आपल्याला ‘फुल मून’ म्हणजेच पूर्ण चंद्र बघायला मिळणार आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा पूर्णाकृती दिसणाऱ्या या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ असं सुद्धा नाव आहे.
“Once in a Blue Moon” ही म्हण इंग्रजीत अनेकदा वापरली जाते, या म्हणीच्या अर्थावरूनच स्पष्ट होतं, की हा योग किती दुर्मिळ आहे.
ऑक्टोबर महिन्यात आपल्याला दोनदा पूर्ण चंद्र बघायला मिळेल. पहिली वेळ होती २ ऑक्टोबरच्या रात्री २.३५ मिनिटांनी आणि दुसरी असेल ३१ ऑक्टोबर ८.१९ या वेळेवर.
२०१८ मध्येही असं झालं होतं, जेव्हा ३१ जानेवारी आणि ३१ मार्च या दिवशी पूर्ण चंद्र आपण बघू शकलो होतो.”
एक लुनार महिना हा २९ दिवस १२ तास आणि ४४ मिनिट आणि ३८ सेकंद इतक्या कालावधीचा असतो. एका महिन्यात चंद्र दिसण्यासाठी पहिला पूर्ण चंद्र महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच दिसला पाहिजे. ज्या वर्षी एका महिन्यात दोन वेळेस पूर्ण चंद्र दिसेल, तेव्हा त्या वर्षात पूर्ण चंद्र हा एकूण १३ वेळेस दिसेल.
लुनार महिन्याच्या कालावधी प्रमाणे ‘ब्ल्यू मुन’ हा शक्यतो ३१ दिवस असणाऱ्या महिन्यात दिसतो असं सांगितलं जातं, पण २००७ मध्ये फक्त जून महिन्यात, ३० तारखेला दुसऱ्यांदा पूर्णाकृती चंद्र दिसला होता. ही घटना आता पुन्हा सप्टेंबर २०५० मध्ये घडणार आहे असं खगोल शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
१६ व्या शतकात पहिल्यांदा आणि त्यानंतर १९३० मध्ये प्रकाशित झालेल्या एका साहित्यात “Once in a blue moon” या वाक्प्रचाराचा वापर झाल्याची नोंद आहे.
चंद्राचे रंग हे दोन-तीन प्रकारचे असतात. चंद्र आकाशात येत असताना तो लाल रंगाचा असतो. काही वेळाने त्याचा लाल रंग कमी होतो आणि तो पांढऱ्या आणि करड्या रंगाचा दिसत असतो. पृथ्वीच्या आवरणावर असलेल्या नायट्रोजन, ऑक्सिजन आणि अर्गॉन यांच्या प्रमाणामुळे हा रंगांमधील बदल घडत असतो.
प्रकाश किरण जेव्हा चंद्राच्या कक्षेत जातात, तेव्हा प्रकाश वेगवेगळ्या दिशेने परावर्तित होतो आणि त्यामुळे चंद्राचा रंग उगवताना आणि मावळताना बदलल्याचं आपल्याला जाणवतं. हेच रंगांचे बदल आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला जाणवतात.
३१ ऑगस्ट २०२३ रोजी पुढचा ‘ब्ल्यू मुन’ दिसणार आहे अशी माहिती नासाने जाहीर केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
चंद्राच्या या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार आपण सगळेच होऊया आणि ३१ ऑक्टोबरला पूर्ण चंद्र आपण सगळे बघूयात. त्यासाठी कोणत्याही चष्म्याची वगैरे गरज नाहीये. आपण सगळेच आपल्या गच्चीवर जमा होऊन या क्षणांचा आणि चंद्राच्या शीतल छायेचा आनंद घेऊयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.