Site icon InMarathi

कॉम्प्यूटरच्या Local Disk चं नाव A, B ने सुरु न होता ‘C’ पासूनच सुरू होण्यामागेही आहे कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधीकधी आपल्या मनात काही प्रश्न निर्माण होतात, मात्र समोरील व्यक्ती हसणार नाही ना या शंकेमुळे आपण ते प्रश्न विचारतचं नाही, मात्र यामुळेच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतचं नाहीत.

अज्ञानी राहण्यापेक्षा मोकळेपणाने आपल्या मनातील प्रश्न विचारून त्यांच उत्तर मिळविणं कधीही चांगलं.  कॉम्पुटर वापर करताना त्याच्या तंत्रज्ञानाबाबत आपल्याला अनेक शंका निर्माण होतात.

त्यातलाचं महत्वाचा प्रश्न म्हणजे कॉम्प्यूटरच्या Local Disk चं नाव A, B ने सुरु न होता C पासूनच का सुरु होतं?

आजवर अनेकांना हा प्रश्न पडला असेल, काहींनी ही शंका हसण्यावारीही नेली असेल. आता देखील हा प्रश्न वाचून बरेच जण म्हणत असतील, “हा काय प्रश्न आहे का?”

तर हो.. खरंच हा एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे आणि त्यामागचं उत्तर देखील जाणून घेण्यासारखं आहे आणि अजूनही बऱ्याच लोकांना त्या मागचं उत्तर माहित नाही.

तुम्हालाही माहित नसेल तर आज जाणून घ्या.

 

 

जेव्हा कॉम्प्यूटर पहिल्यांदा जगासमोर सादर केला तेव्हा त्यात अगदी काहीच KB (kilobytes) ची स्पेस होती.

ज्यामध्ये फारच कमी डेटा स्टोअर करता यायचा आणि कधी कधी महत्वाचा डेटा स्टोअर करायची गरज भासली की लोकांची पंचायत व्हायची. यावर उपाय म्हणून तेव्हा लोक स्टोरेज वाढवण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा वापर करायचे.

वर्ष २००० उलटल्यानंतर या फ्लॉपी डिस्कचा वापर पूर्णत: बंद झाला आहे. कोणाकडे अगदी हौस म्हणून फ्लॉपी डिस्क पाहायला मिळेल.

 

आताची तुमच्याकडे जी एक्सटर्नल हार्ड ड्राइव आहे ते फ्लॉपी डिस्कचे सुधारित रूप म्हणता येईल.  जेव्हा हार्ड डिस्कअस्तित्वात आली, तेव्हा तिचे स्वरूप आजच्या हार्ड डिस्क पेक्षा फार वेगळे होते.

मुख्य म्हणजे हार्ड डिस्कची किंमत खूपच जास्त होती. त्यामुळे सामान्य सुशिक्षित माणसाला ज्याला कॉम्प्यूटर वापरता यायचा, त्याला काही ती परवडण्यासारखी नव्हती.

त्यामुळे फ्लॉपी डिस्क त्याकाळी बरीच प्रसिद्ध झाली होती, अर्थातच तिची किंमत कमी होती.

याच काही कारणांमुळे त्या काळी कॉम्प्यूटर मध्ये हार्ड ड्राईव ऐवजी दोन फ्लॉपी ड्राईव आढळायचे. या दोन ड्राईव्हसना अनुक्रमे  A ड्राइव आणि B ड्राइव असे नाव दिले गेलं होतं.

तेव्हाचे मदरबोर्ड्स दोन पेक्षा जास्त फ्लॉपी ड्राइव्हसना सपोर्ट करत नव्हते.

काही जणांकडे फ्लॉपी डिस्क सोबत हार्ड डिस्क देखील असायची. या हार्ड डिस्कच्या पहिल्या ड्राईवला C ड्राईव म्हटले जायचे आणि हेच नाव पुढे प्रचलित झाले.

 

 

म्हणूनच आता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जी हार्ड डिस्क आहे त्याचं जे पहिलं ड्राईव आहे ते C पासून सुरु होतं.

जर तुम्हाला कुठे फ्लॉपी डिस्क असणारा कॉम्प्यूटर आढळून आला तर त्याच्या पहिल्या दोन ड्राईवची नावं ही A आणि B असल्याचे तुम्हाला दिसेल.

कॉम्पुटर वापरताना तुम्ही अनेकदा ही ड्राईव्ह वापरली असेल, मात्र त्याचा खरा अर्थ आतापर्यंत कळला नसेल.

आहे की नाही या विचित्र प्रश्नामागे अर्थपूर्ण कारण!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version