' छोट्याशा गावातील ७० वर्षांची ‘आपली आजी’ युट्युबवर अशी ठरली सुपरहीट! युट्युबनेही केला गौरव! – InMarathi

छोट्याशा गावातील ७० वर्षांची ‘आपली आजी’ युट्युबवर अशी ठरली सुपरहीट! युट्युबनेही केला गौरव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना आणि लॉकडाऊन मुळे लोकांना सोसावा लागलेला त्रास आपण सगळ्यांनीच बघितला आहे. अत्यावश्यक सेवा फक्त चालू असल्याने कित्येक लोकांचा व्यवसाय या काळात बंद पडल्याच्या बऱ्याच बातम्या आपण मधल्या काही काळात वाचल्या.

साधारणपणे मार्च मध्ये सुरू झालेला हा कठीण काळ आता ‘मास्क’ आहे म्हणून पूर्ववत येतोय असं म्हणता येईल. आर्थिक, शारिरीक आणि मानसिक नुकसान केलेल्या या काळाने एक फायदा मात्र करून दिला आहे.

तो म्हणजे, आता लोक अधिक ‘डिजिटल’ झाले आहेत. भेटीची गरज आता लोक विडिओ कॉल, झूम मिटिंग्ज घेऊन आपली कामं करायला शिकली आहेत.

 

Online Classes fallout InMarathi

 

कित्येक लोकांनी आपलं YouTube चॅनल सुरू करून त्यावर स्वतःच्या टॅलेंट ला explore केलं.

भारत एक असा एकमेव देश आहे जिथे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर युवा उपलब्ध आहेत आणि इतकी मोठी लोकसंख्या सुद्धा आहे. त्यामुळेच, आपल्या भारतात हरित क्रांती नंतर ‘डिजिटल क्रांती’ इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

“विडिओ, सेल्फी या फक्त तरुणांच्या गोष्टी आहेत” हा समज या मधल्या काळाने खोडून काढला आहे.

आता लहान मुलापासून अगदी सत्तरी मधील लोक सुद्धा स्मार्टफोन, विडिओ, views, Subscribers, Like, Comment, Share हे शब्द कोणाच्याही तोंडी ऐकायला आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

‘आपण बदललो आहोत’ हे सुमन धामणे या नगर जिल्ह्यात राहणाऱ्या ७० वर्षीय आजी ने सहा महिन्यात ६ लाख YouTube चॅनल subscribers मिळवून सिद्ध केलं आहे.

आपली आजी हे त्यांच्या YouTube चॅनल चं नाव आहे. १२० पदार्थांचे विडिओ त्यांनी आजपर्यंत त्यांच्या चॅनल वर अपलोड केले आहेत. ही चकित होण्यासारखीच कामगिरी आहे.

 

suman dhamne inmarathi

 

सरोळा कासार हे अहमदनगर जिल्हयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेलं छोटंसं गाव आहे तिथे या आजी राहतात. त्यांचा नातू यश पाठक हा सध्या नववी मध्ये शिकतो.

जानेवारी महिन्यात एकदा त्याने त्याच्या आजी ला ‘पाव भाजी’ करायला सांगितलं. ते करतांना त्याने YouTube रेसिपी चा विडिओ लावला होता. पाव भाजी तयार झाल्यानंतर आजी म्हणाल्या की, “मी हा व्हिडिओ न बघता याच्यापेक्षा चांगली पाव भाजी करू शकते.”

आजींनी प्रयत्न केला आणि त्या डिशची चव विडिओ बघून केलेल्या पावभाजी पेक्षा खूप वेगळी आणि छान होती.

यश पाठकला हे सुचलं की, आपणच आजीच्या रेसिपी चा विडिओ रेकॉर्ड करुन त्यांना YouTube वर अपलोड करू शकतो. त्याने ते आमलात आणलं.

आजी आणि नातू यांच्या चॅनल ची सुद्धा सुरुवात इतर चॅनल प्रमाणे अडखळत आणि conscious बोलण्यानेच झाली होती. कारण सहाजिकच त्या दोघांपैकी कोणीही याआधी कॅमेरा फेस केला नव्हता.

त्याच आपली आजी चॅनलला आज एका दिवसात लाखो views आणि जवळपास दर दिवशी ४००० subscribers मिळत आहेत.

आजी बाईंनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, ” मला आधी हे काहीच माहिती नव्हतं; पण आता सवयीचं झालं आहे. आता एखाद्या रेसिपी चा विडिओ अपलोड केला नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं.”

सुमन धामणे आजींना काही दिवसांपूर्वीच YouTube कडून दिला जाणारा Creator’s Award मिळाला ज्यामुळे त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे.

फूड रेसिपी सोबतच आता आजींनी त्यांच्या घरी तयार करणाऱ्या मसाल्याची सुद्धा विक्री सुरू केली आहे ज्याला की लोकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

मार्च महिन्यात या जोडीने पहिला विडिओ जो अपलोड केला होता तो कारल्याच्या भाजी चा होता. पहिल्याच विडिओ ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने दोघेही आनंदी झाले आणि त्यांनी पुढचा विडिओ ‘शेंगदाण्याच्या चटणी’ चा अपलोड केला.

 

suman aaji inmarathi

 

हिरव्या भाज्या, मराठी गोड पदार्थ, वांग्याचं भरीत असा त्यांचा प्रवास अखंड सुरूच आहे आणि त्यासाठी त्यांना YouTube वर मिळणाऱ्या जाहिरातींमुळे एक उत्पन्नाचं साधन सुद्धा तयार झालं आहे.

‘बाकरवडी’ ची रेसिपी काही दिवसांपूर्वी आजींनी अपलोड केली आणि त्या विडिओ ला दोन आठवड्यात २० लाख लोकांनी बघितलं. आजी आता सेलेब्रिटी झाल्या आहेत.

त्यांचं कौतुक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून सध्या होत आहे.

मराठी पदार्थ तयार करताना सुद्धा सामग्री चा उल्लेख करताना बेकिंग पावडर, sauce वापरावे लागणारे इंग्रजी शब्द यश पाठक ने आजीला शिकवले आणि त्यांच्या योग्य उच्चारांची त्याने आजी कडून प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली.

त्यासोबतच, कित्येक वेळेस नेटवर्क चा सुद्धा खूप प्रॉब्लेम यायचा पण तरीही त्यांनी केवळ स्मार्टफोन च्या मदतीने हा प्रवास यशस्वी करून दाखवला.

अन्नपदार्थांच्या विडिओची लांबी किती असावी हे यश ने अभ्यासाने शिकुन घेतलं आणि तितक्याच मिनिटात तो पदार्थ तयार होवो यासाठी तो सतर्क राहू लागला.

दहावीचा अभ्यास करत त्याने हे काम सुद्धा सुरू ठेवलं.

चांगल्या कामात काहीतरी अडचणी येतात तसं ‘आपली आजी’ हे चॅनल हे १७ ऑक्टोबर ला कोणी तरी ‘हॅक’ केलं होतं. आजी त्या दिवशी खूप नाराज झाल्या होत्या आणि एक दिवस त्या जेवल्या सुद्धा नव्हत्या.

कारण, इतक्या दिवसात तयार केलेले विडिओ अचानक गायब झाले होते. चार दिवस चॅनल बंद राहिल्याने दोघेही त्रासले झाले होते.

YouTube टेक्निकल टीम कडून त्यांना मदत झाली आणि सगळे विडिओ परत दिसायला लागले आणि दोघांच्याही जीवात जीव आला.

सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने पदार्थ तयार केले असल्याने हे लोकांच्या लगेच पसंतीस पडलं. विडिओ बघताना लोक आजींशी बोलण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली.

मसाल्यांच्या मागणी कडे बघून त्यांनी ‘आपली आजी मसाले’ या नावाने तिखट, काळा मसाला असे पॅकेट्स लाँच केले आणि लोकांनी ते विकत सुद्धा घेतले.

 

aapli aaji masale inmarathi

 

सुमन धामणे आजीचं या व्यतिरिक्त ३० एकर शेत सुद्धा आहे. तिथे दिवसभर काम करून मग त्या हे विडिओ तयार करत असतात. लोकांची एखादी विशिष्ट पदार्थाची मागणी असेल तर त्या पदार्थाचा विडिओ आधी अपलोड करत असतात.

दिवाळी च्या निमित्ताने कित्येक पदार्थांचे नवीन विडिओ आपल्याला ‘आपली आजी’ या YouTube चॅनल वर बघायला मिळतील.

आजींच्या चॅनल ला लोकप्रियता मिळण्याची कारणं बरीच असतील. पण, त्यांनी या वयात घेतलेल्या अथक परिश्रमाला प्रत्येकजण ‘सलाम’ करेल यात शंकाच नाहीये.

एकच लक्षात ठेवावं की, YouTube चॅनल सुरू करायचं असेल तर आपल्या सर्वात आवडत्या activity साठी ते सुरू करावं आणि सातत्याने ते सुरू ठेवावं. ‘केवळ पैसे कमावण्यासाठी’ सुरू केलेले कित्येक चॅनल अल्पावधीतच बंद सुद्धा पडत असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?