' सावधान: हे पदार्थ सतत खाल्ल्याने तुम्ही तिशीतच चाळीशीतल्या दिसू शकता… – InMarathi

सावधान: हे पदार्थ सतत खाल्ल्याने तुम्ही तिशीतच चाळीशीतल्या दिसू शकता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाच्या दिसण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, परंतु आजकाल अकाली प्रौढत्व किंवा वृद्धत्व दिसत आहे. याचं कारण म्हणजे म्हणजे वातावरणात झालेला बदल, प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, वेळी-अवेळी खाणं, चटकदार-मसालेदार पदार्थ खाणं.

या पदार्थांमुळे आपली तब्येत खालवते, कारण शरीराला हवंअसलेलं पोषण या पदार्थांमध्ये नसतं. तसंच आपल्याकडे उन्हाळाही खूप असतो. सतत उन्हामध्ये फिरल्याने देखील आपल्या शरीरावरील त्वचेला हानी पोहचते आणि सुरकुत्या लवकर पडतात.

म्हणूनच तरुण किंवा आपल्या आहे त्या वयाला साजेसं दिसायचं असेल, तर नक्कीच काही गोष्टी आपल्याला करता येतील. उत्तम आहारासोबत योग, व्यायाम, व्यवस्थित झोप यांचा आरोग्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या गोष्टी टाळा : 

तळलेले पदार्थ –

 

potato chips inmarathi 1

 

कोरोनाचा प्रमाण कमी अधिक प्रमाण आहेच, सध्याच्या लाइफस्टाइलमुळे अनेकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. तळलेले, चटकदार, खुसखुशीत पदार्थ सगळ्यांनाच हवे असतात.

यात पहिला नंबर लागतो तो बटाटा वेफर्सचा. लहानांपासून थोरांपर्यंत हा पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतो. त्याचा खुसखुशीतपणा आणि चटकदार चव यामुळे सध्या होत असलेल्या कुठल्याही पार्टीमधला हा अनिवार्य पदार्थ झालेला आहे.

फ्रेंच फ्राईज, चिप्स हे पदार्थ जेव्हा डीप फ्राय केले जातात, त्यावेळेस त्यातले स्टार्च आपल्या कामाचे नसतात, त्यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होते. कोलेस्ट्रॉल वाढते.

त्यामुळे, शक्यतो हे पदार्थ टाळून त्याऐवजी पौष्टिक सलाड तुम्ही खाऊ शकता.

 

“रेडी टू इट” पदार्थ – 

 

cooking inmarathi

हे ही वाचा – सावधान, चुकूनही ‘हे’ ९ पदार्थ कधीही एकत्र खाऊ नका, नाहीतर…

आज काल वेळ वाचवण्यासाठी पदार्थ बनवून फ्रीजमध्ये ठेवलेले असतात किंवा बाजारातही “रेडी टू इट” पदार्थ मिळतात. हे पदार्थ आणायचे आणि मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खायचे. कष्ट आणि वेळ वाचतो म्हणून बरेच लोक हा पर्याय निवडतात.

फ्रोजन फूडमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते, जे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी करते आणि त्याचाच परिणाम त्वचेवर होतो.

म्हणूनच, हे असे शॉर्टकट न घेता, ताजे अन्न खाण्यावर भर दिला पाहिजे. शक्यतो घरी बनवलेले अन्न खाल्ले पाहिजे.

 

एनर्जी ड्रिंक –

 

soda cold drinks inmarathi

 

बऱ्याच जणांना बाजारात मिळणारे रेडीमेड एनर्जी ड्रिंक प्यायची सवय असते. हे फळांच्या फ्लेवर मध्ये मिळतात म्हणून लोक हे ड्रिंक्स पितात.

बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो, की आम्ही पौष्टिक ड्रिंक्स पितोय, परंतु त्यामध्ये अतिप्रमाणात साखर आणि सोडियम असतं. त्याचा परिणाम होऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होतो.

डिहायड्रेशनमुळे सुरकुत्या लवकर पडतात, तसेच आपले दात ही त्यामुळे खराब होऊ शकतात.म्हणूनच, सोडा असलेले ड्रिंक घेणे चांगले नाही.

एनर्जी ड्रिंक घेण्याऐवजी पाणी पिणे केव्हाही खूपच चांगले. तुम्ही ताज्या फळांचा रस, शहाळ्याचे पाणी पिऊ शकता. याने त्वचा सतेज राहते.

 

बेकरी प्रॉडक्ट्स

 

cake baking inmarathi5

 

लहान मुलांपासून सगळ्यांनाच बेकरीचे पदार्थ खूप आवडतात. त्यामध्ये केक, कप केक, पेस्ट्रीज, ब्रेड, बिस्कीट, डोनट्स इत्यादींचा समावेश असतो, परंतु या पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर आणि चरबी असते. यामुळेच वजन वाढण्याची शक्यता आणि त्याबरोबरच वाढत्या वजनाचे आजारही जडू शकतात.

अति साखर ही शरीरासाठी चांगली नाही. अति गोड पदार्थ खाणाऱ्यांची त्वचा नितळ राहत नाही. साखरेमुळे शरीरातील कॉलेजीन आणि इल्यास्टीन नष्ट पावतात, जे त्वचा मऊ आणि तजेलदार ठेवतात.

गोड पदार्थ खाण्याची आवडच असेल, तर साखरेऐवजी गुळ घालून केलेले गोड पदार्थ जरूर खावेत त्याचा फायदा होऊ शकतो.

 

पिझ्झा आणि बर्गर

 

pizza inmarathi

 

पिझ्झा आणि बर्गर हे मुळातच पावापासून बनवलेले असतात. म्हणजेच त्यात मैद्याचा वापर होतो. तसेच बर्गर आणि पिझ्झा यामध्ये वापरण्यात येणारे मांस हे प्रोसेस्ड, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं मांस असतं. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.

या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने पचनसंस्थेचे आजार, अल्झायमर, पार्किन्सन्स होण्याचा धोका आहे जास्त असतो. म्हणूनच हे पदार्थ जास्त खाऊ नयेत.

 

मद्यपान

 

rumours-about-alcohol-marathipizza03

 

 

बऱ्याच जणांना मद्यपानाची सवय असते. क्वचित कधीतरी एखादा ग्लास वाईन घेतली, तर त्याचा त्रास होत नाही. परंतु दररोज अतीप्रमाणात अल्कोहोल शरीरात जात असेल तर ते नक्कीच चांगले नाही.

अतिमद्यपान केल्याने ए विटामिनची कमतरता निर्माण होते. ते आपल्या शरीरात महत्त्वाचे एंटीऑक्सीडेंट तयार करत असते.

 

कॅंडी किंवा चॉकलेट्स

 

chocolate-history-inmarathi05

 

हे पदार्थ  खूप साखर वापरून बनवलेले असतात, म्हणून त्यांचं अतिरिक्त सेवन टाळलेलं बरं. यामुळे दातांचे आरोग्यही बिघडते आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य नष्ट होते.

भाजलेले मांस ( barbeque items)

भाजलेले मांस जर तुम्हाला आवडत असेल, तर त्यावर लवकर आळा घाला. असे मांस खाल्ल्याने शरीरात जळजळ होऊ शकते.

याचबरोबर रेडिमेड सूप, “रेडी टू इट” फूड, रेस्टॉरंटमधील तळलेले पदार्थ हे दिसायला छान असतात, मात्र त्यांच्यात कोणतेही पोषणमूल्यं नसतं. सोडियम, मीठ, साखर यांचं प्रमाण या पदार्थांमध्ये अधिक असते. ते टाळायलाच हवेत.

 

 

barbeque inmarathi

 

तळलेल्या गोष्टींमुळे शरीरातील चरबी वाढते, पाण्याची पातळी खालावते, सुरकुत्या लवकर पडतात आणि वय वाढल्यासारखे दिसते. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने असे पदार्थ खाऊ नयेत.

सध्या लोक घरबसल्या जेवण ऑर्डर करत असतात त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्यात भारतीय लोक आज पुढे आहेत. मात्र असे पदार्थ टाळलेत, तर तुम्ही चाळीशीतही विशीतले दिसू शकता.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?