बनावट कोल्हापुरी चपला ओळखा; नेहमी होणारी फसवणूक टाळा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोल्हापूर…पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख गांव. रांगडी भाषा, कुस्तीची परंपरा, ऊसाची शेती, मस्त चवीचा गूळ, तर्रीवाली मिसळ, तांबडा रस्सा पांढरा रस्सा, दूधकट्टा, रंकाळा तलाव, कोल्हापुरी साज, लावणी, लवंगी मिरची…हे माहित नाही असं बहुतेक कुणी नसावं.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ, दक्षिण काशी अशी अनेक वैशिष्ट्ये बिरुदं अभिमानाने मिरवणारं कोल्हापूर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे कोल्हापुरी चप्पल!!! अतिशय जुनी आणि पिढीजात ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापूरची शान आहे.
पूर्वी ही चप्पल घालून चालणारा माणूस दहा जणात ओळखू येत असे.. कारण कमावलेल्या कातड्यापासून बनवलेली चप्पल घालून चालताना कर्रऽऽ कर्रऽऽ आवाज यायचा. मग तो रुबाबच वाटायचा.
कोल्हापुरी चप्पल घालणं ही पण शानच होती. प्रवासी म्हणून आलेले लोक कोल्हापूरची आठवण म्हणून कोल्हापुरी चप्पल खरेदी करत. आजही करतात.
जर कधी कोल्हापूरला भेट दिली, तर महाद्वार रोडवर विविध प्रकारचे स्टाॅल दिसतील. यातच उठून दिसतात ते कोल्हापुरी चप्पलचे स्टाॅल, दुकानं. लाल, चाॅकलेटी, काळा, गुलाबी असे वेगवेगळे रंग या चपलांमध्ये असतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पिढ्यान् पिढ्या हा व्यवसाय करणारे लोक इथं आहेत. अगदी आपल्या पणजोबांपासून ही चप्पल तयार करायची परंपरा कायम राखलेले पिढीजात चप्पल व्यावसायिक इथं आहेत.
या चप्पलबाबत असं सांगितलं जातं, ही चप्पल घालणाऱ्या माणसाच्या पायातील घाम, उष्णता शोषून थंडावा देते. विविध रंगात ही चप्पल उपलब्ध आहे. आजही ही चप्पल कारागिर हाताने तयार करतात. मशिनवर काही केलं जात नाही.
तुम्हाला माहिती आहे का? हे चप्पल घालून चालताना कर्रऽऽकर्रऽऽ आवाज का येतो? कारण या चप्पल तयार करताना त्यामध्ये विंचू नावाच्या वनस्पतींच्या बिया वापरतात. त्याच्या याच वैशिष्ट्यांमुळे आज कोल्हापुरी चप्पल साता समुद्रापार पोचली आहे.
परदेशातही कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे. अमेरिका, जपान, जर्मनी या देशांत सर्वाधिक मागणी कोल्हापुरी चपलांना आहे. पारंपरिक लूक असलेल्या कोल्हापुरी चप्पल लोक आवडीने वापरतात. मागणी वाढली, की पुरवठाही वाढवावा लागतो.
नवी पिढी, नवे कारागिर आजही पारंपरिक पद्धतीने हातानेच चप्पल बनवण्यात अग्रेसर आहेत. चामड्यापासून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवली जाणारी कोल्हापुरी चप्पल आजही तितकीच लोकप्रिय आहे.
बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलांना असणारी मागणी कदाचित जास्तच आहे, पण कमी नाही. मागणी वाढली, उत्पादन, स्पर्धा वाढली की अनिष्ट प्रवृत्ती पण चोरवाटेने शिरतात. मग हे क्षेत्र कसं अपवाद असेल त्याला?
साधे चामडे वापरुन कोल्हापुरी चप्पलसारखंच डिझाईन बनवून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत बनावट कोल्हापुरी चप्पल पण बनवली जाते. पण पारखी नजर आणि थोड्याशा माहितीवर तुम्हीपण यातला फरक ओळखू शकाल.
–
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास नक्की वाचा!
- कोल्हापूरचा मान, महाराष्ट्राची शान असणाऱ्या फेट्याचा इतिहास आणि काही रंजक माहिती
–
१. चप्पलच्या चामड्याचा दर्जा-
खूपदा जास्त नफा मिळवण्याच्या प्रयत्नात चप्पल बनवताना कमी खर्चात कोल्हापुरी चप्पल दिसावी यासाठी बनावट वस्तू वापरल्या जातात.
मुख्यतः त्यासाठी वापरले जाणारे चामडे. हे चामडे हे अतिशय हलक्या दर्जाचे वापरले जाते. त्या साध्या आणि सुमार दर्जाच्या चामड्यामुळे निर्मितीचा खर्च खूप कमी होतो. कारण मोठ्या प्रमाणात खरेदी केली, की ते अजून स्वस्त पडतं, पण त्यामुळे शरिरातील उष्णता शोषून घेतली जात नाही.
त्यामुळे चामडे कसे आहे हे पहावे. कारण एवढे पैसे मोजून तुम्ही रबरी चप्पल तर घेणार नाही. मग असली कोल्हापुरी चप्पल थोडीशी पारखून घ्या.
२. चप्पलची शिवण-
बहुतेक सर्व कोल्हापुरी चप्पल हातानेच बनवलेल्या असतात. त्याची वीण, त्यांची शिवण हे मशीनवर केलेलं नसतं. ते पाहून ओळखता येतं, की ही चप्पल असली आहे की नकली.
एकमेकांना चिकटवलेले किंवा जर चप्पल मशीन शिलाई केल्यासारखी दिसत असेल तर थांबा.. ती बनावट असू शकते.
३. विक्रेत्याची माहिती-
ज्या विक्रेत्यांकडून तुम्ही चप्पल खरेदी करता तो खरोखरच त्या धंद्यातला जुना माणूस आहे का हे पडताळून पहा. त्याला त्यासंबंधी काही प्रश्न विचारा. जसं, चप्पलबद्दल माहिती, ती हाताने बनवतात का? किती वर्षे हे काम करतात वगैरे वगैरे…
ही माहिती त्याला न थांबता, न अडखळता देता आली तर तो नक्कीच तुम्हाला फसवणारा दुकानदार नाही.
कोल्हापुरी चपलांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशी घ्या काळजी :
१. या चपलांना आर्द्रतेपासून, पाण्यापासून दूर ठेवावे लागते. मुंबईसारख्या ठिकाणी जर या चपलांची तुम्ही योग्य काळजी घेतली नाहीत, तर त्यावर बुरशी येऊन चप्पल कडक होते, असे होऊ नये यासाठी जेव्हा चप्पल वापरात नसेल, तेव्हा व्यवस्थित स्वच्छ करून ती वर्तमानपत्रात गुंडाळून नीट ठेऊन द्या.
२. या चपलांना तेल लावणे महत्त्वाचे आहे. तेलामुळे पाण्यापासून चपलेचे रक्षण होते. म्हणूनच, थोडेसे खोबरेल तेल कापसाच्या बोळ्यावर घेऊन, त्याने चप्पल नीट पुसा.
कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी चप्पल आहे. आपण त्याची खरेदी करुन आपल्याच पारंपरिक कारागिरांना अप्रत्यक्षपणे मदत करतो. कोणतीही मदत ही सत्पात्री असावी. म्हणून खरेदी करत असतानाच आपण जर योग्य माणसांकडून केली, तर ना फसण्याची भीती, ना बनावट वस्तू घेतल्याचं दुःख.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.