Site icon InMarathi

आजचा महान क्रिकेटपटू जन्मावेळी बदलला गेला होता. एका खुणेमुळे असा आला परत!

sunny featured inmarathi

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अल्लू अर्जुनचा यावर्षी संक्रांतीच्या मुहूर्तावर आलेला ब्लॉकबस्टर सिनेमा ‘आला वैकुंठपुरामुलो’ तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर ‘बट्टाबोमा’ हे गाणं तरी नक्कीच माहीत असेल.

डेव्हिड वॉर्नर बऱ्याचदा या गाण्यावर टिक टॉक वर थिरकताना दिसला आहे. तर, या सिनेमात दोन मित्रांची स्टोरी दाखवली आहे.

त्यातल्या एकाची श्रीमंत घरातल्या मुलीशी सेटिंग लागते आणि तिच्याशी लग्न होऊन पुढे तो तिच्या कंपनीचा मालक होतो. तर दुसरा मित्र त्याच कंपनीत साधा कर्मचारी म्हणून काम करत असतो.

पुढे दोघा मित्रांच्या पत्नी एकाच दिवशी एकाच हॉस्पिटलमध्ये प्रसूत होतात. आणि श्रीमंत मित्राचा मुलगा जन्माला येता क्षणीच मृत होतो.

 

 

तर गरीब मित्र त्याचा मुलगा मेलेल्या मुलाच्या जागी ठेवून त्याचा मुलगा आपल्या पत्नी जवळ आणतो आणि अचानक तो मेलेला मुलगा रडायला लागतो. इनशॉर्ट त्याचा परत जन्म होतो.

तर श्रीमंताचा मुलगा गरीबाच्या घरात आणि गरीबाचा मुलगा श्रीमंताच्या घरात असं एकूण कथानक आहे.

आता ही झाली फिल्मची स्टोरी. खऱ्या आयुष्यात अस काही घडायचे चान्सेस आहेत का? होय आहेत! १९४९ मध्ये मुंबईत जन्माला आलेल ‘ते’ बाळ अनायसे एका कोळ्याच्या मुला सोबत बदललं गेलं.

लागलीच ही चूक त्या बाळाच्या काकाला उमगली नसती तर भारत आज एका मोठ्या क्रिकेटपटूला मुकला असता. ते बाळ क्रिकेट खेळायच्या ऐवजी पश्चिम किनाऱ्यावर समुद्रात मासेमारी करताना दिसलं असतं.

ते बाळ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भारतीय क्रिकेट इतिहासातलं एक विक्रमी पान ‘सुनील गावस्कर’ होय.

 

 

भारतासाठी कसोटी मध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके असे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेला खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर.

विना हेल्मेट वेस्ट इंडिज ची तोफखाना गोलंदाजी सक्षमपणे खेळून एक ‘फियरलेस’ खेळाडू म्हणून आपली छाप पाडली होती.

तर हे जगप्रसिद्ध ‘सनी’ अशा काही विक्षिप्त घटनेत सहभागी होते, हे त्यांनी स्वतः कबुल केले आहे.

आता जे सुनील गावस्कर आपण पहात आहोत हे ते सुनील गावस्कर नसते जर त्यांच्या कानाखाली त्यांची जन्मखूण नसती. याच जन्मखुणाने त्यांना त्या मोठ्या प्रसंगातून वाचवले होते.

गावस्कर स्वतः या घटनेला उजाळा देतात. गावस्करांचा जन्म हा मुंबईतला. नवजात सुनील हे तिथल्या कोळ्याच्या लहान बाळाशी बदललं गेले.

गावस्करांच्या कानाजवळ असलेली जन्मखूण त्यांच्या काकांनी पाहिली होती. जेव्हा ते कोळ्याच बदललेलं बाळ त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना कळून चुकलं की हे आपलं बाळ नाही आहे.

तडक त्यांनी आजूबाजूचा परिसर पालथा घातला आणि आपला बदललेला पुतण्या त्या कोळ्याकडून परत आणला.

विचार करा, जर ते बदललेलं बाळ कोणी नोटिसच केलं नसत तर काय झालं असत? ते बदललेलं कोळ्याचं बाळ १०,००० कसोटी धावांचा टप्पा पार करू शकलं असता का? भारताच्या क्रिकेट इतिहासातील ‘लिजंड’ बनू शकला असता का?

 

 

एक क्रिकेटप्रेमी म्हणून याबद्दल विचार करणे तसे अवघडच आहे. ‘द सुनील गावस्कर ओम्नीबस’ या आपल्या आत्मचरित्रात ते या घटनेचा आवर्जून उल्लेख करतात.

त्यातच पुढे ते स्वतः लिहितात,जर काकांनी त्यांना ओळखलं नसत तर ते आज पश्चिमी किनारपट्टीवर अरबी समुद्रात कुठे तरी मासेमारी करत असले असते.

गावस्कर पुढे लिहितात, येऊ घातलेलं भविष्य मला माझी नवीन ओळख टिकवून ठेवण्यास मदत करत गेली आणि या प्रक्रियेमध्येच मी माझ्या आयुष्याचा आढावा घेतला.

मला बर्‍याचदा प्रश्न पडला की जर निसर्गाने मला ‘चिन्हांकित’ केले नसते आणि माझ्या डाव्या कानाच्या पाळी वर लहान छिद्र देऊन मला ‘विशेष’ बनवले नसते तर काय झाले असते?

आणि जर काकांच्या हे लक्षात आले नसते तर कदाचित, मी पश्चिम किनारपट्टीवर कुठेतरी कष्ट करून एक साधा मासेमार बनलो असतो.

आणि त्या बाळाचे काय, जो चुकून माझ्या जागी आला होता? मला माहित नाही की त्याला क्रिकेटमध्ये रस आहे की नाही किंवा तो हे पुस्तक कधी वाचेल का?

मला फक्त अशीच आशा आहे की, जर तो हे पुस्तक वाचत असेल तर तो सुनील गावस्कर मध्ये थोडाफार इंटरेस्ट घेईल.

सुनील गावस्कर बद्दल त्यांची ही माहीत नसलेली गोष्ट आपण जाणून घेतली आहे, तर त्यांच्या बद्दल माहिती नसलेले काही रोचक तथ्य बघूया.

१. तेव्हाच्या तगड्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध गावस्करांनी १३ शतके ठोकली आहेत. जो आजच्या तारखेला सुद्धा रेकॉर्ड आहे.

 

 

२. गावस्करांना बॅडमिंटन खेळायची खूप आवड होती.त्याप्रकारे ते टेनिस सुद्धा खेळत.

३. गावस्कर हे उजव्या हाताने बॅटिंग करणारे खेळाडू आहेत. पण एकदा प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये लहान संघासोबत खेळताना त्यांनी डाव्या हाताने बॅटिंग केली होती आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले होते.

४. गावस्करांना लहानपणापासून कुस्तीवीर व्हायचे होते. प्रसिद्ध पहिलवान मारुती वडार यांचे ते खूप मोठे चाहते होते.

५. गावस्कर यांनी सावली प्रेमाची या चित्रपटात काम सुद्धा केलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version