Site icon InMarathi

कुंकू किंवा टिकली हा गावठीपणा नसून, त्यातून महिलांना होणारे लाभ ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सध्या फेसबुकवर आणि तसंही इतर सोशल मीडियावर #NoBindiNoBusiness हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय, काही हिंदुत्ववादी लोकांनी मुद्दाम हा ट्रेंड चालवला आहे असं काही माध्यमांचं म्हणणं आहे तर बऱ्याच तथाकथित लिबरल लोकांनीसुद्धा यावरून चांगलीच नाराजी दाखवली आहे.

याच मुद्द्यावरून टिकलीचे फायदे आणि हिंदू संस्कृतीतलं महत्त्व सांगणारा हा लेख

===

भारतीय स्त्रीची ओळख म्हणजे साडी, त्यानुसार घातलेले काही अलंकार, बांगड्या, मंगळसूत्र आणि कपाळावरचा कुंकवाचा ठिपका. हा ठीपका दोन भुवयांच्या मध्ये किंवा थोडासा वर दिलेला असतो. आता कुंकवाच्या ऐवजी टिकली वापरली जाते. ती कपाळावर चिकटून बसते.

हिंदू परंपरेनुसार कुंकू किंवा टिकली हे सौभाग्याचे चिन्ह समजले जातात. म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या स्त्रीची ओळख ही कुंकवामुळे व्हायची. विधवा स्त्रियांना कुंकू लावण्याचा अधिकार नसायचा.

आधी हे कुंकू हळदी पासून तयार केले जायचे. हळद आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण वाळवून ते कुंकू म्हणून वापरलं जायचं.

पूर्वीच्या काळी स्त्रियांकडे एक लाकडी डब्बा आसायचा. त्यामध्ये मेणाची एक छोटी डबी, कुंकवाची डबी आणि काजळ असायचे. याच गोष्टी वापरून स्त्रिया शृंगार करायच्या.

हे कुंकू कुठे लावायचे याचीही जागा त्या मुलीच्या लहानपणीच ठरवली जायची. म्हणजे लहानपणीच दोन्ही भुवयांच्या मध्ये गोंदण केलं जायचं. त्या गोंदणाच्या गोल ठिपक्या वर कुंकू लावलं जायचं.

 

 

स्त्रिया आधी आपल्या कपाळाच्या मध्ये, गोंदणावर मेण लावायच्या आणि त्यावर कुंकू दाबून बसवायच्या. याचं कारण म्हणजे कुंकू कपाळावर इतरत्र पसरू नये.

वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू होती, परंतु नंतर काळ बदलत गेला. आधुनिकीकरण आपल्या देशातही आलं. तसा तसा लोकांच्या पेहरावातही बदल होत गेला. स्त्रियांच्याही शृंगाराची साधनं बदलली. त्यातही वैविध्य आलं आणि मग कुंकवाच्या जागी आली टिकली. टिकली अजून तरी टिकली आहे.

तरीही आता कुंकू किंवा टिकली लावलीच पाहिजे असं नाहीये. स्त्रियांनी बदल म्हणून, फॅशन म्हणून कुंकू किंवा टिकली लावणे सोडून दिले आहे, तरीही अजूनही मोठ्या प्रमाणात भारतात त्याचप्रमाणे श्रीलंका, नेपाळ भूतान, मॉरिशस या देशांमध्ये स्त्रिया कुंकू किंवा टिकली वापरतात.

आज-काल पाश्चात्त्य देशात देखील फॅशन म्हणून टिकली लावली जाते. आता कुंकू फारसे वापरले जात नाही. कारण आता ते घरगुती आणि शुद्ध मिळेल याची खात्री नसते, त्यातही भेसळ आली आहे. त्यामुळेच आता टिकली सोयीस्कर वाटते.

या अशा पोकळ परंपरा आपण का पुढे चालू ठेवतोय, असाही प्रश्न विचारला जातो. शिवाय कुंकू किंवा टिकली नाही लावली तर काय फरक पडतो? असं विचारलं जातं.

कुंकू किंवा टिकली लावण्यामागे असलेलं विज्ञान किंवा शरीर शास्त्रात असलेला फायदा लक्षात घेतला तर यावरुन वाद होणार नाहीत. कुंकू किंवा टीकली लावण्यामागचे विज्ञान समजून घेऊयात.

‘योग’साधनेमधील महत्त्व : 

 

 

ज्या ठिकाणी कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये कुंकू किंवा टिकली लावली जाते त्याच्या पाठीमागे असते आज्ञाचक्र. योगगुरु पतंजलींनी योगशास्त्रात जी षटचक्र सांगितली आहेत त्यातलं हे सहावं आणि खूप महत्वाचं चक्र. मेंदूतल्या त्याच ठिकाणावरून संपूर्ण शरीराला आज्ञा दिल्या जातात.

ध्यान करताना आज्ञाचक्रावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं. म्हणजे कपाळावर नाही तर कपाळाच्या मागच्या बाजूला. तसेच भ्रामरी प्राणायाम करतानाही हेच चक्र कार्यान्वित केलं जातं.

भगवान शंकराचा तिसरा डोळाही याचठिकाणी आहे असं मानलं जातं. हीच गोष्ट जर माणसाच्या आयुष्याशी निगडीत करायची झाली, तर माणसाचाही तिसरा डोळा त्याच ठिकाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्याला दिसणारे दोन डोळे हे बाहेरचे जग बघतात, तर हा तिसरा डोळा आपल्या शरीरावर अंतर्मनावर लक्ष ठेवून असतो.

ॲक्युप्रेशर पद्धतीमधील महत्त्व : 

 

 

ॲक्युप्रेशर या उपचार पद्धतीतही भुवयांच्या मधल्या भागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ॲक्युप्रेशरमध्येही याला थर्ड आय असेच म्हटले जाते. दररोज काही सेकंद तो भाग दाबल्यास त्यापासून असीमित फायदे होतात असं मानलं जातं.

म्हणूनच जर  कुंकू लावत जात नसाल, तर टिकली मात्र जरूर लावावी. अगदी ती दोन्ही भुवयांच्या मध्येच लावली पाहिजे असेही नाही. ती जागा थोडीशी खालीवर झाली तरी चालेल, पण टिकली लावताना त्या भागावर थोडासा दाब द्यावा. त्याचे अनेक आरोग्यपूर्ण फायदे नक्कीच मिळतील.

टिकलीचे फायदे : 

१. डोकेदुखी कमी होते

ॲक्युप्रेशर पद्धतीनुसार, काही सेकंद टिकली लावतो तो भाग दाबल्यास डोकेदुखी कमी होते. कारण त्या ठिकाणी अनेक नसा आणि रक्तवाहिन्या आहेत, ज्या डोक्याला रक्तपुरवठा करतात.

२. सायनसचा त्रास कमी होतो

संपूर्ण चेहऱ्याच्या संवेदनांसाठी जबाबदार असणारा मज्जातंतू म्हणजे ट्रायजेमिनल नर्व्ह. हा मज्जातंतू याच भागात आहे. त्या मज्जातंतूच्या एकूण तीन शाखा आहेत. याला उत्तेजना दिल्यामुळे त्या भागातील सूज कमी होते आणि मार्ग मोकळा होतो.

३. दृष्टी सुधारते आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहते

 

 

डोळ्यांच्या महत्त्वाच्या नसा देखील याच भागात असतात आणि या नसा डोळ्यांच्या स्नायुंशी जोडलेल्या असतात. म्हणूनच याठिकाणी थोडासा दाब दिल्यास दृष्टीही चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

४. त्वचेचे आरोग्य सुधारते

त्वचेच्या महत्त्वाच्या नसा या भागातून चेहऱ्यावर पसरलेल्या असतात. जर कपाळाच्या मध्यभागी काही सेकंद दाब दिला, तर चेहऱ्याची त्वचा तरुण राहण्यास मदत होते, सुरकुत्या कमी होतात.

५. ताण तणाव डिप्रेशन कमी होते

नवीन वैद्यकीय अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे, की कपाळाच्या मध्यभागी केवळ काही सेकंद दाब दिल्याने मानसिक ताणतणाव कमी होत आहेत. अनेक प्रकारच्या चिंतामुळे येणारं नैराश्य कमी होतं.

६. श्रवणशक्ती सुधारते

कपाळाच्या मध्यभागी दाब दिल्याने कानाच्या ऐकू येण्याच्या महत्त्वाच्या नसेला देखील त्याचा फायदा होतो. त्यामुळे श्रवणदोष लवकर निर्माण होत नाहीत.

७. ताण, निद्रानाश थकवा दूर होतो

 

 

आपल्यावर जेव्हा एखादं काम करण्याचा ताण असतो किंवा कुठली चिंता सतावत असते, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर ताण येतो. कपाळावर आठ्या पडतात. म्हणजेच आपल्या शरीरातला सगळ्या गोष्टींचा ताण हा त्या बिंदूच्या ठिकाणी जमा होतो. म्हणूनच त्या बिंदूला थोडीशी उत्तेजना दिल्यास आपला ताण कमी होईल, दृष्टी सुधारेल आणि निद्रानाशही कमी होईल.

योगसाधनेत बालासन करायला सांगितलं जातं, कारण त्यामध्ये कपाळाचा मध्यभाग जमिनीवर टेकवला जातो आणि ताण हलका होत जातो.

९. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते

कपाळावरच्या या भागाला थोडीशी उत्तेजना दिल्यास आपली स्मरणशक्ती वाढते असे दिसून आले आहे. तसेच एखादं काम करण्यासाठी लागणारी एकाग्रताही वाढते. सर्जनशीलताही वाढते, नवीन काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होते.

केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती चांगला परिणाम होतोय याचा विचार करून टिकली लावली पाहिजे.

 

 

घराची महत्त्वाची जबाबदारी ही स्त्रीच सांभाळत असते. घरात वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र असतात, त्यांना सांभाळण्याचं कामही स्त्रियाच व्यवस्थित करत असतात.

आता तर पुरुषांच्या बरोबरीने ऑफिसही स्त्रिया सांभाळतात, त्यामुळे घरात आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी वावरताना स्त्रियांना मनःशांती जरुरीची असते म्हणूनच, टिकली लावली पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version