Site icon InMarathi

निगेटिव्ह विचारापासून दूर जाऊन कायम पॉझिटिव्ह रहायचं आहे का? मग हे वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यापैकी काहीजण हे स्वतःमध्ये गुंतलेले असतात. त्यांचा आयुष्यातीलबराच वेळ ते विचार करण्यात घालवत असतात. कधीतरी हा विचार भविष्याच्या संबंधित असतो तर, कधीतरी आधी घडलेल्या गोष्टींचा पश्चात्ताप करण्याचा असतो.

या सर्व नको त्या विचाराने त्यांच्या पुढ्यात असलेल्या सुखद आयुष्याची मजा अनुभवायला ते विसरून जातात.

जे लोक या अतिविचाराच्या आणि नकारात्मक विचारांच्या त्रासाने भेडसावले असतात, त्यांना कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही ना कुठलीही गोष्ट केल्यावर आनंद मिळतो.

म्हणून आपण नकारात्मक विचारांपासून दूर राहिले पाहिजे पण, येणारे विचारा थांबवायचे कसे? जर तुम्हीही अतिविचार करून नकारात्मक होत असाल तर आम्ही तुम्हाला याविषयी काही टिप्स देणार आहोत.

 

 

सगळ्यात प्रथम म्हणजे हे नकारात्मक विचार आपल्याला दूर पळवता येतात फक्त तुम्ही काही ही गोष्टींचे पालन केले पाहिजे.

एकदा का तुमचे नकारात्मक विचार दूर पळाले की आपोआपच तुमचे आयुष्य आनंदी होईल खाली दिलेल्या सात उपायांचा वापर करून तुम्ही तुमचे नकारात्मक विचार दूर पळवू शकता.

विचार नकारात्मक करणारी कारणे ओळखणे :

आपले मन आपल्याला त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडते ज्या सत्य नसतात. या असत्य आणि चुकीच्या विचारांमुळे नकारात्मक विचार जन्मास येतात. जर तुम्हाला नकारात्मक विचारांना दूर करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हे कळले पाहिजे की कोणते विचार चुकीचे, असत्य आहेत.

कोणत्याही गोष्टीचा विचार करताना टोक गाठू नये. त्या दरम्यान च्या मधल्या शक्यता नाकारणे.आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणे योग्य नाही. उदा. जर कोणी तुमच्या कडे बघून हसले नाही तर त्यामागे तुम्हीच काही ही चूक केली असेल असा विचार येणे.

नकारात्मक विचारांची समजूत घाला :

आता नकारात्मक विचारांची समजूत कशी घालायची असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल.

जेव्हा तुमच्या मनाला अस्वस्थ करणारे विचार येऊ लागतील तेव्हा सर्वप्रथम हे जाणून घ्या की तुम्ही करत असलेले विचार खरे आहेत किंवा नाही किंवा या फक्त तुमच्या मनाच्या कल्पना आहे.

म्हणजे समजा जर तुमचा मित्र तुमच्याकडे एखाद्या गोष्टीसाठी सल्ला मागण्यासाठी आला. त्या विषयाला घेऊन तो खूपच नकारात्मक असेल तर त्याची समजूत घालण्यासाठी तुम्ही नक्कीच त्याला त्या विषयाची सकारात्मक बाजू समजावून द्याल.

हेच तुमच्या नकारात्मक विचारांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला करायचे आहे. जेव्हा तुम्हाला नकारात्मक विचार येतील तेव्हा तुमच्या मनाला एखाद्या मित्राप्रमाणे त्या विषयाची सकारात्मक बाजू सुद्धा समजून द्या.

 

 

एकदा तुमच्या मनाला त्या विषयाची सकारात्मक बाजू पटली मग नकारात्मक विचार आपोआप दूर लोटले जातील.

नकारात्मक विचार तात्पुरते थांबवा :

आपल्याला सतत नकारात्मक विचार येत राहतात. मुळात कोणत्याच विचारांना आपण थांबवू शकत नाही त्याचप्रमाणे नकारात्मक विचारांचे सुद्धा असते. यांनाही आपल्याला थांबवता येत नाही परंतु, सामान्य विचारांपेक्षा यांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर होत असतो.

त्यामुळे यांना थांबवणे गरजेचे आहे. जर हे विचार येत असतील आणि या नकारात्मक विचारांची समजूत काढणे तुम्हाला जमत नसेल तर तात्पुरते ते विचार थांबवा.

तुलना करणे थांबवा :

आपल्या कळत नकळत आपण इतरांबरोबर स्वतःची तुलना करत असतो. सतत आपण आपले आयुष्य कुणाच्यातरी आयुष्याशी तोलत असतो जे आपल्याला आदर्श आयुष्य वाटत असते.

तुम्हाला हीच तुलना करणे थांबवले पाहिजे. जेव्हा तुमच्या मनात इतरांचे आयुष्य तुमच्याहून सरस असण्याचे विचार येऊ लागतील तेव्हा तुमच्या मनाला पटकन त्या तीन गोष्टी सांगा ज्या तुमच्या आयुष्यात असल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो.

यामध्ये अशा गोष्टी मोडतात ज्या गोष्टींमुळे तुम्हाला भूतकाळात फायदा झाला असेल. हा उपाय केल्याने तुमचे आयुष्य नक्कीच तेवढे वाईट नाही याची खात्री पटेल.

 

आयुष्यातील चांगल्या गोष्टींना धन्यवाद म्हणायला शिका :

अभ्यासातून असे कळले आहे आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींचे आभार मानल्यामुळे आपल्याला सकारात्मक वाटते आणि काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते.

जर तुम्ही थोडा वेळ विचार केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यातील अशा छान गोष्टी मिळतील ज्यांनी तुमचे आयुष्य सुखकर झाले आहे. त्यांना मनोमनी धन्यवाद म्हणा.

आयुष्यातील अशा छान गोष्टींचे धन्यवाद मांडण्यासाठी तुम्ही एक डायरी करू शकता आणि या डायरीमध्ये दिवसभरात तुमच्याबरोबर घडलेल्या चांगल्या गोष्टींचे आभार माना.

तुमची शक्ती ओळखा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा :

प्रत्येक माणसाकडे आयुष्यात एक विशिष्ट कसब असते. तुम्ही तुमच्यातील हे कसब ओळखले पाहिजे कारण हे कसब तुमची शक्ती आहे. ते ओळखा!

आणि ते अधिकाअधिक कसे वाढवता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करा. कालांतराने तुमच्यातील ते कसब सततच्या सरावामुळे अजून सुबक होईल आणि यामुळे तुमची वाहवाही सुद्धा होईल.

लोकांकडून होणारी स्तुती तुम्हाला सकारात्मक करेल. त्यामुळे तुम्ही तुमच्यातील हे कसब वाढवणे गरजेचे आहे.

प्रोफेशनल मदत :

 

 

जर तुम्हाला तुमच्या नकारात्मक विचारांवर ताबा मिळवता येत नसेल तर तुम्ही मानसोपचारतज्ञांची मदत घ्यायला हवी.

तज्ञ अशावेळी उपयुक्त सल्ला सुचवतील कारण हे नकारात्मक विचार पुढे जाऊन नैराश्यासारख्या मानसिक विकाराचे रूप घेऊ शकतात.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version