Site icon InMarathi

झोपताना व्यवस्थित झोपला नाहीत, तर आरोग्यावर ओढवेल मोठे संकट! अशी घ्या काळजी

sleeping actress inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना झोपल्यावर बघून आपल्याला बऱ्याचदा हसू येतं. कारण ते पुष्कळ वेळा विक्षिप्तपणे झोपलेले असतात.

तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकाला एका विशिष्ट पद्धती झोपायची सवय असते आणि त्या विशिष्ट पद्धतीने झोपल्यावरच त्यांनी झोप लागते. काही जणांना पोटावर झोपण्याची सवय असते, काहीजण एका कुशीवर झोपतात, तर काही जणांना दोन्ही हात मानेखाली ठेवून आरामात पाय पसरून झोपण्याची सवय असते.

या विशिष्ट सवयींचे शरीरावर काही परिणाम होतात, चांगले आणि वाईट दोन्ही. तुमच्या झोपण्याच्या सवयीमुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम तर होत नाहीत ना? एखाद्याची झोपण्याची पद्धत त्याच्या मानसिकतेबद्दल काही सूचित करते का? याच विषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

तज्ञांकडून असे सुचवले जाते, की आपल्या चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे ठराविक अवयवांवर ताण पडणे, दुखणे अशा बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सकाळी उठल्यावर मान दुखणे, पाठ दुखणे व कमरेचे दुखणे अशा काही समस्या तुमच्या चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे उद्भवतात.

पोटावर झोपण्याची सवय

 

 

काहीजणांना पोटावर झोपण्याची सवय असते. या झोपण्याच्या सवयीला वाईट म्हणता येणार नाही, परंतु तुम्ही अशा पद्धतीने झोपत असाल आणि उठल्यावर तुमची मान आणि हात हात दुखत असतील तर काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला विशेषज्ञ देतात.

ते म्हणतात, की बऱ्याचदा पोटावर झोपल्यामुळे मानेच्या स्नायूंवर ताण निर्माण होऊन तेथील नसा दाबल्या जातात आणि मग मानेचे दुखणे आणि हातांचे दुखणे सुरू होते.

जर आपल्याला या समस्या टाळायच्या असतील तर झोपताना मऊ उशी वापरायला हवी, जेणेकरून मानेच्या नसांवर दाब निर्माण होणार नाही.

पोटावर झोपण्याच्या या सवयीचा एक तोटा म्हणजे जर असे झोपल्यामुळे मानेवरच्या नसांवर अतिरिक्त ताण पडला, तर डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू शकते.

त्यामुळे तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय असेल आणि डोकेदुखीचा त्रास असेल, तर तुम्ही तुमच्या झोपण्याच्या सवयीमध्ये बदल केला पाहिजे आणि वेळ पडल्यास डॉक्टर किंवा फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे.

हात शरीराखाली घेऊन पालथ झोपण्याची सवय 

 

 

 

पोटावर झोपताना काही लोक हात छातीजवळ घेऊन झोपतात.

अशा पद्धतीने झोपणाऱ्या लोकांसंबंधात काही रोचक तथ्य आहेत. अशा पद्धतीत झोपणाऱ्या लोकांना झोपताना स्वतःशी बोलायला आवडते. असे लोग समाजशील असतात आणि या लोकांना त्यांच्यावर केलेली टीका आवडत नाही, असे संशोधनातून समोर आले आहे.

हात मानेखाली ठेऊन झोपण्याची सवय 

 

 

कसलातरी विचार करत आरामात मानेखाली हात घेऊन झोपण्याची सवय काही लोकांना असते, परंतु काही प्रसंगी हात बराच वेळ मानेखाली राहिल्यामुळे खांद्याजवळ आणि मनगटाजवळच्या स्नायूंवर ताण पडतो.

यामुळे आपल्याला मनगट दुखण्याचा आणि आणि खांद्याच्या दुखण्याच्या त्रास होऊ शकतो. जर तुम्हालाही ही असे दुखणे होत असेल तर तुम्ही ही फिजिशियनकडे जाणे गरजेचे आहे.

एकाच कुशीवर झोपण्याची सवय

 

 

बरेच लोक झोपताना एका कुशीवर झोपतात, परंतु बराच वेळ असं झोपल्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात.

महिलांमध्ये कंबर दुखण्याची समस्या जास्त दिसून येते. याचे कारण असे, की पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये माकडहाड मोठे असते. त्यामुळे कंबर दुखण्याची शक्यता महिलांमध्ये अधिक दिसून येते. जर झोपताना कमरेभोवती टॉवेल गुंडाळला, तर मणक्याला आराम मिळेल आणि ही कंबरदुखीची समस्या टाळता येईल.

वरील लेख वाचून तुम्हाला हे लक्षात आले असेल, की तुमच्या झोपण्याच्या सवयींचे काही दुष्परिणाम असू शकतात. जर तुमचे दुखणे अधिक वाढले असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version