“The Martian” हा Hollywood चित्रपट बर्याच जणांना आवडून गेला.
The Martian चं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास पूर्णपणे science ची कास धरून पुढ सरकणारी कथा आणि आधुनिक VFX तंत्रज्ञानाने साकारलेलं, अगदी खरं वाटणारं मंगळ ग्रहाचं व अंतरिक्षाचं चित्रण.
चित्रपटाची कथा ही एका मंगळ ग्रहावर अडकलेल्या Astronaut बद्दल आहे – जो मारला गेला आहे असं समजून त्याच्या सहकार्यांकडून मागे सोडला जातो. त्या नंतर अख्या मंगळ ग्रहावर एकटा राहिलेला तो व त्याचे जिवंत राहण्यासाठीचे व घरी परतण्याचे प्रयत्न दाखविलेले आहेत.
हा चित्रपट, Andy Weir ह्या अवलियाने लिहलेल्या The Martian ह्या बेस्ट सेलिंग novel वर आधारित आहे.
त्याची कादंबरी वाचताना किंवा चित्रपट पाहताना त्याने केलेला तगडा अभ्यास जाणवत राहतो. कथे मधील प्रत्येक गोष्ट विणताना त्याने ती किती उत्तमरीत्या science ला धरून आणि अंतरीक्ष, NASA, Mars, Botany, Chemistry, Astrodynamics इ. विषयांची माहिती गोळा करून लिहली आहे हे कळतं.
Andy Weir च्या मते कथा लिहीण्यापासून ते Novel प्रकाशित करून त्यावर चित्रपट बनण्यापर्यंतचा प्रवास आश्चर्यकारक आहे.
त्याने ही कथा छोट्या-छोट्या chapters मध्ये त्याच्या blog वर टाकण्यास सुरुवात केली. ती कथा लोकांना आवडू लागली. त्याने ही कथा Free e-book च्या स्वरुपात blog वर देखील उपलब्ध करून दिली.
काही जणांच्या request वरून त्याने त्याची ही कादंबरी, Amazon वर Kindle Edition म्हणून टाकली आणि त्याची minimum possible किंमत ठेवली – फक्त 99 cents ( साधारण 50-60 रुपये). त्यानंतर काही काळातच कादंबरीच्या 35000 copies विकल्या गेल्या आणि ती amozon च्या Top Selling Science Fiction Novels च्या list मध्ये गेली.
आणखी काही दिवसांत त्याची एका प्रख्यात पुस्तक प्रकाशन करणाऱ्या कंपनीच्या agent ने भेट घेतली व त्याची Novel पुस्तक स्वरुपात प्रकाशित झाली.
आश्चर्य म्हणजे – अगदी त्याच आठवड्यामध्ये 20th Century Fox ने The Martian कादंबरीवर चित्रपट बनविण्याचे हक्क विकत घेण्याच्या करार त्याच्यासोबत केला. हे सगळं घडतंय ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
Blog ते Blockbuster Movie हा प्रवास खरंच आश्चर्यकारक म्हणावा लागेल. पण The Martian हे त्याचं पहिलंच लिखाण नाही.
ह्या आधी त्याने The Egg नावाची एक Short Story लिहिली आहे, जी internet वर खुप प्रसिद्ध आहे. त्याच्या ह्या कथेचा अनुवाद जवळ पास 31 भाषांमधे झाला आहे तसंच त्यावर आधारित Short Films देखिल बनल्या आहेत. The Egg ही कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
Science Fiction ची आवड असणार्यांनी त्याची The Martian ही कादंबरी जरूर वाचावी आणि The Martian हा चित्रपट देखील अवश्य पहावा.
The Martian चित्रपटाचं Official Trailer :
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.
—
Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.