Site icon InMarathi

स्मार्ट फोनला टच न करताही फोन वापरता येतो! हे बघा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तंत्रज्ञानामुळे माणसांचं जगणं खूपच सुकर झालं आहे. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त काम होऊ लागलं आहे. एकेकाळी अशक्य वाटणारी मोठमोठी कामं आता सहज शक्य होऊ लागली आहे.

मोठमोठी डॉक्युमेंटस आता आपण आपण काही क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला आपण स्क्रिनवर प्रत्यक्ष पाहू शकतो.

त्याच्याशी प्रत्यक्ष बोलू शकतो. एवढचं नव्हे तर पृथ्वीच्या कक्षेबाहेर अवकाशात गेलेल्या व्यक्तींशीही आपण संवाद साधू शकतो.

 

स्मार्ट फोनमुळे तर खरेदी करणं, चित्रपट पाहणं, पत्र पाठवणं, मित्रांचं स्नेहसंमेलन, बँकेचे व्यवहार हे आणि बरचं काही आता आपण आपल्या बेडरूमधील बेडवर आराम करतानाही करू शकतो.

तंत्रज्ञान वेगानं पुढं जात आहे. सोबतच आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. बऱ्याचदा त्या आपल्याला माहिती नसतात.

आता हेच बघा सकाळी लवकर उठण्यासाठी फोनवर अलार्म (गजर) लावायचा असेल, फोनमधील वाय-फाय किंवा ब्ल्यु टूथ किंवा जीपीएस ऑन-ऑफ करायचे असतील किंवा एखाद्याला फोन लावायचा असेल तर आपल्याला फोनला किमान ३-४ वेळा स्पर्श करावा लागतो.

 

पण आपण स्मार्ट फोनला स्पर्श न करता या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी Voice Command हे तंत्र उपयोगी पडते.

Voice Command म्हणजे काय?

Voice Command म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तोंडी आज्ञा देणे. अशा तोंडी आज्ञा स्मार्ट ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो. विशेष म्हणजे अशा तोंडी आज्ञा कोणाच्याही आवाजात दिल्या तरीही कार्यान्वित होतात.

फक्त या तोंडी आज्ञा देण्यासाठी काही विशिष्ट पद्धत आहे. तसेच तोंडी आज्ञा देण्याची भाषा ही इंग्रजी आहे.

ही पद्धत काहीशी असुरक्षित आणि धोक्याची असल्याचे खुद्द गुगलनेच स्पष्ट केले आहे. यावर पर्याय म्हणून तुम्ही स्मार्ट फोन अनलॉक करून गुगल सर्च बारशेजारील माईकवर क्लिक करून Voice Command देऊ शकता.

ही तुलनेने अधिक सुरक्षित आणि सुलभ पद्धत आहे.

अशा द्यायच्या Voice Command

तुमच्या फोनमध्ये जर Hey Google सेटिंग ऑन असेल तर तुमचा फोन अनलॉक असतानाही तुम्ही Hey Google आणि त्यापुढे खाली दिलेल्या Voice Command वापरू शकता.

मात्र Hey Google ची सेटिंग ऑन नसेल तर मात्र तुम्हाला फोनमधील गुगल सर्च बारशेजारील माईक वर क्लिक करून Voice Command द्यावी लागेल.

 

या आहेत Voice Command?

येथे Voice Command ची यादी दिलेली आहे. या कमांड जशाच्या तशा द्याव्या लागतील. तसेच कंसातील जागी तुमची गरजेप्रमाणे बदल करता येईल.

सर्वसाधारण स्मार्ट फोन ऑपरेट करण्यासाठीच्या Voice Commands

 

गुगल सर्चसाठी काही Voice Commands

आहे की नाही भारी. तुम्ही एकदा वापरा. आणखी बऱ्याच Voice Commands आहेत. त्या पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्या नंतर कधीतरी नक्की पाहूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version